Summer Crop : खरिपात सोयबीनचे नुकसान, उन्हाळ्यात मुगातून भरपाई, पोषक वातावरणामुळे वाढली उत्पादकता..!

| Updated on: May 08, 2022 | 10:48 AM

वाशिम जिल्ह्यात उन्हाळी मुगावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. उन्हाळी हंगामात केवळ क्षेत्रच वाढले नाहीतर पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता यामुळे उत्पादकतेमध्येही वाढ होत आहे. उन्हाळी हंगामात एकरी 5 क्विंटल उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले आहे. या वाढत्या उत्पादकतेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Summer Crop : खरिपात सोयबीनचे नुकसान, उन्हाळ्यात मुगातून भरपाई, पोषक वातावरणामुळे वाढली उत्पादकता..!
उन्हाळी हंगामात मूग उत्पादनात वाढ झाली आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

वाशिम :  (Kharif Season) खरीप हंगामात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी एक ना अनेक प्रयोग राबवलेले आहेत. मुबलक प्रमाणात पाणी आणि पोषक वातावरणामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात यशही मिळाले आहे. (Marathwada) मराठवाड्यात उन्हाळी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली असली तरी विदर्भात मात्र, शेतकऱ्यांनी (Mug Crop) मुगावर भर दिला होता. सध्या मूग काढणीला सुरवात झाली असून वाढत्या उत्पादकतेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. खरीप हंगामात सोयाबीनचे नुकसान झाले असले तरी त्याची भरपाई उन्हाळी हंगामातील पिकांमधून निघालेली आहे. शिवाय उन्हाळी हंगामातील पीक काढणी झाली की हे क्षेत्र खरिपासाठी पु्न्हा उपयोगात येणार आहे.

वाशिम तालुक्यात एकरी 5 क्विंटल उत्पादन

वाशिम जिल्ह्यात उन्हाळी मुगावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. उन्हाळी हंगामात केवळ क्षेत्रच वाढले नाहीतर पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता यामुळे उत्पादकतेमध्येही वाढ होत आहे. उन्हाळी हंगामात एकरी 5 क्विंटल उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले आहे. या वाढत्या उत्पादकतेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सोयाबीनचे पीक हातचे गेले होते. त्याची भरपाई आता उन्हाळी मुगातून होत आहे.

कृषी विभागाचे आवाहन अन् शेतकऱ्यांचे परिश्रम

गतवर्षी सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात वेगवेगळे प्रयोग राबवून उत्पादन वाढवण्याचे आवाहन केले आहे. शिवाय शेतकऱ्यांनी झालेले नुकसान भरुन काढण्याचा निर्धारच केला होता. त्यामुळे मराठवाड्यात उन्हाळी सोयाबीन आणि विदर्भात मुगाचे उत्पादन क्षेत्र वाढले आहे. उत्पादकताही सरासरीपेक्षा अधिक असल्याने समाधान व्यक्त होत आहे. पीक पध्दतीमध्ये बदल आणि कृषी विभागाने केलेले आवाहन शेतकऱ्यांच्या कामी आले आहे.

हे सुद्धा वाचा

आता खरिपाची लगबग

रब्बी हंगामासह उन्हाळी हंगाम अंतिम टप्प्यात आहे. या दोन्ही हंगामातून शेतकऱ्यांना समाधानकारक उत्पादन पदरी पडलेले आहे. तर आता शेत शिवारामध्ये खरीप हंगामपुर्व मशागतीची कामे सुरु आहेत. मशागतीची कामे पूर्ण होताच खरिपातील सोयाबीन, उडीद, मूग आदी पिकांची पेर होणार आहे. पेरणीपुर्व कामे उरकून शेतकरी आता खत, बी-बियाणे यांची जुळवणी करु लागले आहेत. गतवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागला होता यंदा काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.