AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Onion : नाशकात नव्हे पुण्यात कांद्याला अधिकचे मार्केट, नाफेडच्या वांद्यामुळे शेतकरी संभ्रमात

सध्या राज्यभरातील बाजारपेठेतून नाफेडकडून कांद्याची खरेदी केली जात आहे. कमी भावात कांद्याची खरेदी करुन त्याची साठवणूक करायची आणि बाजारपेठेतले दर वाढतच पुन्हा साठवणुकीतला कांदा बाहेर काढून दरात समतोल राखला जावा हे सरकारचा यामागचा उद्देश आहे. असले तरी सध्या जी कांद्याची खरेदी केली जात आहे.

Onion : नाशकात नव्हे पुण्यात कांद्याला अधिकचे मार्केट, नाफेडच्या वांद्यामुळे शेतकरी संभ्रमात
काद्याची आयात सुरु असल्याने दरात घट कायम आहे.
| Updated on: Jun 19, 2022 | 3:42 PM
Share

नाशिक : (Onion Market) कांद्याची मुख्य बाजारपेठ म्हणून नाशिकची संबंध राज्यात वेगळी अशी ओळख आहे. असे असले तरी सध्या चर्चा सुरु आहे ती पुणे मार्केटची कारण पुण्यात (Onion Rate) कांद्याला प्रति क्विंटल 1 हजार 787 असा दर आहे तर मुख्य आगारात 1 हजार 509 रुपये क्विंटल असा दर मिळत आहे. आता हे कसं शक्ययं असा सवाल तुम्हाला पडला असेल. ही किमया काही व्यापाऱ्यांची नाहीतर (NAFED) नाफेडची आहे. सध्या नाफेडकडून राज्यात ठिकठिकाणी कांदा खरेदी सुरु आहे. नाफेड ही एक सरकारची संस्था असून किमान या संस्थेने तरी दरात दुजाभाव करायला पाहिजे नाही. मात्र, बाजारपेठेनुसार आपले धोरण बदलून एक प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक यामाध्यमातून केली जात आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या या संस्थेकडूनच अशी फसवणूक होत असल्याने केंद्रीय कृषिमंत्र्याकडे तक्रारही करण्यात आली आहे.

नाफेडकडून कांद्याची खरेदी

सध्या राज्यभरातील बाजारपेठेतून नाफेडकडून कांद्याची खरेदी केली जात आहे. कमी भावात कांद्याची खरेदी करुन त्याची साठवणूक करायची आणि बाजारपेठेतले दर वाढतच पुन्हा साठवणुकीतला कांदा बाहेर काढून दरात समतोल राखला जावा हे सरकारचा यामागचा उद्देश आहे. असले तरी सध्या जी कांद्याची खरेदी केली जात आहे. त्या कांद्याचे राज्यातील दर एकसमान असणे गरजेचे आहे. यासंदर्भात शेतकरी संघटनेने वेळोवेळी आवाज उठवला असताना देखील अनियमितता ही सुरु आहे. त्यामुळे नाफेडला कांदा विकावा नाही यावर शेतकरी संघटना आता निर्णय घेणार आहे.

नेमका दरात फरक कसा ?

सध्या कांद्याच्या दरात घसरण झाली आहे हे तर सर्वश्रुत आहे. पण नाफेडने किमान राज्यात तरी एकाच दरात कांदा खरेदी करणे गरजेचे आहे. तसे न करता नाफेडकडून दोन दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यामध्ये 1 हजार 509 रुपये प्रति क्विंटलप्रमाणे कांदा घेतला गेला तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यात मात्र, 1 हजार 787 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे खरेदी कऱण्यात आली. त्यामुळे हान दुजाभाव का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शेतकऱ्यांचा कांदा शेतकऱ्यांनाच महागात

सध्या नाफेडकडून 1 ते 1 हजार 500 रुपये दरम्यान कांद्याची खरेदी केली जात आहे. बाजारपेठेत कमी दर असला की नाफेडकडून खरेदी केली जाते. शिवाय या कांद्याची साठवणूक ही ठरलेली आहे. भविष्यात कांद्याचे दर सरासरीपेक्षा वाढले तर मात्र, हा शेतकऱ्यांजवळील घेतलेला कांद्याची आवक वाढवून दर नियंत्रणात आणले जातात. गतवर्षी असाच प्रकार घडला होता. त्यामुळे अनेक शेतकरी हे नाफेडला कांदा विक्रीसाठी तयार नाही. मात्र, दरात अशाप्रकारे तफावत निर्माण नाफेड खरेदी करीत आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.