“सपासप असा कोयत्याचा आवाज काळीज चिरत जातो, वाटते हे वार कोबीवर नसून आपल्याच छातीवर होत आहेत”

लॉकडाऊनची भीती आणि शेतमालाचे पडलेले दर यामुळं शेतकऱ्यांसमोर संकट उभं राहिलं आहे. farmers cutting cabbage due to fear of lockdown

"सपासप असा कोयत्याचा आवाज काळीज चिरत जातो, वाटते हे वार कोबीवर नसून आपल्याच छातीवर होत आहेत"
कोबी कापणी

कोल्हापूर: राज्यात सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक होत आहे. रविवारी महाराष्ट्रात 40 हजार 414 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. नागरिकांकडून कोरोना नियमांचं पालनं होत नसल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना लॉकडाऊनची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाचे पडसाद राज्यात उमटत असल्याचं दिसत आहे. लॉकडाऊनची भीती आणि शेतमालाचे पडलेले दर यामुळं शेतकऱ्यांसमोर संकट उभं राहिलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. लॉकडाऊनची भीती असल्यानं शेतकरी भाजीपाला शिवारात काढून टाकत असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे. (Raju Shetti share vidoe of farmers cutting cabbage due to fear of lockdown)

हे वार कोबीवर होत नसून आपल्याच छातीवर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये शेतकरी ऊसाच्या शेतातील कोबीचं पीक काढून टाकताना दिसत आहेत. राजू शेट्टी यांनी त्या व्हिडीओला एक कॅप्शन दिलं आहे. राजू शेट्टी म्हणतात, लॉकडाऊन होणार या भीतीने भाजीपाला बाजारभाव पडले असून शेतकरी शिवारातच भाजीपाला काढून टाकत आहे. सपासप असा कोयत्याचा आवाज काळीज चिरत जातो, वाटते हे वार कोबीवर होत नसून आपल्याच छातीवर होत आहे.”,

राजू शेट्टी यांचं ट्विट

बाजार समित्या बंद

आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना मार्चमधील अखेरचे दिवस, होळी, धुलिवंदन असे सण आणि साप्ताहिक सुट्ट्या आहेत. मार्च एंड असल्यानं बँका बंद आहेत, त्यामुळं बँका बंद आहेत. या कारणामुळं राज्यातील विविध बाजारसमित्या बंद आहेत. परिणामी शेतकऱ्यांचं मोठ नुकसान होत आहे.

लासलगाव बाजार समिती तब्बल 7 दिवस बंद

आशिया खंडातील अग्रेसर असलेली कांद्याची बाजारपेठ लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व धान्य लिलावाचे कामकाज 7 बंद राहणार आहेत. बाजार समिती 7 बंद असल्याने कोट्यावधीची उलाढाल ठप्प होणार आहे. लासलगाव बाजार समिती सलग 7 दिवस बंद राहिल्यानं शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.

संबंधित बातम्या:

आशिया खंडातील अग्रेसर लासलगाव बाजार समिती तब्बल 7 दिवस बंद, कोट्यवधींची उलाढाल ठप्प, शेतकरी चिंतेत

नागरसोलमधून 100 वी किसान रेल्वे धावली, आतापर्यंत 33 हजार टन कांद्याची वाहतूक

(Raju Shetti share video of farmers cutting cabbage due to fear of lockdown)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI