
सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजारांची आर्थिक मदत देते. ही रक्कम पीएम किसान सन्मान निधी योनजेतंर्गत (PM Kisan Samman Nidhi) थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते. शेतकऱ्यांच्या खात्यात दरमहा 4 महिन्याच्या अंतराने 3 हप्त्यात दोन हजार रुपये जमा करण्यात येतात. सध्या योजनेतंर्गत 20 हप्ते जमा करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांना पुढील हप्त्याची प्रतिक्षा आहे.
21 वा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया अगोदरच सुरू झाली आहे. केंद्र सरकारने 26 सप्टेंबर रोजी पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील शेतकऱ्यांसाठी 21 वा हप्ता जमा केला. या राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले. अतिवृष्टी, महापूर आणि जमीन खचल्याने या राज्यातील अनेक भागांना मोठा फटका बसला. या राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात 540 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट बँक खात्यात जमा केली आहे.
जर 21 वा हप्ता प्राप्त करायचा असेल तर शेतकऱ्यांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. नाहीतर अशा शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार नाही. पीएम किसान योजनेच्या अधिकृत साईटवर जाऊन ओटीपीच्या माध्यमातून ही प्रक्रिया झटपट पूर्ण करता येते.
जे शेतकरी ई-केवायसीचे काम निर्धारीत वेळेत पूर्ण करणार नाही, त्यांना 2000 रुपयांचा हप्ता मिळणार नाही. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सीएससी केंद्रावर जाऊन अथवा साईटवर जाऊन लवकर ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करा. सर्व कागदपत्रे जोडा. जे शेतकरी ही प्रक्रिया पूर्ण करतात त्यांना योजनेचा लाभ मिळतो.
तर भू-सत्यापन, जमीन पडताळा हे काम या योजनेत शेतकऱ्यांना करावे लागते. जे शेतकरी हे काम करत नाहीत. त्यांना या योजनेतंर्गत कोणताही लाभ मिळत नाही. शेतकऱ्यांनी ही अट पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे मुदतीत शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीचे व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
अजून एक महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे आधार कार्ड बँकेशी लिंक करणे आवश्यक आहे. जर हे काम पूर्ण केले नसेल तर शेतकऱ्यांचा हप्ता थांबविण्यात येतो. जर हे काम अपूर्ण असेल तर ते तातडीने पूर्ण करा. कारण सरकार लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करते.
शेतकऱ्यांना येथे तक्रार करता येईल
ई-केवायसी पूर्ण झाले असेल तर लाभार्थ्याला रक्कम मिळण्यास अडचण येत नाही. बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेविषयी काही अडचण असल्यास शेतकर्यांनी हेल्पलाईन क्रमांक 1800-115-5525 वर संपर्क करावा. PM Kisan हेल्पलाईन 155261 वा 011-24300606 येथे कॉल करावा.