शेतकरी उत्पादक कंपन्यांचा असा ‘हा’ फायदा, शेतीमालाची विक्री अन् मोबदला एकाच जागी

| Updated on: Nov 19, 2021 | 4:01 PM

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करायची असेल तर शेतीमालासाठी बाजारपेठ महत्वाची आहे. शिवाय बाजारपेठही लागूनच असेल तर वाहतूकीचा आणि इतर खर्चाची बचत होते. अशाच उद्देशाने शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मिती झाली होती. याचा सर्वाधिक फायदा हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होत आहे.

शेतकरी उत्पादक कंपन्यांचा असा हा फायदा, शेतीमालाची विक्री अन् मोबदला एकाच जागी
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

मुंबई : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करायची असेल तर शेतीमालासाठी बाजारपेठ महत्वाची आहे. शिवाय बाजारपेठही लागूनच असेल तर वाहतूकीचा आणि इतर खर्चाची बचत होते. अशाच उद्देशाने शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मिती झाली होती. याचा सर्वाधिक फायदा हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होत आहे. राज्यातील बाजारपेठेच्या व्यवस्थेत हळूहळू का होईना बदल होत आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांमुळे शेतीमाल विक्रीसाठी मुख्य बाजारपेठेत जावेच असे काही नाही. कारण या कंपन्यांच्या माध्यमातून शेतीमालाची विक्री आणि त्याचा मोबदला या दोन्हीही गोष्टी शेतकऱ्यांना जागेवरच मिळत आहेत.

इंडियन एक्स्प्रेसच्या म्हणण्यानुसार शेतकरी उत्पादक कंपन्यांचे काम हे बाजार समित्याप्रमाणेच सुरु आहे. शेतीमाल विक्री केला की, त्याचा मोबदला हा एक ते दोन दिवसांमध्येच दिला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. वाहतूक खर्च कमी झाला असून योग्य दरही मिळत आहे. (Such a advantage of agricultural production companies, the sale of agricultural commodities in one place)

कर कपातीचा फायदाही शेतकऱ्यांनाच

पुणे जिल्ह्यातील दगडू पवार हे 2017 पासून वैष्णवधन ही शेतकरी उत्पादन कंपनी चालवत आहेत. ते एफपीसी, नाफेडसाठी कांद्याची अधिकृत खरेदी करतात. मे महिन्यापासून त्यांनी कांदा खरेदीला सुरवात केली आहे. सुरेश सेनकर हा शेतकरी आपल्या 50 एकरपैकी 20 एकरावर कांदा लागवड करतात. यावर्षी त्यांनी येथे 180 टन कांदे विकले आहेत. तर या उत्पादक कंपनीमध्ये चांगली किंमत मिळाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या कांद्याला 3400 ते 3600 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. जर पारंपारिक बाजारपेठेत गेलो तर 7 टक्के मंडई कर आहे, तर येथे केवळ 4 टक्के कर भरावा लागत असल्याचे सेनकर यांनी सांगितले आहे. शिवाय मंडीला जाण्याचा खर्चही वाचवला जात आहे. त्याचबरोबर 2018 पासून सुरु असलेल्या महाराष्ट्र महाकांड मंडईमध्ये कांदा विकला जातो जो शेतकरी उत्पादक कंपनी आणि नाफेडसह संयुक्त उपक्रमांमध्ये सुरू आहे. महाफपीसीने 6 शहरांमध्ये 1000 टन कांदा साठवला आहे. या एफपीसीचे मुख्य आकर्षण म्हणजे किरकोळ किंमत जास्त असताना ते कांदा खरेदी करतात आणि बाजारात विकतात.

एक दिवसामध्ये पैसेही मिळतात

वैष्णवधन शेतकरी उत्पादक कंपनीचे पवार यांनी सांगितले की, मे महिन्यात लिलाव सुरू केल्यापासून आतापर्यंत 2 कोटी रुपयांच्या 28000 टन कांद्याची खरेदी केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील कमलाभवानी कंपनीने या वर्षापासून अशाच प्रकारे पदार्पण केले आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या ह्या शेतकऱ्यांना 25 तासांच्या आत पैसे देतात. काही आठवड्यांत आणखी 5 अशाच बाजारपेठा सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे महाफपीसीचे व्यवस्थापकीय संचालक योगेश थोरात यांनी सांगितले. या एफपीसीच्या यशाचे रहस्य म्हणजे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या फायद्याचे आहे. शिवाय उपलब्ध दरावर शेतकरी समाधानी नसतील तर त्यांना इतरत्र माल विकण्याचाही पर्याय हा खुला असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या :

रिलायन्स विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरोधात पहिला गुन्हा परभणीत, बुलढाण्यात काय होणार?

Farm Laws: आंदोलनजीवी, परजीवी ते देशाची माफी, मोदींचा तो राज्यसभेतला व्हिडीओ पुन्हा का चर्चेत? काय आहे त्यात?

शेती व्यवसयात सौरकृषी पंपाचे महत्व, योग्य नियोजनामुळे उत्पादनातही वाढ