एफआरपीचे तुकडे केल्यास कुणासोबतही दोन हात करायची तयारी, राजू शेट्टींचा महाविकासआघाडीला इशारा

ऊसाच्या एफआरपीच्या विभागणीच्या मुद्यावरुन प्रसंगी सरकारमधून बाहेर देखील पडू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय. Raju Shetti sugarcane frp

एफआरपीचे तुकडे केल्यास कुणासोबतही दोन हात करायची तयारी, राजू शेट्टींचा महाविकासआघाडीला इशारा
राजू शेट्टी, माजी खासदार
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 4:12 PM

कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ऊसाच्या एकरकमी एफआरपीसाठी आमची कोणाशीही दोन हात करायची तयारी आहे. प्रसंगी सरकारमधून बाहेर देखील पडू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय. निती आयोगाच्या शिफारशीनंतर राज्य सरकारनेही एफआरपी दोन ते तीन हप्त्यांत देण्यासंदर्भात अभ्यास गट तयार केलाय.राज्यातील इतर निर्णय लवकर होत नसताना अभ्यास गटात तयार करण्यासाठी इतकी घाई का? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उपस्थित केलाय. (Raju Shetti warns MVA Government on division on sugarcane frp)

प्रसंगी सरकारमधून बाहेर पडू

राज्य सरकारची ऊसाच्या एफआरपीबाबतची ही भूमिका संशयास्पद आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना अजूनही एकरकमी एफआरपीवर ठाम आहे. ऊसाच्या एकरकमी एफआरपीसाठी आमची कोणाशी दोन हात करायची तयारी आहे. प्रसंगी सरकारमधून बाहेर देखील पडू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय.

मोफत लसीकरणाचं समर्थन

राज्यात लसीकरणावरुन विचारलं असता राज्यात मोफत लसीकरण झालं पाहिजे, अस मत देखील राजू शेट्टी यांनी व्यक्त केलंय. काही श्रीमंत व्यक्ती याचा गैरफायदा घेणार असतील तर घेऊ देत पण लस मोफत द्या, अशी मागणी त्यांनी केलीय. केंद्र सरकारने ही राज्यातील रुग्ण संख्येच्या तुलनेत लसीचा साठा उपलब्ध करून द्यावा, असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलेय.

गोकुळसाठी सत्ताधारी महाडिक गटाला पाठिंबा, मविआच्या नेत्यांना धक्का

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ संघाच्या निवडणुकीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सत्‍ताधारी राजर्षी शाहू आघाडीला आपला पाठिंबा जाहीर केला. कोल्हापुरात पत्रकार परिषद घेत राजू शेट्टी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. गोकुळच्या मल्टीस्टेटला आमचा विरोध आहे… भविष्यत मल्टीस्टेट न करण्याच्या अटीवर तसंच लॉकडाउन काळात गोकुळन दूध उत्पादकांचा केलेला सांभाळ या मुद्द्यांवर आपण सत्ताधारी गटाला पाठिंबा देत असल्याचं शेट्टी यांनी यावेळी म्हटलय. दूध दरवाढीसाठी स्वाभिमानीनं रस्त्यावरची लढाई केलीय.यापुढे ही लढाई सुरूच राहील असे देखील शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केलेय.

दरम्यान, गोकुळ काबीज करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीची मोट बांधलीय. सरकारमधील घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानीनं सत्ताधारी आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानं आश्चर्य व्यक्त होतेय.

संबंधित बातम्या:

राजू शेट्टींचं ठरलं, गोकुळच्या निवडणुकीत मल्टीस्टेटच्या मुद्यावर ‘या’ गटाला पाठिंबा

Amol Khole: डॉक्टर, अभिनेता ते खासदार; वाचा कोण आहेत खासदार अमोल कोल्हे?

(Raju Shetti warns MVA Government on division on sugarcane frp)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं..
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्....
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?.
मोदी Vs गांधींची लढाई, ५ राज्यांच्या निकालाआधीचा Exit Poll काय सांगतो
मोदी Vs गांधींची लढाई, ५ राज्यांच्या निकालाआधीचा Exit Poll काय सांगतो.
छगन भुजबळ यांचा थेट शरद पवार यांनाच सवाल; थेट म्हणाले...
छगन भुजबळ यांचा थेट शरद पवार यांनाच सवाल; थेट म्हणाले....
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास.
२०२४ ला भाजपपासून भारताला मुक्ती मिळणार, संजय राऊत यांची जहरी टीका काय
२०२४ ला भाजपपासून भारताला मुक्ती मिळणार, संजय राऊत यांची जहरी टीका काय.
जरांगेंच्या दौऱ्याचा चौथा टप्पा, सभेची जय्यत तयारी, अवघं जालना भगवंमय
जरांगेंच्या दौऱ्याचा चौथा टप्पा, सभेची जय्यत तयारी, अवघं जालना भगवंमय.
गुणरत्न सदावर्तेंना सर्वात मोठा झटका, ST कर्मचारी बँकेतील 17 संचालक...
गुणरत्न सदावर्तेंना सर्वात मोठा झटका, ST कर्मचारी बँकेतील 17 संचालक....
५ राज्यांचा एक्झिट पोल, कुठं कुणाची सत्ता येणार? बघा tv9 मराठीवर
५ राज्यांचा एक्झिट पोल, कुठं कुणाची सत्ता येणार? बघा tv9 मराठीवर.