नागरसोलमधून 100 वी किसान रेल्वे धावली, आतापर्यंत 33 हजार टन कांद्याची वाहतूक

| Updated on: Mar 28, 2021 | 6:29 PM

नाशिक जिल्ह्यातील नागरसोल रेल्वे स्थानकातून 100 वी किसान रेल्वे आज धावली. Kisan Railway Nagarsol railway station

नागरसोलमधून 100 वी किसान रेल्वे धावली, आतापर्यंत 33 हजार टन कांद्याची वाहतूक
किसान रेल्वे
Follow us on

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2020-21 चा अर्थसंकल्प जाहीर करताना किसान रेल्वेची घोषणा केली होती. ऑगस्ट 2020 मध्ये सुरु झालेल्या किसान रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावार वाढ करण्यात आली आहे. तसेच विविध ठिकाणाहून किसान रेल्वेच्या फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील नागरसोल रेल्वे स्थानकातून 100 वी किसान रेल्वे आज धावली. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी याविषयी ट्विट करुन माहिती दिली आहे. ( Piyush Goyal tweet 100th Kisan Railway departed from Nagarsol railway station)

पियुष गोयल काय म्हणाले?

महाराष्ट्रातील नागरसोल रेल्वेस्थानकातून 100 वी किसान रेल्वे धावली. या किसान रेल्वेमार्फत 33 हजार 885 टन कांदा आणि 190 टन द्राक्षांची निर्यात करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात किसान रेल्वे सुरु करण्यात आल्या. याचा फायदा शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांना झाला, असं पियुष गोयल म्हणाले.

पियुष गोयल यांचं ट्विट

देशातील पहिली किसान रेल्वे

ऑगस्ट 2020 मध्ये पहिली किसान रेल्वे महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील देवळाली ते बिहारच्या दानापूर इथपर्यंत चालवली गेली. किसान रेलच्या पहिल्या गाडीला केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी हिरवा झेंडा दाखवला. रेल्वेनं सुरु केलेला किसान रेल प्रकल्प भाजी, शेतमाल, फळे आणि इतर नाशवंत शेतमालाच्या वेगवान वाहतुकीसाठी आहे. यासाठी रेल्वेनं कृषी मंत्रालयाचं सहकार्य घेतलं आहे. किसान रेलचा वाढता प्रतिसाद पाहून देवळाली ते दानापूरच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. तर, देवळाली ते बिहारमधील दानापूरचा टप्पा वाढवण्यात आला आहे. कोल्हापूर-सांगोला- मनमाड ही लिंक एक्स्प्रेस सुरु करण्यात आली. बिहारमध्येही दानापूरपासून मुझ्झफरपूरपर्यंत मार्ग वाढवण्यात आला.

वाहतुकीच्या भाड्यात 50 टक्के सूट

किसान रेल्वे प्रकल्पाद्वारे शेतमाल दुसऱ्या राज्यामंध्ये पाठवण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून 50 टक्के सूट देण्यात येत असल्याची घोषणा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. गेल्यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पानुसार दूध, मटण, मासे, भाज्या, शेतमालाच्या वाहतुकीसाठी किसान रेल प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. यांअतर्गत शेतकऱ्याचा शेतमाल मोठ्या पातळीवर वेगवेगळ्या राज्यात पोहोचवण्याचं उद्दिष्ठ आहे.

संबंधित बातम्या:

Kisan Railway | किसान रेल्वे शेतमाल वाहतुकीमध्ये गेमचेंजर ठरेल?

( Piyush Goyal tweet 100th Kisan Railway departed from Nagarsol railway station)