केंद्रानं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किती पैसे दिले? विनायक राऊतांच्या प्रश्नाला केंद्रीय कृषी मंत्र्यांचं उत्तर

केंद्र सरकारनं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकारने 2020-21 मध्ये 12 वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून एकूण 1,149.10 कोटी रुपयांचे वाटप केले

केंद्रानं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किती पैसे दिले? विनायक राऊतांच्या प्रश्नाला केंद्रीय कृषी मंत्र्यांचं उत्तर
प्रातिनिधिक फोटो

नवी दिल्ली: केंद्र सरकारनं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकारने 2020-21 मध्ये 12 वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून एकूण 1,149.10 कोटी रुपयांचे वाटप केले. लोकसभेत अतारांकित प्रश्नाद्वारे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मोदी सरकारनं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं उतप्न्न दुप्पट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती मागितली होती.

महाराष्ट्राला 1149 कोटी रुपये दिले

कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शिवसेनेचे खासदार राऊत यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर दिलं आहे. सन 2021 मध्ये मध्ये महाराष्ट्राला राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (एनएफएसएम) साठी 153.36 कोटी, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजेसाठी 400 कोटी, एनएफएसएम (ओएस अँड ओपी) योजनेसाठी 39.38 कोटी रुपये, कृषी यांत्रिकीकरणातील (एसएमएएम) उप-अभियानासाठी 77.92 कोटी रुपये. मृदा आरोग्य कार्ड (एसएचसी) योजनेसाठी 0.46 कोटी रुपये, राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी 290.88 कोटी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन एजन्सी (आत्मा) योजनेसाठी 17.41 कोटी, आरएडी योजनेसाठी 19 कोटी, एकात्मिक फळबाग विकास मिशनसाठी 130 कोटी रुपये, शेती वनीकरणासाठी 2 कोटी आणि परंपरागत कृषी विकास योजनेसाठी 13 कोटी रुपये महाराष्ट्राला देण्यात आले आहेत.

भाजपची महाविकास आघाडी सरकारवर टीका

केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या दुप्पट वाढीसाठी दिलेला निधी जाहीर केल्याने भाजपचे प्रवक्ते उदय प्रताप सिंह यांनी ठाकरे सरकारला फटकारले. उदय प्रताप सिंह यांनी महाराष्ट्र सरकारला सर्वतोपरी मदत केली जात आहे. परंतु, राज्य सरकार स्वतःराज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी काही करू इच्छित नाही, असा आरोप केला.

5 वर्षांत महाराष्ट्राला किती पैसे दिले

पाच वर्षात राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने 12 योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राला सुमारे 6353.97 कोटी रुपये वाटप केले आहे.

पीएम किसान योजनेचा नववा हप्ता लवकरच

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा नववा हप्ता लवकरच जारी करण्यात येणार आहे. मोदी सरकारच्या सर्व योजनांमध्ये पीएम किसान योजना सर्वात यशस्वी असल्याचे म्हटले जाते. या योजनेंतर्गत सरकार देशातील शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत करते. पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देशातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपये मिळतात. प्रत्येकी 2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवली जाते.

इतर बातम्या:

सोयाबीनचे दर विक्रमी पातळीवर, आवक कमी असताना मागणी वाढल्यानं किंमती वाढल्या

कोरोना काळात नोकरीची अनिश्चितता, इंजिनिअर, एमबीए तरुणांनी कुक्कुटपालनाची धरली वाट

Monsoon Alert : राज्यात पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, IMD कडून रेड, ऑरेंज आणि यलो ॲलर्ट जारी

Modi government gave an amount of Rs 1,149 crore in a year 2020-21 to double the income of the farmers of Maharashtra

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI