पीक विमा योजनेची मोठी अपडेट, मयत शेतकर्‍यांच्या कुटुंबांना दिलासा, झटपट पूर्ण होणार दावा प्रक्रिया

PM Pik Vima Yojana: सरकारने पंतप्रधान पीक विमा योजनेचे नियम अत्यंत सुटसुटीत झाले आहेत. त्यामुळे मयत शेतकऱ्याच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. आता पेंडिंग क्लेमची प्रक्रिया गतीने होईल. काय होईल शेतकऱ्यांना फायदा?

पीक विमा योजनेची मोठी अपडेट, मयत शेतकर्‍यांच्या कुटुंबांना दिलासा, झटपट पूर्ण होणार दावा प्रक्रिया
पंतप्रधान शेतकरी विमा योजना
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 11, 2026 | 8:36 AM

PM Pik Vima Yojana: पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत शेतकरी आणि त्याच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि पारदर्शक केली आहे. शेतकर्‍याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला विम्याची रक्कम मिळवण्यासाठी सरकारी कार्यालय आणि बँकांचे उंबरठे झिजवावे लागतात. कागदी घोडे नाचवावे लागतात. तरीही शेतकऱ्याच्या कुटुंबाला विम्याची रक्कम लवकर मिळत नाही. याविषयी मोठी ओरड होती. मान्सून सक्रिय होण्यापूर्वी आता याविषयीची प्रक्रिया सुटसुटीत करण्यात आली आहे.

नियमात मोठा बदल

आता यातील अडथळा सरकारने दूर केला आहे. नियमात मोठा बदल केला आहे. सरकारी बाबू या प्रक्रियेतून बाद करण्यात आले आहेत. पीडित कुटुंबाला कोणताही मानसिक त्रास होऊ नये आणि विमा योजनेची रक्कम मिळावी यासाठी प्रक्रिया सोपी केली आहे. या नवीन व्यवस्थेत केवळ पेंडिंग क्लेमचा निपटारा आता झटपट होईल. विम्याचा दावा झटपट निकाली लागणार असल्याने मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला लवकरच आर्थिक मदत होईल.

वारसदारांची प्रक्रिया डिजिटल

जुन्या पद्धतीत मयत शेतकऱ्यांच्या उत्तराधिकारी, वारसदाराची पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वर्षही निघून जात होते. कागदपत्रे वेळेत दाखल केल्यावरही पुढील प्रक्रियेसाठी मोठा वेळ लागत होता. नवीन नियमानुसार, आता वारसदाराच्या पडताळणीची प्रक्रिया डिजिटल करण्यात आली आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. त्यामुळे वेळखाऊ प्रक्रियेला लगाम लागला आहे. विमा अर्ज भरताना वारसदाराची माहिती, त्याची कागदपत्रे, आधारकार्ड आणि इतर माहिती तसेच बँक खात्याची सविस्तर माहितीचा लागलीच पडताळा करण्यात येणार आहे.
जर वारसदाराची माहितीचा पडताळा करण्यात अचडण येत असल्यास स्थानिक महसूल अधिकाऱ्याच्या मदतीने ही प्रक्रिया सुद्धा झटपट पूर्ण होईल. यामुळे सतत कागदपत्रांची मागणी करण्यात येणार नाही.

योजनेतील दलाल होणार हद्दपार

या आधुनिक आणि डिजिटल पद्धतीमुळे क्लेम पास करून देण्यासाठीच्या दलालांची मध्यस्थी राहणार नाही. कागदपत्रे अपडेट केल्यावर विमा रक्कम थेट मयत शेतकऱ्याच्या वारसदाराच्या बँक खात्यात जमा होईल. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) पद्धतीने ही रक्कम जमा होईल. आधार कार्ड आणि महत्त्वाची कागदपत्रे ऑनलाईन जमा केल्यावर लागलीच पुढील प्रक्रिया पूर्ण होईल.

Follow Us