AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू, ग्राहकांचे मात्र वांदे..!

खरीपातील पीकाचे पावसाने नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांना कांद्याने मोठा आधार दिला आहे. कांद्याचे दर हे वाढतच आहेत. बुधवारी कांद्याला सर्वाधिक 4393 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. शिवाय कांद्याची आवक ही कमी असल्याने दर अजून वाढतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू, ग्राहकांचे मात्र वांदे..!
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 14, 2021 | 2:37 PM
Share

लातूर : कांदा (Onion) हे नगदी पीक असून कधी शेतकऱ्यांच्या (Farmer) डोळ्यात तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणारे पीक आहे. सध्या मात्र, शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत पण ते आनंदाश्रू. कारण खरीपातील पीकाचे पावसाने नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांना कांद्याने मोठा आधार दिला आहे. कांद्याचे दर हे वाढतच आहेत. बुधवारी कांद्याला सर्वाधिक 4393 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. शिवाय कांद्याची आवक ही कमी असल्याने दर अजून वाढतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कांद्याचे दर वाढण्यासही पाऊसच जबाबदार आहे. पावसामुळे 40 ते 50 टक्के क्षेत्रावरील कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक घटली असून दर हे वाढलेले आहेत. आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव येथे 13 ऑक्टोबर रोजी कमाल किंमत 4134 रुपये होती, तर किमान 1200 रुपये आणि सर्वसाधारण किंमत 3550 रुपये होती. सर्वाधिक किंमत पिंपळगाव मंडी येथे होती. सामान्यत: कांद्याचा वापर हे कमी झालेला आहे. मात्र, नवरात्र उत्सवामुळे हा दर असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणने आहे.

पावसाचा परिणाम कांद्याच्या दरावर

पावसामुळे कांद्याची नासाडी झालेली आहे. कांद्याला दर नसला की त्याची साठवणूक करून ठेवली जाते. एप्रिल-मे मध्ये साठवणूक केलेला कांद्याचे पावसामुळे व पूरामुळे मोठे नुकसान झालेले आहे. कांदा हा सडलेल्या अवस्थेत आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, उस्मानाबाद आणि लातूर आदी ठिकाणी ठेवलेला कांदा पूर आणि पावसात भिजला होता. तर नाशिक, अहमदनगर, धुळे, सोलापूर आणि जळगाव मध्ये अनेक शेतकऱ्यांचे कांदे ओलाव्यामुळे सडले होते. त्यामुळे लासलगाव बाजारपेठेत आवक ही कमी होत आहे. तेव्हा मागणी आणि पुरवठा यांच्यात तफावत असेल आणि किंमत वाढेली आहे.

कांदा वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील

कांदा हा नाशवंत आहे. त्यामुळे कांद्याची योग्य प्रकारे साठवणूक करणे आवश्यक आहे. कांदा साठवणूकीसाठी शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. नविन लागवड केलेल्या कांद्याचेही पावसामुळे नुकसान झाले आहे. शिवाय किड रोगराईचाही प्रादुर्भावही झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे असलेल्या कांद्याचीच साठवणूक करणे गरजेचे आहे. कांद्याचा ठोक बाजारात दर वाढल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

परराज्यातही पीकाचे नुकसान

महाराष्ट्र नंतर उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात असते. मात्र, येथील कांद्यावरही वातावरणाचा परिणाम झालेला आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम झालेला आहे. वादळी वाऱ्याचाही परिणाम कांदा उत्पादनावर झाला असून आता कांद्याच्या दरात वाढ होत आहे. शिवाय उत्पादनात घट झाल्याने भविष्यातही दर वाढतील असाच अंदाज व्यक्त होत आहे. (Onion prices rise, farmers satisfied, consumers distressed, Lasalgaon market has highest rates)

संबंधित बातम्या :

आगोदर प्रोत्साहन अन् आता हात आखडता, शेतकरी कंपन्या अडचणीत

सोयाबीन 5 हजार रुपये क्विंटल तर काढणीला मजुरावर एकरी 5 हजाराचा खर्च

मराठवाड्यातील नुकसानभरपाईसाठी आवश्यकता अडीच हजार कोटींची, अन्

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.