Crop Cover | ‘त्याने’ केले पुर्वनियोजन, म्हणूनच 850 हेक्टरापैकी केवळ 3 एकरातील द्राक्ष बागेचे झाले संरक्षण

| Updated on: Dec 13, 2021 | 11:05 AM

दिवसेंदिवस वातावरणातील बदलाचा फटका त्यामुळे परिश्रमापेक्षा नियोजनाला अधिक महत्व आले आहे. मध्यंतरीच्या अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टरावरील द्राक्ष बागा उध्वस्त झाल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील खिरमणी शिवारातील तर 850 हेक्टरावरील क्षेत्र बाधित झाले आहे पण यामध्ये अपवाद राहिला आहे तो 3 एकराच्या फडाचा.

Crop Cover | त्याने केले पुर्वनियोजन, म्हणूनच 850 हेक्टरापैकी केवळ 3 एकरातील द्राक्ष बागेचे झाले संरक्षण
नाशिक जिल्ह्यातील खरमणी शिवारात द्राक्ष बागेला प्लॅस्टिक अच्छादन केल्यामुळे अवकाळी पावसापासून बाग बचावली आहे
Follow us on

नाशिक : शेती आहे म्हणून करण्याचा विषय राहिलेला नाही. त्यासाठी योग्य नियोजन हे गरजेचे झाले आहे. शिवाय दिवसेंदिवस वातावरणातील बदलाचा फटका त्यामुळे परिश्रमापेक्षा नियोजनाला अधिक महत्व आले आहे. मध्यंतरीच्या (Untimely rains) अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टरावरील ( vineyards) द्राक्ष बागा उध्वस्त झाल्या आहेत. (Nashik) नाशिक जिल्ह्यातील खिरमणी शिवारातील तर 850 हेक्टरावरील क्षेत्र बाधित झाले आहे पण यामध्ये अपवाद राहिला आहे तो 3 एकराच्या फडाचा. या 3 एकरातील द्राक्ष बागेवर शेतकऱ्याने प्लॅस्टिक कॅाप कव्हर वापरल्याने यावर ना अवकाळी पावसाचा परिणाम झाला ना बदलत्या वातावरणाचा. दरवर्षी वातावरणातील बदलामुळे हा प्रयोग खिरमणी येथील उच्चशिक्षित तरुणाने केला आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पादन तर मिळणार आहे शिवाय द्राक्षांचा दर्जा कायम असल्याने अधिकचा दरही.

क्रॅाप कव्हरमुळे काय होतात फायदे?

द्राक्ष बाग ऐन बहरात असतानाच गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक संकट हे नित्याचेच झाले आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या बागा उध्वस्त होत आहेत. मात्र, क्रॅाप कव्हर तशी खर्चिक बाब असल्यामुळे शेतकरी याकडे दुर्लक्ष करतात पण खिरमणी येथील हंसराज भदाणे यांनी केवळ तीन एकरातील थॅामसन जातीच्या द्राक्ष बागेला क्रॅाप कव्हर वापरले आहे. यामुळे मुबलक प्रमाणात सुर्यप्रकाश मिळाला आहे. शिवाय रोगाचा प्रादुर्भाव हा कमी झाला आहे. पाऊस आणि गारपीटीपासून संरक्षण झाले आहे तर आता निर्यातक्षम द्राक्षांना अधिकचा दर मिळणार आहे. यामुळे तीन एकरातील बाग तर वाचली आहे पण आता इतर द्राक्षांपेक्षा अधिकचा दराची अपेक्षा भदाणे व्यक्त करीत आहेत.

प्लॅस्टिक अच्छादनासाठी एकरी 4 लाखाचे अनुदान

द्राक्षाच्या अच्छादनासाठी प्रशासकीय स्तरावर अनुदानाची योजना आहे. प्लॅस्टिक पेपरसाठी एकरी 2 लाख 50 हजार ते 3 लाख, अँगल व तारा बांधणी यासाठी 1 लाख असा प्रति एकरसाठी 4 लाख खर्च प्रस्तावित आहे. तुलनेत मागणीनुसार शासनाने जर निम्मे 50 टक्के अनुदान दिल्यास मोठी मदत झाली असती. पण याबाबत प्रशासकीय स्तरावर कोणताही निर्णय वेळेत झाला नाही. परिणामी द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे.

नुकसानीमुळे बागायत शेतकरी झाले कर्जबाजारी

द्राक्षे बागेतून अधिकचे उत्पादन असले तरी बाग जोपासण्यासाठी खर्च मोठ्या प्रमाणात करावा लागतो. शिवाय लागण केल्यापासून दोन दिवसांतून एकदा फवारणी ही ठरलेलीच आहे. शिवाय खर्च करुनही अंतिम टप्प्यात निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. यंदा तर उत्पादन कमी अन् खर्च अधिक अशीच परस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बागायत शेतकरी देखील यंदा कर्जबाजारी झाले आहेत. वर्षभराची मेहनत तर वायाच पण वाढत्या कर्जानुळे काय़ करावे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. आठ दिवसांमध्ये पंचनामे प्रक्रिया केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, हे आश्वासन हवेतच विरलेले आहे.

द्राक्ष काढणीच्या वेळी झाला असता उपयोग

दरवर्षी आता द्राक्ष काढणीच्या प्रसंगी निसर्गाचा लहरीपणा हा काय वेगळा रहिलेला नाही. त्यामुळे द्राक्ष बागांची तोडणी सुरु होताच अनुदनावर प्लॅस्टिक अच्छादन देण्याची मागणी ही जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यातील साटणा, मालेगाव, देवळा व कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली होती. यामुळे द्राक्षाचे संरक्षण झाले असते. पावसापूर्वीच 40 टक्के द्राक्षाची काढणी कामे झाले होती. उर्वरीत द्राक्षे ही या प्लॅस्टिक अच्छादनात सुरक्षित राहिली असते. मात्र, अनुदानाची मागणीकडे प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. या भागातील जवळपास 200 कोटींचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या एका निर्णयामुळे चित्र वेगळे राहिले असते असे, शेतकऱ्यांचे म्हणने आहे.

संबंधित बातम्या :

सोयापेंड आयातीला ‘ब्रेक’, तरीही सोयाबीनच्या दरात घसरण, काय राहणार बाजारपेठेतील भवितव्य ?

प्रतिकूल परस्थितीमध्ये जनावरांना ‘हे’ आहे पर्यायी खाद्य, योग्य नियोजनाद्वारे सकस आहार

पोल्ट्रीफार्म धारकांच्या चुकीच्या माहितीमुळे सोयापेंडच्या आयातीबाबत संभ्रमता : पाशा पटेल