AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kisan Railway | किसान रेल्वे शेतमाल वाहतुकीमध्ये गेमचेंजर ठरेल?

शेतमालाच्या वाहतुकीसाठी कोरोना काळात सुरु करण्यात आलेली किसान रेल सध्या 18 वेगवेगळ्या मार्गांवर धावते. (Kisan Rail)

Kisan Railway | किसान रेल्वे शेतमाल वाहतुकीमध्ये गेमचेंजर ठरेल?
किसान रेल्वे
| Updated on: Feb 06, 2021 | 7:25 AM
Share

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2020-21 चा अर्थसंकल्प जाहीर करताना किसान रेलची घोषणा केली होती. ऑगस्ट 2020 मध्ये सुरु झालेल्या किसान रेलच्या फेऱ्यांनी 100 चा आकडा पार केला आहे. शेतमालाच्या वाहतुकीसाठी कोरोना काळात सुरु करण्यात आलेली किसान रेल सध्या 18 वेगवेगळ्या मार्गांवर धावते. किसान रेल शेतमालाच्या वेगवान वाहतुकीमध्ये खरंच गेमचेंजर ठरेल का? किसान रेलचा लाभ शेतकऱ्यांना होईल का? शेतात निर्माण होणारा भाजीपाला, फळ आणि शेतमाल देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा प्रकल्प यशस्वी ठरु शकतो का? किसान रेलचा रस्ते मार्गानं होणाऱ्या शेतमालाच्या वाहतुकीवर किती परिणाम होईल, येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. Kisan Rail gamechanger in agriculture perishable good transport

देशातील पहिली किसान रेल

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सन 2020-21 चा अर्थसंकल्प सादर करताना किसान रेल प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. त्याअंतर्गत पहिली किसान रेल महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील देवळाली ते बिहारच्या दानापूर इथपर्यंत चालवली गेली. किसान रेलच्या पहिल्या गाडीला केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी हिरवा झेंडा दाखवला. रेल्वेनं सुरु केलेला किसान रेल प्रकल्प भाजी, शेतमाल, फळे आणि इतर नाशवंत शेतमालाच्या वेगवान वाहतुकीसाठी आहे. यासाठी रेल्वेनं कृषी मंत्रालयाचं सहकार्य घेतलं आहे. किसान रेलचा वाढता प्रतिसाद पाहून देवळाली ते दानापूरच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. तर, देवळाली ते बिहारमधील दानापूरचा टप्पा वाढवण्यात आला आहे. कोल्हापूर-सांगोला- मनमाड ही लिंक एक्स्प्रेस सुरु करण्यात आली. बिहारमध्येही दानापूरपासून मुझ्झफरपूरपर्यंत मार्ग वाढवण्यात आला.

वाहतुकीच्या भाड्यात 50 टक्के सूट

किसान रेल प्रकल्पाद्वारे शेतमाल दुसऱ्या राज्यामंध्ये पाठवण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून ५० टक्के सूट देण्यात येत असल्याची घोषणा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. गेल्यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पानुसार दूध, मटण, मासे, भाज्या, शेतमालाच्या वाहतुकीसाठी किसान रेल प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. यांअतर्गत शेतकऱ्याचा शेतमाल मोठ्या पातळीवर वेगवेगळ्या राज्यात पोहोचवण्याचं उद्दिष्ठ आहे.

22 जानेवारीपर्यंत 157 फेऱ्या

7 ऑगस्ट 2020 ला पहिली किसान रेल धावली. किसान रेलला मिळालेला प्रतिसाद पाहता फेऱ्यांची आणि गाड्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. देशात सध्या 18 किसान रेल धावतात. त्यांच्या 22 जानेवारीपर्यंत एकूण 157 फेऱ्या झाल्या होत्या. यामध्ये 49 हजार टन शेतमालाची वाहतूक करण्यात आली. यामध्ये कांदा, टोमॅटो, आले, संत्री, केळे, गाजर, शिमला मिर्ची इतर भाज्यांची देखील वाहतूक केली गेली आहे.

देशात सुरु असणाऱ्या किसान रेल

1देवळाली ते दानापुर07-08-2020
2अनंतरपुर ते आदर्श नगर, दिल्ली09-09-2020
3यशवंतपुर ते निज़ामुद्दीन 19-09-2020
4नागपुर ते आदर्श नगर, दिल्ली 14-10-2020
5छिंदवाड़ा ते हावड़ा/न्यू तिनसुकिया 28-10-2020
6सांगोला ते हावड़ा (सिकंदराबाद मार्गे) 29-10-2020
7सांगोला ते शालीमार 21-11-2020
8इंदौर ते न्यू गुवाहाटी 24-11-2020
9रतलाम ते न्यू गुवाहाटी 05-12-2020
10इंदौर ते आगरताळा 27-12-2020
11जालंधर ते जिरानिया 31-12-2020
12नागरसोल ते न्यू गुवाहाटी 05-01-2021
13नागरसोल ते चितपूर 07-01-2021
14नागरसोल ते न्यू जलपाईगुड़ी 10-01-2021
15नागरसोल ते नौगचिया11-01-2021
16नागरसौल ते फतुहा 13-01-2021
17नागरसौल ते बैहाटा 19-01-2021
18नागरसौल ते मालदा टाउन 20-01-2021

किसान रेलचा फायदा खरचं शेतकऱ्यांना

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याची घोषणा केली होती.  शेतकऱ्यांच्या फायाद्यासाठी किसान रेल सुरु करण्यात आल्याचं म्हटलं गेलं होतं. देशात सध्या 18 मार्गांवर किसान रेल धावत आहेत. काही ठिकाणी किसान रेलसाठी देण्यात येत असलेल्या 50 टक्के भाडे सवलतीचा फायदा व्यापारी घेत असल्याचं देखील समोर आलं होतं. किसान रेल प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होत असल्यास हा प्रकल्प आणखी मोठ्या प्रमाणावर राबवला जाईल. किसान रेलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचा माल वेगवेगळ्या राज्यात पोहोचवण्यासठी संधी उपलब्ध झालीय. छोट्या शेतकऱ्यांना याचा किती फायदा होईल ते पाहावं लागेल.

संबंधित बातम्या:

BHARAT BAND | शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’चा देशभरात परिणाम, कुठे परिक्षा रद्द, रेल्वे अडवल्या, तर कुठे नवदाम्पत्य फसलं!

Farmers Protest | शेतकरी आंदोलन : संभाव्य तोडगा काय? .

Kisan Rail gamechanger in agriculture perishable good transport

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.