सोयाबीनची आवक वाढली, दर स्थिरच, शेतकऱ्यांनी योग्य दराची प्रतिक्षा करावी

| Updated on: Sep 29, 2021 | 5:01 PM

सोयाबीनचे दर हे स्थिर असून 6900 चा दर सोयाबीनला सौद्यात मिळाला तर पोटलीमध्ये 6400 रुपये क्विंटलप्रमाणे शेतकऱ्यांना मिळाले आहेत. तर दुसरीकडे उडदाला 7160 रुपये दर मिळाला आहे. बाजारपेठेत या दोन मुख्य पिकाचीच आवक सुरु असून बाजारात कमालीची शांतता पाहवयास मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रची गडबड न करता योग्य बाजार भावाची प्रतिक्षा करणे आवश्यक असल्याचे मत कृषी तज्ञांनी व्यक्त केले आहे.

सोयाबीनची आवक वाढली, दर स्थिरच, शेतकऱ्यांनी योग्य दराची प्रतिक्षा करावी
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : आठवड्याभरानंतर बुधवारी लातूरच्या बाजारपेठेत सोयाबीनची आवक वाढल्याचे पाहवयास मिळाले. पावसाने उघडीप देताच शेतकऱ्यांनी बाजारपेठ जवळ केली आहे. मात्र, सोयाबीनचे दर हे स्थिर असून 6900 चा दर सोयाबीनला सौद्यात मिळाला तर पोटलीमध्ये 6400 रुपये क्विंटलप्रमाणे शेतकऱ्यांना मिळाले आहेत. तर दुसरीकडे उडदाला 7160 रुपये दर मिळाला आहे. बाजारपेठेत या दोन मुख्य पिकाचीच आवक सुरु असून बाजारात कमालीची शांतता पाहवयास मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रची गडबड न करता योग्य बाजार भावाची प्रतिक्षा करणे आवश्यक असल्याचे मत कृषी तज्ञांनी व्यक्त केले आहे.

लातूरची बाजार पेठ ही सोयाबीनसाठी प्रसिध्द आहे. केवळ जिल्ह्यातूनच नाही तर सबंध मराठवाड्यातून सोयाबीनची आवक ही या बाजारपेठेत होत असते. यंदा मात्र, पावसाने सोयाबीनचे नुकसान झाले आहे तर बाजारात सोयाबीनला दरही कमी आहे. सध्या सोयाबीनला 6400 रुपयांचा दर मिळत आहे. पंधरा दिवसापूर्वी सोयाबीनला 8600 चा दर मिळत होता. मात्र, साोयापेंड आयातीचा निर्णय आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीचा परिणाम हा दरावर होत आहे.

त्यामुळे अजुनही शेतकऱ्यांचे सोयाबीन हे शेतामध्येच आहे. दरवर्षीसारखी आवक बाजारात नाही शिवाय केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा परिणाम देखील स्थानिक पातळीवर होत असल्याने शेतकऱ्यांनी लागलीच सोयाबीन बाजारात न दाखल करता त्याची साठवणूक करण्याचा सल्ला कृषीतज्ञ रामेश्वर चांडक यांनी दिलेला आहे. आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने उडदाचा शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. उडदाचे दर हे गेल्या महिन्यापासून स्थिर आहेत. सध्या उडदाला 7100 चा दर मिळत आहे. दोन दिवसापूर्वी उडदाचे दर हे कमी झाले होते मात्र, दरामध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.

3000 क्विंटल साोयाबीन बाजारात

सध्याच्या हंगामात सोयाबीनची आवक ही कमीच राहिलेली आहे. आतापर्यंत एका दिवशी केवळ 20 हजाप क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. हंगामाच्या सुरवातीला सोयाबीनला 10 हजाराचा दर मिळाला होता त्या दरम्यानच आवक ही वाढली होती. मात्र, दर घसरल्याने ही आवक कमी झालेली आहे. सध्या आवक कमी असूनही दर हे कमीच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीची घाई न करता योग्य मार्केटची वाट पाहण्याचा सल्ला कृषीतज्ञ हे देत आहेत.

अडीच हजार क्विंटल सोयाबीनची आवक

खरीपाच्या हंगामात दरवर्षी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 25 ते 30 हजार क्विंटल सोयाबीनची आवक होत असते. यंदा मात्र, आतापर्यंत 25 हजार क्विंटलचा टप्पाही ओलांडलेला नाही. दिवसेंदिवस सोयाबीनचे दर घटत असल्याचे चित्र आहे तर दुसरीकडे पावसामुळे हे मुख्य पीक अजूनही शेतात उभेच आहे. त्यामुळे कमी आवक होऊनही दर हे स्थिरच आहेत.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. बुधवारी लाल तूर- 6471 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6401 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6471 रुपये क्विंटल, जानकी चना 4850 रुपये क्विंटल, विजय चणा 5400, चना मिल 4850, सोयाबीन 6950, चमकी मूग 6860 , मिल मूग 6200 तर उडीदाचा दर 7161 एवढा राहिला होता. (Soyabean prices remain stable, farmers should wait for the right rate)

संबंधित बातम्या :

‘स्वाभिमानी’च्या ऊस परिषदे नंतरच कारखाने सुरु होतात, राजू शेट्टींचा खोचक टोला

उस्मानाबाद : पुनर्वसनाची मागणी करीत इर्ला ग्रामस्थांनी अडविले पालकमंत्र्यांना

केंद्र सरकारकडून पिकांच्या नव्या 35 वाणांचं लोकार्पण, कृषी कायद्यांवर मोदी सरकारची भूमिका काय?