Sugarcane : अतिरिक्त उसावर आता निसर्गाचीही अवकृपा, पश्चिम महाराष्ट्रातील हार्वेस्टर मराठवाड्यात मग अडसर कशाचा?

Sugarcane : अतिरिक्त उसावर आता निसर्गाचीही अवकृपा, पश्चिम महाराष्ट्रातील हार्वेस्टर मराठवाड्यात मग अडसर कशाचा?
साखऱ कारखाना

यंदा अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर झाला आहे. यावर पर्याय म्हणून एक ना अनेक उपाय समोर आले होते. अखेर पश्चिम महाराष्ट्रातील ऊसतोडणीची यंत्रे मराठवाड्यातील अतिरिक्त उसाच्या क्षेत्राकडे पाठवून हा प्रश्न मार्गी लावण्यावर एकमत झाले. शिवाय ऊस तोडणीची यंत्रेही दाखल झाली आहेत. पण गेल्या दोन दिवसांमध्ये लातूर जिल्ह्यातील ग्रीन बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांजरा नदीकाठच्या परिसरात पावसाने हजेरी लावली आहे.

राजेंद्र खराडे

|

May 23, 2022 | 6:02 AM

लातूर : आतापर्यंत (Surplus Sugarcane) अतिरिक्त उसाला प्रशासन आणि साखर कारखाने यांना जबाबदार ठरवले जात होते. यावर उपाययोजना म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील ऊस तोडणी यंत्र आता मराठवाड्यात दाखल झालेले आहेत. असे असताना आता (Sugarcane Sludge) उसतोडणीला पावसाचा अडसर होत आहे. दोन दिवसांपासून (Marathwada) मराठवाड्यातील लातूर, परभणी, जालना जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे ही ऊसतोडणीची यंत्रे आता उसाच्या फडातही जाणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे दुष्काळात तेरावा अशीच काहीशी अवस्था ऊस उत्पादकांची झाली आहे. आता ऊसतोडीचे यंत्रे असताना पावसामुळे बंद ठेवावी लागली आहेत.

प्रशासनाच्या नियोजनाला पावसाचा अडसर

यंदा अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर झाला आहे. यावर पर्याय म्हणून एक ना अनेक उपाय समोर आले होते. अखेर पश्चिम महाराष्ट्रातील ऊसतोडणीची यंत्रे मराठवाड्यातील अतिरिक्त उसाच्या क्षेत्राकडे पाठवून हा प्रश्न मार्गी लावण्यावर एकमत झाले. शिवाय ऊस तोडणीची यंत्रेही दाखल झाली आहेत. पण गेल्या दोन दिवसांमध्ये लातूर जिल्ह्यातील ग्रीन बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांजरा नदीकाठच्या परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे यंत्रे शेतामध्ये जाणेही मुश्किल झाले आहे. ऊसाच्या गाड्या फडातच अडकत आहेत तर तोडणीसाठीही अडथळा निर्माण होत आहे.

प्रशासानाचे नियोजन काय ?

अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आतापर्यंत एक ना अनेक पर्याय समोर आले आहेत. यंदा हंगाम लांबला तरी संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय धुराडी बंद करु नये असे आदेशच साखर आयुक्त यांनी कारखाना प्रशासनाला दिले आहेत. मे अखेरपर्यंत ऊसतोड पूर्ण व्हावे या अनुशंगाने साखर आयुक्त प्रशासनाने नियोजन केले होते. पण यंदा पावसाळा लवकरच सुरु होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. एवढेच नाही तर पावसाला काही भागात सुरवातही झाली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या नियोजनावरही पाणी फेरले असल्याचे चित्र आहे.

हे सुद्धा वाचा

यंदा 7 महिने कारखान्याची धुराडी पेटलेलीच

दरवर्षी 4 महिन्यात हंगाम पूर्ण होत असतो. पण यंदा अतिरिक्त उसामुळे सर्वकाही नियोजन कोलमडले आहे. ऊसाचे गाळप आणि साखरेचे उत्पन्न विक्रमी झाले असले तरी दुसरीकडे काही शेतकऱ्यांचा जीव हा टांगणीलाच लागलेला आहे. आता प्रशासनाकडून उपाययोजनेची अंमबलबजावणी करण्यास सुरवात झाली होती. पण याला निसर्गाचाच अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदा गाळप हंगाम पूर्ण होतो की नाही याबाबत शंका आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें