लातूर मार्केट : उडीदाच्या दरात पुन्हा वाढ, सोयाबीनचे दर स्थिर

उडदाची बाजारात आवक सुरु झाल्यापासून सरासरी 7000 चा दर शेतकऱ्यांना मिळालेला आहे. दोन दिवसानंतर (Latur Market) लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडदाला 7200 रुपये क्विंटलचा चा दर मिळाला होता. तर सोयाबीनला सौद्यामध्ये 6900 चा तर पोटलीमध्ये 6300 चा दर मिळालेला आहे. शनिवारीही सोयाबीनला 6300 एवढाच दर शेतकऱ्यांना मिळालेला होता.

लातूर मार्केट : उडीदाच्या दरात पुन्हा वाढ, सोयाबीनचे दर स्थिर
संग्रहीत छायाचित्र

लातूर : खरीप हंगामातील मुख्य पीक हे सोयाबीन असले तरी यंदा उडीद पीकाने शेतकऱ्याला तारले आहे. अधिकच्या क्षेत्रावरीव उडदाची काढणी ही पावसाला सुरवात होण्यापुर्वीच झाली होती. त्यामुळे (Farmer) शेतकऱ्यांनो अपेक्षित उत्पादन झाले होते. मात्र, उशिराने पेरा झालेले उडीद अजूनही वावरातच आहे पण याचे प्रमाण हे कमी आहे. शिवाय उडदाची बाजारात आवक सुरु झाल्यापासून सरासरी 7000 चा दर शेतकऱ्यांना मिळालेला आहे.

दोन दिवसानंतर (Latur Market) लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडदाला 7200 रुपये क्विंटलचा चा दर मिळाला होता. तर सोयाबीनला सौद्यामध्ये 6900 चा तर पोटलीमध्ये 6300 चा दर मिळालेला आहे. शनिवारीही सोयाबीनला 6300 एवढाच दर शेतकऱ्यांना मिळालेला होता. गेल्या 15 दिवसांपासून उडीदाची आवक ही सुरु झालेली आहे. मात्र, सुरवातीला 8000 वर गलेला उडीद हा 7 हजार रुपयांवर येऊन स्थिर झाला होता.

त्यामुळे सध्याच्या प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे तो उडीदाचा. सोमवारी शेतकरी संघटनांनी ‘भारत बंद’ हाक दिल्याने लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार हे बंद होते. त्यामुळे आजच्या (मंगळवार)च्या बाजारात सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणाक होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

मात्र, जिल्ह्यासह मराठवाड्यात पावसाने थैमान घातल्याने सोयाबीनची आवक केवळ अडीच हजार क्विंटलची झालेली होती. तर सोयाबीनला सौद्यामध्ये 7200 चा दर मिळालेला होता. कमी आवक झाल्याने दर वाढतील असे व्यापाऱ्यांनी सांगितले होते मात्र, सोयाबीनचे दर हे स्थिर राहिलेले आहेत. उडदाच्या दरात शनिवारच्या तुलनेत 500 रुपयांची वाढ झालेली आहे. त्यामुळे खरीपातील केवळ उडीद हेच पीक शेतकऱ्यांकडे असून त्यालाही समाधानकारक दर मिळत आहे.

सोयाबीनचे दर पडले तरीही खाद्यतेल चढ्या दराने

सोयाबीनच्या दरामध्ये कमालीची घट झाली आहे. हंगामाच्या सुरवातीला 8600 रुपये क्विंटलचा दर हा मिळालेला होता. मात्र, अवघ्या काही दिवसांमध्ये सोयाबीनची आवक वाढताच दर हे निम्म्याने कमी झाले होते. सध्याही सोयाबीनच्या दरात चढ-उतार हा सुरु आहे. सोयाबीनचे दर कमी होऊनही सोयाबीन तेलाचे दर हे वाढतच असल्याने रोष व्यक्त होत आहे. सोयाबीन तेलात 5 रुपयांनी वाढ झालेली आहे. शिवाय केंद्र सरकारने सोयापेंडच्या आयातीला परवानगी दिली असूनही तेलाच्या दरात वाढ ही होत आहे.

अडीच हजार क्विंटल सोयाबीनची आवक

खरीपाच्या हंगामात दरवर्षी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 25 ते 30 हजार क्विंटल सोयाबीनची आवक होत असते. यंदा मात्र, आतापर्यंत 20 हजार क्विंटलचा टप्पाही ओलांडलेला नाही. दिवसेंदिवस सोयाबीनचे दर घटत असल्याचे चित्र आहे तर दुसरीकडे पावसामुळे हे मुख्य पीक अजूनही शेतात उभेच आहे. त्यामुळे कमी आवक होऊनही दर हे स्थिरच आहेत.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. मंगळवारी लाल तूर- 6400 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6450 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6300 रुपये क्विंटल, जानकी चना 5041 रुपये क्विंटल, विजय चणा 5400, चना मिल 4900, सोयाबीन 6976, चमकी मूग 6650 , मिल मूग 6000 तर उडीदाचा दर 7271 एवढा राहिला होता. (Latur Market: Urad prices rise again, soyabean prices stable )

संबंधित बातम्या :

उस्मानाबाद : खरीप उत्पादनाच्या आशा संपुष्टात, प्रकल्पातील पाणीही शेतातच

शेतकऱ्यांसाठी नवी 35 पिके, पंतप्रधान मोदींनी दिला उत्पादन वाढीचा शेतकऱ्यांना ‘कानमंत्र’

कोल्हापूरातही ‘लातूर पॅटर्न’, ‘केडीसी’ देणार 5 लाखापर्यंत बिनव्याजी पीककर्ज

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI