केंद्र सरकारच्या दुटप्पी भुमिकेमुळेच शेतकऱ्यांचे नुकसान : कृषिमंत्री दादा भुसे

सोयाबीनचे दर दिवसेंदिवस घटत आहेत. पावसामुळे सोयाबीनचे पीक अजूनही शेतातच आहे. (Minister of Agriculture) त्यामुळे आवक कमी असतानाही दर घटत याला केंद्र सरकारने घेतलेली भुमिका जबाबदार असल्याचा आरोप कृषिमंत्री दादा भुसे यांनी केला आहे.

केंद्र सरकारच्या दुटप्पी भुमिकेमुळेच शेतकऱ्यांचे नुकसान : कृषिमंत्री दादा भुसे
दादा भुसे, कृषीमंत्री.

कोल्हापूर : सोयाबीनचे दर दिवसेंदिवस घटत आहेत. पावसामुळे सोयाबीनचे पीक अजूनही शेतातच आहे. (Minister of Agriculture) त्यामुळे आवक कमी असतानाही दर घटत याला केंद्र सरकारने घेतलेली भुमिका जबाबदार असल्याचा आरोप कृषिमंत्री दादा भुसे यांनी केला आहे. (Minister Dada Buse) देशात जीएम सोयाबीनवर बंदी आहे अशाच सोयापेंडची केंद्र सरकारने आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच सोयाबीनचे दर झपाट्याने उतरत आहेत. एकीकडे पावसामुळे सोयाबीनचे नुकसान होत आहे तर दुसरीकडे दर नसल्याने शेतकरी संकटात आहे. शेतकऱ्यांबाबत केंद्र सरकारने दुटप्पी भुमिका घेतल्याने शेतकरी अडचणीत येत आहे.

तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असे सांगायचे आणि दुसरीकडे त्याचेच दर पाडण्याचे केंद्र सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या अंगलट येत आहे. राज्यात यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांनी नगदी पिकांवर भर दिला होता. मात्र, पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले आहे. त्यांनी सांगोला येथील फळ बागायतदार शेतकऱ्यांशी संवाद साधून कोल्हापूर येथेही पिकाची पाहणी केली होती.

सध्या सोयाबीनची आवक ही सुरु झाली असली तरी प्रमाण हे कमी आहे. पावसामुळे काढणी कामे ही रखडलेली आहेत तर दुसरीकडे सोयाबीनचे दर हे घटलेले आहेत. सोयापेंड आयातबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा परिणाम हा सोयाबीनच्या दरावर होत आहे. एकीकडे केंद्र सरकार तेलबियांचे उत्पादन घेण्याचे अवाहन शेतकऱ्यांना करीत आहे तर दुसरीकडे दर पाडून फसवणुक अशी स्थिती झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

एफआरपी बाबात लवकरच योग्य निर्णय

एफआरपी रकमेच्या तील तुकड्यावरून सध्या मतमतांतर आहे. पण सरकार हे शेतऱ्यांच्याच हीताचा निर्णय घेईल. एफआरपी बद्दल मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी योग्य त्या सुचना केलेल्या आहेत. साखर कारखानदारांनी त्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. अखेर सरकार शेतकऱ्यांच्याच हीताचा निर्णय घेणार आहे. त्यामुळे कारखानदारांनी थकीत एफआरपी रक्कम त्वरीत देणे आवश्यक आहे.

सोयाबीनचे दर पडले तरीही खाद्यतेल चढ्या दराने

सोयाबीनच्या दरामध्ये कमालीची घट झाली आहे. हंगामाच्या सुरवातीला 8600 रुपये क्विंटलचा दर हा मिळालेला होता. मात्र, अवघ्या काही दिवसांमध्ये सोयाबीनची आवक वाढताच दर हे निम्म्याने कमी झाले होते. सध्याही सोयाबीनच्या दरात चढ-उतार हा सुरु आहे. सोयाबीनचे दर कमी होऊनही सोयाबीन तेलाचे दर हे वाढतच असल्याने रोष व्यक्त होत आहे. सोयाबीन तेलात 5 रुपयांनी वाढ झालेली आहे. शिवाय केंद्र सरकारने सोयापेंडच्या आयातीला परवानगी दिली असूनही तेलाच्या दरात वाढ ही होत आहे.

शेतकऱ्यांनाच करता येणार कारखान्याची पारख

चोख व्यवहार केलेल्या तसेच शेतकऱ्यांची फसवूक केलेल्या आशा राज्यातील 190 साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाकडून मानांकन देण्यात येणार आहे. त्यामुळे कारखान्याचे खरे स्वरुप बाहेर पडणार आहे. यावरुन शेतकऱ्यांना आपल्यासाठी कोणता कारखाना योग्य आहे हे माहिती होणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूकही होणार आहे. चांगले मानांकन मिळालेले करखाने अधिक जोमाने कामाला लागणार आहेत. (State Agriculture Minister Dada Bhuse alleged that farmers were harmed due to the dual role of the Central government.)

संबंधित बातम्या :

उस्मानाबाद : खरीप उत्पादनाच्या आशा संपुष्टात, प्रकल्पातील पाणीही शेतातच

शेतकऱ्यांसाठी नवी 35 पिके, पंतप्रधान मोदींनी दिला उत्पादन वाढीचा शेतकऱ्यांना ‘कानमंत्र’

कोल्हापूरातही ‘लातूर पॅटर्न’, ‘केडीसी’ देणार 5 लाखापर्यंत बिनव्याजी पीककर्ज

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI