ममता बॅनर्जींनंतर त्यांच्या कुटुंबातून केवळ ही व्यक्ती ‘मुख्यमंत्री’ पदाची दावेदार, भाजपकडून घेरण्याची तयारी

केंद्रीय तपास संस्थेने (CBI) पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुतण्या आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कोलकातामधील घरी त्यांच्या पत्नी रुजिरा बॅनर्जींची चौकशी केली.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:00 PM, 23 Feb 2021
ममता बॅनर्जींनंतर त्यांच्या कुटुंबातून केवळ ही व्यक्ती ‘मुख्यमंत्री’ पदाची दावेदार, भाजपकडून घेरण्याची तयारी

कोलकाता : केंद्रीय तपास संस्थेने (CBI) पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुतण्या आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कोलकातामधील घरी त्यांच्या पत्नी रुजिरा बॅनर्जींची चौकशी केली. सीबीआयने याआधी त्यांना कोळसा चोरी प्रकरणी नोटीस दिली होती. या चौकशीनंतर पश्चिम बंगालमधील राजकीय पार चढलाय. तृणमुल काँग्रेसने भाजपवर सीबीआयचा उपयोग करुन दडपण्याचा आरोप केलाय. तसेच आम्ही बंदुकांशी लढा दिलाय, उंदरांना घाबरणार नाही, असंही सुनावलं (Who will be next CM candidate from TMC after Mamata Banerjee in West Bengal).

पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मेमध्ये निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून भाजपच्या दिग्गज नेत्यांनी पश्चिम बंगालमध्ये सभा आणि बैठकांचा धडाकाच लावलाय. त्यातच आता खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या चौकशीने वातावरण तापलं आहे.

एकीकडे तृणमूल काँग्रेसने राजकीय दडपशाही म्हणत या कारवाीचा विरोध केलाय. दुसरीकडे भाजपने सीबीआय कारवाईचं राजकारण करु नये असं म्हटलंय. सीबीआयच्या या कारवाईनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका सभेत भाजपला थेट आव्हान दिलं. त्या म्हणाल्या, “आम्हाला तुरुंगाची भीती दाखवणं बंद करा. आम्ही बंदुकांविरोधात लढाई केलीय. त्यामुळे आम्ही उंदरांविरोधातील लढाईला भीत नाही.”

ममता बॅनर्जींचं कुटुंब सध्या प्रकाशझोतात

सीबीआयच्या एका पथकाने कोळसा चोरी प्रकरणी तृणमूल खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नीची बहिण मेनका गंभीर यांचीही चौकशी केली. यात त्यांच्या बँक खात्यांचीही माहिती घेण्यात आली.

ममता बॅनर्जींच्या घरातून कोण कोण राजकारणात?

भारतात एका राजकीय नेत्याच्या घरातील अनेक लोकं राजकारणात येतात. ममता बॅनर्जी यांचा विचार केला तर त्यांच्याशिवाय त्यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी राजकारणात आहे. ममता बॅनर्जी राजकारणात आल्या तेव्हा त्यांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. ममता बॅनर्जी लहान असतानाच त्यांचे वडील प्रोमिलेश्वर बॅनर्जी यांचं निधन झालं. ममता बॅनर्जी आपली आई गायत्री देवी यांच्यासोबत मोठ्या झाल्या. मात्र, 2011 मध्ये त्यांच्या आई गायत्री देवींचंही निधन झालं. ममता बॅनर्जी यांना 5 भाऊ आहेत. अमित बॅनर्जी, बबुन बॅनर्जी, कली बॅनर्जी, गणेश बॅनर्जी, अजीत बॅनर्जी, समीर बॅनर्जी अशी त्यांची नावं आहेत. अभिषेक बॅनर्जी अमित बॅनर्जी यांचे चिरंजीव आहेत. ममता यांना बहिण नाही.

हेही वाचा :

आधी भाजप नेत्या पामेलाला ड्रग्जसह रंगेहाथ पकडलं, आता थेट ममतांच्या पुतण्यावर CBI च्या धाडी

कोळसा घोटळा : सीबीआयची ममता बॅनर्जींचे पुतणे अभिषेक यांच्या पत्नीला नोटीस

‘जिवंत आहे तोपर्यंत भाजपला बंगालमध्ये संधी नाही’, ममता बॅनर्जींचं आव्हान

व्हिडीओ पाहा :

Who will be next CM candidate from TMC after Mamata Banerjee in West Bengal