Ajit Pawar : सत्तार म्हणतात ओला दुष्काळ नाही, विरोधक मात्र याच मागणीवरुन घेरणार.! काय आहेत विरोधकांचे संकेत?

17 ऑगस्टपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. यामध्ये राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा ही प्रमुख मागणी राहणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे पिकांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. भविष्यातही कोणत्या पिकाची शाश्वती नाही असे असतानाही पावसामध्ये सातत्य हे आहेच. शेतकऱ्यांची स्थिती आणि त्यांच्या व्यथा जाणून राज्यात ओला दुष्काळ जाहिर करुण सर्वतोपरी मदत देणे गरजेचे आहे.

Ajit Pawar : सत्तार म्हणतात ओला दुष्काळ नाही, विरोधक मात्र याच मागणीवरुन घेरणार.! काय आहेत विरोधकांचे संकेत?
कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि विरोधीपक्षनेते अजित पवार
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 4:52 PM

मुंबई : बुधवारपासून विधीमंडळाचे (Monsoon Session) पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. राज्यात पावसाने हाहाकार घातल्याने (Kharif Season) खरीप पिकांचे नुकसान तर झालेच आहे पण तब्बल दीड महिन्यापासून पावसामध्ये सातत्य असल्याने पिके पाण्यात आहेत. केवळ पिकांचेच नाहीतर घरांचीही पडझड झाली आहे. त्यामुळे राज्यात (Wet drought) ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी विरोधकांकडून गेल्या काही दिवसांपासून होत आहे. मात्र, तशी परस्थिती नसल्याचे सत्ताधारी यांनी आतापर्यंत सांगितलेले आहे. शिवाय कृषी खात्याच्या कारभार घेतल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी आवर्जुन हा ओला दुष्काळ नाही, शिवाय त्याची घोषणा करण्यासारखी परस्थिती तर नाहीच पण त्यासाठी नियम-अटी असल्याचेही सांगितले आहे. तर दुसरीकडे ओला दुष्काळ जाहीर करा हीच आमची मागणी असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ठणकावून पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे. आता उद्यापासून सुरु होत असलेल्या अधिवेशनात शेतकऱ्यांना मदत हाच मुद्दा केंद्रस्थानी असणार आहे.

काय म्हणाले विरोधीपक्षनेते?

17 ऑगस्टपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. यामध्ये राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा ही प्रमुख मागणी राहणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे पिकांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. भविष्यातही कोणत्या पिकाची शाश्वती नाही असे असतानाही पावसामध्ये सातत्य हे आहेच. शेतकऱ्यांची स्थिती आणि त्यांच्या व्यथा जाणून राज्यात ओला दुष्काळ जाहिर करुण सर्वतोपरी मदत देणे गरजेचे आहे. सध्याच्या स्थितीनुसार जिरायती क्षेत्राल हेक्टरी 75 हजार रुपये तर बागायती क्षेत्रासाठी हेक्टरी 1 लाख 50 हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

हा ओला दुष्काळ नाही, मदतीसाठी सरकार कटीबद्ध

अब्दुल सत्तार हे आता कृषिमंत्री असणार आहे. खातेवाटपानंतर त्यांनी मंगळवारी प्रथमच कृषी विभागाचा आढावा घेतला. राज्यातील नुकसानीचे क्षेत्र आणि प्रत्यक्ष किती क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे याचा त्यांनी आढावा घेतला आहे. पण राज्यात ओला दुष्काळ जाहिर करावा अशी स्थिती नाही. शिवाय त्यासाठी काही नियम अटी ह्या ठरवून दिलेल्या असल्याचे त्यांनी आढावा बैठकीतच सांगितले होते. पण आता विरोधकांकडून मागणीचा जोर वाढला तर काय हे आधिवेशनातच पहावे लागणार आहे.

15 लाख हेक्टराहून अधिकचे नुकसान

अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील तब्बल 15 लाख हेक्टराहून अधिकच्या क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आढावा घेऊन नुकसानभरपाईचे स्वरुप कसे असणार हे स्पष्ट केले आहे. वाढीव मदतीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार की विरोधकांच्या मागणीनुसार ओल्या दुष्काळाची घोषणा होणार हे पहावे लागणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.