नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8 वा हप्ता केव्हा? आली की आनंदवार्ता, या दिवशी खात्यात जमा होणार पैसा

Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana: पीएम किसान योजनेसारखीच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे. या योजनेच्या 8 व्या हप्त्याची अनेक दिवसांपासून शेतकर्‍यांना प्रतिक्षा होती. ही प्रतिक्षा आता संपली आहे. या दिवशी योजनेचा 8 वा हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होईल.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8 वा हप्ता केव्हा? आली की आनंदवार्ता, या दिवशी खात्यात जमा होणार पैसा
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 18, 2026 | 11:05 AM

Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana: राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता आली आहे. राज्य सरकारने, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची अपडेट दिली आहे. त्यानुसार, या योजनेचा 8 वा हप्ता पुढील आठवड्यात थेट शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. याविषयीचा शासन निर्णय आला आहे. या हप्त्यासाठी सरकारने 1,774 कोटींचा निधी वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे. राज्यातील पात्र 90 लाख 34 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे.

नमो शेतकरी योजनेत 6,000 रुपये दरवर्षी

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य देण्यात येते. पीएम किसान योजनेप्रमाणेच ही योजना राबविली जाते. पीएम किसान योजनेतून दरवर्षी 6 हजार रुपये देण्यात येते तर राज्य शासनाकडून 6,000 रुपये अनुदान दिले जाते. या योजनेमुळे आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी एकूण 12 हजार रुपये जमा होतात. या योजनेसाठी सरकारने 1,774 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. प्रत्यक्षात या योजनेसाठी 1,820 कोटी रुपये लागणार आहे. या निधीची तजवीज झाल्याने हा आठवडा पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.

योजनेतंर्गत 7 हप्ते शेतकर्‍यांच्या खात्यावर

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतंर्गत आतापर्यंत 7 हप्ते वितरीत करण्यात आले आहेत. पीएम किसान योजनेचा 8 वा हप्ता 13 मार्च 2026 रोजी शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाला. त्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर 8 वा हप्ता जमा करण्याच्या हालचाली सुरू केल्या. यापूर्वी पीएम किसान अतंर्गत दोन तर नमो शेतकरी योजनेतंर्गत दोन असे चार हजार रुपये या महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ॲग्री स्टॅक अनिवार्य

या योजनेसाठी ॲग्रीस्टॅक (Agri Stack) नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. पीएम किसान योजनेसाठी सुद्धा केवायसी आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक करण्यात आलेली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पण ही नोंदणी आवश्यक आहे. त्याशिवाय हा हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार नाही. तेव्हा जर तुम्ही ही नोंदणी केली नसेल तर लवकर ही प्रक्रिया पूर्ण करा.

Follow Us