PM Kisan Yojana: एकत्र कुटुंब, चार भावांमध्ये कुणाला मिळेल पीएम किसानचा हप्ता? नियम वाचला का?
PM Kisan Yojana Rules: पंतप्रधान किसान योजनेचा 24 वा हप्ता काही शेतकर्यांच्या खात्यात जमा झाला नाही. संयुक्त कुटुंबातील कोणत्या सदस्यांना हप्ता मिळतो. चार भाऊ असतील तर कोणत्या भावाला या योजनेचा लाभ मिळेल. याविषयीचा काय नियम आहे?

PM Kisan Yojana Rules: पंतप्रधान किसान योजनेत शेतकर्यांना वर्षाला 6,000 रुपयांची आर्थिक मदत मिळते. वर्षातून तीन हप्ते थेट बँक खात्यात जमा होतात. प्रत्येकी 2 हजारांची मदत देण्यात येते. या योजनेतंर्गत आतापर्यंत 24 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. काही शेतकर्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली नाही. पण संयुक्त कुटुंबातील कोणत्या सदस्यांना हप्ता मिळतो. चार भाऊ असतील तर कोणत्या भावाला या योजनेचा लाभ मिळेल. याविषयीचा काय नियम आहे?
25 वा हप्ता कधी जमा होणार?
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 25 वा हप्ता आता पुढील वर्षी मिळेल. या योजनेचा 24 वा हप्ता 30 ऑक्टोबर 2026 रोजी वितरीत करण्यात आला. या योजनेत हप्ते वितरीत करण्याची पद्धत पाहता, दर चार महिन्यांनी पीएम किसान योजनेचा हप्ता जमा करण्यात येतो. त्यानुसार, 25 वा हप्ता फेब्रुवारी 2027 मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. याविषयीची अधिकृत तारीख अद्याप समोर आलेली नाही.
संयुक्त कुटुंबात कोणाला फायदा?
पीएम किसान योजनेबद्दल एक महत्त्वाचा प्रश्न आहे. संयुक्त कुटुंबात चार अथवा त्यापेक्षा अधिक भाऊ असतील तर या योजनेचा हप्ता कुणाला मिळेल? चार भाऊ जर एकाच घरात राहत असतील आणि एकत्रित कुटुंब असेल तर 6,000 रुपयांचा वार्षिक हप्ता कुणाला मिळेल? एका भावाला फायदा होईल की, चारही भावाला फायदा होईल? कुटुंबाचा दर्जा आणि शेतजमिनीचा मालक कोण आहे यावर हे गणित अवलंबून असते.
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या नियमानुसार, शेतकरी कुटुंबात पती, पत्नी आणि अल्पवयीन मुलांचा समावेश होते. केवळ एकाच घरात राहतात. अडनाव सारखे आहे म्हणून सर्व भाऊ शेतकरी कुटुंब ग्राह्य धरल्या जात नाही. जर प्रत्येक सदस्याच्या, भावाच्या नावावर लागवडीयोग्य जमीन असेल तर पीएम किसान योजनेचा लाभ घेता येतो. या चारही भावांना प्रत्येकी 6,000 रुपयांचा वार्षिक लाभ मिळू शकतो. चारही भाऊ या योजनेसाठी पात्र ठरू शकतात. म्हणजे जमिनीची मालकी वेगळी असेल तर एकाच कुटुंबात चार भावांना एकत्रित 24,000 रुपयांचा लाभ मिळेल.