Shetaraste Yojana: शेतकऱ्यांना मोठा दिलासा, मातोश्री योजनेबाबत काय निर्णय? शेत रस्त्यांचा मार्ग मोकळा

Matoshree Shetaraste Yojana: मनरेगा कायद्यातील बदलांमुळे मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेचे काय होणार, असा सवाल विचारल्या जात होता. याविषयीची चिंता शेतकऱ्यांना वाटत होती. मात्र आता एक मोठा निर्णय सरकारने घेतला आहे.

Shetaraste Yojana: शेतकऱ्यांना मोठा दिलासा, मातोश्री योजनेबाबत काय निर्णय? शेत रस्त्यांचा मार्ग मोकळा
मातोश्री योजनेबाबत काय निर्णय? शेत रस्त्यांचा मार्ग मोकळा
| Updated on: Nov 21, 2026 | 2:51 PM

Matoshree Shetaraste Yojana : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील (MGNREGA) बदलांमुळे मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेचे काय होणार? अशी चिंता राज्यातील शेतकऱ्यांना लागली होती. पण बळीराजांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. याविषयीचा दिलासादायक निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने ही योजना नवीन स्वरुपात सुरू ठेवायला मंजूरी दिली आहे. त्यामुळे मनरेगा आता इतिहासजमा झाली असली तरी राज्यातील शेती आणि पाणंद रस्त्यांची कामे विना अडथळा सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.

मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब

Loading...

मनरेगा कायद्यातील बदलामुळे मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेच्या अंमलबजावणीवर आणि निधीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात होती. याविषयी शेतकऱ्यांच्या तक्रारींचा सूर आल्यावर राज्य मंत्रिमंडळाने गेल्या महिन्याच्या अखेरीस 27 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत या योजनेला नवीन कायद्याशी जोडले. त्यानंतर या योजनेतंर्गत शेत आणि पाणंद रस्ते तयार करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. तर काल परवा 17 नोव्हेंबर 2026 रोजी याविषयीचे शासन परिपत्रकही जारी करण्यात आले.

VB-G-Ram-G योजनेतून कामे

नवीन शासन निर्णयानुसार, मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना आता केंद्र सरकारच्या विकसीत भारत-जी राम जी या बदलेल्या योजनेतंर्गत पूर्ण होतील. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या समन्वयातून ही योजना राबवली जाणार आहे. या राज्यस्तरीय योजनेला जिल्हास्तरीय योजना म्हणूनही मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून आता शेत आणि पाणंद रस्ते पूर्ण करता येतील. यामुळे नवीन कामे तर होतीलच. पण रखडलेल्या योजना सुद्धा पूर्ण होतील.

बाजारपेठ येणार जवळ

ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत होत आहे. पण शेतात जाण्यासाठी आजही धड रस्ते नाहीत. नेमकी ही अडचण हेरून ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना’ राज्यात सुरू करण्यात आली आहे. भौगोलिक माहिती प्रणालीची (Geographic Information Systems-GIS) मदतीने शिवरस्त्यांना एक भू-सांकेतिक क्रमांक देण्यात येत आहे. या रस्त्यांची सातबारा उताऱ्यावर नोंद होत आहे. या रस्त्यावरून भविष्यात वाद, तंटे उद्भवू नये यासाठी हे डिजिटल रेकॉर्ड तयार केले जात आहे.

आता या योजनेसोबतच मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेलाही बळ मिळाल्याने ग्रामीण भागात पाणंद आणि शेत रस्ते निर्मितीला वेग येणार आहे. त्यासोबतच ग्रामीण भागात रोजगार आणि कामही उपलब्ध होईल. शेतकऱ्यांना रस्ते तयार झाल्याने बाजारपेठ लवकर गाठता येईल. शेतीच्या यांत्रिकीकरणाला चालना मिळणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us