Fertilizer : रासायनिक खताची चढ्या दराने विक्री, विक्रेत्यांवर निर्बंध लादण्याचे कृषी विभागासमोर आवाहन

खरीप हंगामात उत्पादन वाढीसाठी डीएपी खतालाच अधिकची मागणी असते. शेतकऱ्यांच्या या मागणीचाच गैरफायदा हे विक्रेत्ये घेत आहेत. या खताची मूळ किंमत यंदा 1 हजार 350 एवढी आहे तर सध्या बाजारपेठेत 1 हजार 450 ने विक्री सुरु आहे. एका पोत्यामागे 100 रुपये अधिकचे आकारले जात आहेत. त्यामुळे कृषी विभागाने पथकांची नेमणूक केली मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याने विक्रेत्यांची मनमानी वाढत आहे.

Fertilizer : रासायनिक खताची चढ्या दराने विक्री, विक्रेत्यांवर निर्बंध लादण्याचे कृषी विभागासमोर आवाहन
रासायनिक खत
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 4:45 PM

हिंगोली :  (Kharif Season) खरीप हंगामपूर्व बैठकांची औपचारिकता पूर्ण करुन सर्वकाही अलबेल असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न हा नित्याचाच झाला आहे. मात्र, बैठकीतील नियम, अटी आणि विक्रेत्यांनी कोणत्या बाबींचे पालन करायचे याबाबत कोणतेच गोष्टीचे पालन स्थानिक पातळीवर होत नाही. अजून (Seeds & Fertilizer) बियाणे आणि खताच्या मागणीला सुरवात व्हायची आहे असे असतानाच खते अधिकच्या दराने विक्री केली जाऊ लागली आहेत तर लिंकिंग यंदाही कायम राहणार असल्याचे विक्रेत्ये सांगत आहेत. त्यामुळे (Central Government) केंद्राने शेतकऱ्यांना महागाईच्या झळा बसू नये खतावर अनुदान वाढवले आहे. मात्र, स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांची लूट ही सुरुच आहे.

डीएपी खतामध्ये शेतकऱ्यांची लूट

खरीप हंगामात उत्पादन वाढीसाठी डीएपी खतालाच अधिकची मागणी असते. शेतकऱ्यांच्या या मागणीचाच गैरफायदा हे विक्रेत्ये घेत आहेत. या खताची मूळ किंमत यंदा 1 हजार 350 एवढी आहे तर सध्या बाजारपेठेत 1 हजार 450 ने विक्री सुरु आहे. एका पोत्यामागे 100 रुपये अधिकचे आकारले जात आहेत. त्यामुळे कृषी विभागाने पथकांची नेमणूक केली मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याने विक्रेत्यांची मनमानी वाढत आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन विक्रेत्ये अधिकचा दर तर आकरतातच पण कृत्रिम टंचाई निर्माण करुन शेतकऱ्यांना अडचणीतही आणत आहेत.

लिंकिंगचा नियम वाऱ्यावर

शेतकऱ्यांने डीएपी खत विकत घेतले की त्याला लागूनच इतर खतही खरेदी करावे लागते. इतर कंपनीचे खत विक्री व्हावे म्हणून असा फंडा विक्रेत्ये काढत आहेत पण लिंकिंगने खताची खरेदी करावी असे बंधन नाही. याबाबत कृषी विभागाने आढावा बैठकीत सूचनाही केल्या आहेत पण खत खरेदी करताना आता लिंकिंगशिवाय खरेदी करता येणार नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कृषी विभाग आणि विक्रेत्ये यामध्ये शेतकऱ्यांची लूट ही ठरलेलीच आहे.

हे सुद्धा वाचा

बियाणे किंमतीमध्येही वाढ

यंदा बिजोत्पादनाचा प्रयोग मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याने बियाणांची टंचाई निर्माण होणार नाही अशी स्थिती होती. मात्र, अधिकच्या तापमनामुळे सोयाबीनच्या दर्जावर परिणाम झाला होता. त्यामुळे हे बियाणे आता वापरण्यायोग्य राहणार नाही. त्यामुळे पुन्हा महाबीजला महत्व निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन दरवाढ केल्याचा आरोप अनिल बोंडे यांनी केला आहे. 2 हजार रुपयांची वाढ म्हणजेच 2 हजार 200 रुपयांना असणारी सोयाबीनची 30 किलोची बॅग ही आता 4 हजार 200 रुपयांना मिळणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.