सांगलीत हळद सौद्यांना सुरुवात, सेलम हळदीवर पहिल्याच बोलीला मिळाले….

सांगलीत हळद सौद्यांना सुरुवात, सेलम हळदीवर पहिल्याच बोलीला मिळाले....
सांगलीत हळद सौद्यांना सुरुवात

नववर्षात हळदीच्या सौद्यांना मुहूर्तावर सुरुवात झाली झाली असून सेलम हळदीला पहिल्याच बोलीला 7501 रुपयांचा दर मिळाला आहे. (Sangli Turmeric first auction)

Yuvraj Jadhav

|

Jan 25, 2021 | 4:14 PM

सांगली: हळदीची देशातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून सांगलीची ओळख आहे. सांगली जिल्ह्यात दरवर्षी जानेवारी महिन्यात हळदीच्या सौद्यांना सुरुवात होते. यावर्षीच्या हळदीच्या सौद्यांना मुहूर्तावर सुरुवात झाली झाली आहे. सेलम हळदीला पहिल्याच बोलीला 7501 रुपयांचा दर मिळाला आहे, अशी माहिती सांगली बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी दिली. (Sangli Turmeric first auction reach to seven thousand five hundred one rupee)

हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ

सांगलीतील हळदीची बाजारपेठ देशातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. 2021 मधील हळद सौद्याला सांगलीत मुहूर्तावर सुरुवात झालीय.सेलम हळदीला मिळाला पहिल्याच बोलीला 7501 रुपये दर मिळाला आहे.

ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन सौदे

नव्या वर्षातील हळद सौद्यांना सांगलीत प्रारंभ झाला असून यावेळी ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन पद्धतीनं हळदीचे सौदे काढण्यात आले. ऑनलाइन सौद्यात त्रुटी असल्याने ऑफलाईन सौदे काढण्यात आले आहेत. कोरोनाच्या काळात सांगलीतील जग प्रसिद्ध हळदीची बाजारपेठ ठप्प होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हळदीचे ऑनलाईन सौदे काढण्यात येत होते. या सौद्यांमध्ये त्रुटी आढळल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीने हे सौदे ऑफलाईन काढण्याचे ठरवले. आज (25 जानेवारी) बाजार समिती आवारात नवीन वर्षाच्या हळद सौदे सुरू करण्यात आले. बाजार समितीचे अध्यक्ष दिनकर पाटील यांच्याहस्ते या सौद्यांना प्रारंभ झाला. सेलम हळदीला पहिल्याच बोलिला 7 हजार 501 रुपये दर मिळाला.

ऑनलाईन सौद्यामध्ये अडचणी

गेल्यावर्षी हळदीच्या सौद्यांना जानेवारी-फेब्रुवारीमध्ये प्रारंभ झाला होता. त्यानंतर एका महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानं हळदीचे सौदे ठप्प झाले. सांगली बाजार समितीनं मार्ग काढत ऑनलाईन पद्धतीनं हळदीचे सौदे सुरु केले होते. लॉकडाऊन काळात ऑनलाईन सौदे केले. ही पद्धत नवी असल्यानं बऱ्याच अडचणी येत होत्या. नव्यानं हंगाम सुरु झाल्यानं ऑफलाईन पद्धतीनं सौद्यांना सुरुवात झाली आहे. कर्नाटकामधील व्यापारी हळदीची खरेदी करण्यासाठी येतात, असं सांगली बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी सांगितले.

तासगाव तालुक्यातील शेतकरी प्रकाश जाधव यांनी 7 क्विंटल माल विक्रीसाठी आणला होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत भाव कमी मिळाल्याचं जाधव यांनी सांगितले. यंदा सौद्याच्या पहिल्या दिवशी हळद आणूनही गेल्यावर्षी पेक्षा क्विंटलला 250 रुपये कमी दर मिळाल्याचं त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

पाणी कमी असलं म्हणून काय झालं, शेतकरी किसन भोसलेंचा ‘हा’ प्रयोग देऊ शकतो लाखोंचा नफा

Special Story | नंदूरबारच्या अविनाश पाटलांनी करुन दाखवलं, मिरची शेतीतून 5 महिन्यात कमावले 12 लाख

(Sangli Turmeric first auction reach to seven thousand five hundred one rupee)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें