नोकरी सोडली तर संपत्तीतून बेदखल करेन, वडिलांची धमकी, शेतकऱ्याची वर्षाला 40 ते 50 लाखांची कमाई

चांगला पगार मिळाल्यानंतरही सुधांशु याचं मन नोकरीत रमत नव्हतं. सुधांशु यांनी नोकरी सोडून बिहारमधील वडिलोपार्जित घरी जाणाच्या निर्णय घेतला.

नोकरी सोडली तर संपत्तीतून बेदखल करेन, वडिलांची धमकी, शेतकऱ्याची वर्षाला 40 ते 50 लाखांची कमाई
सुधांशु कुमार

पाटणा: बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील नयनगर गावचे सुधांशु कुमार यांना त्यांच्या वडिलांनी लहानपणापासूनच देशातील नामांकित शाळांमध्ये शिक्षण दिलं. दिल्लीच्या हंसराज कॉलेजमधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणानंतर सुधांशू यांना 1988 मध्ये केरळच्या मुन्नार येथील टाटा टी गार्डनमध्ये नोकरी मिळाली. चांगला पगार मिळाल्यानंतरही सुधांशु याचं मन नोकरीत रमत नव्हतं. सुधांशु यांनी नोकरी सोडून बिहारमधील वडिलोपार्जित घरी जाणाच्या निर्णय घेतला. सुधांशु यांनी त्यांच्या वडिलांसमोर नोकरी सोडून गावात शेती करण्याचा प्रस्ताव दिला. वडिलांना सुधांशु कुमार यांची मानसिक स्थिती ठीक नाही असं वाटलं. वडिलांनी सुधांशु कुमारचं मन वळवण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आलं नाही. (Sudhanshu kumar bihar samstipur made history by earning 40 lakhs annually from Farming)

वडिलांकडे एक संधी मागितली

सुधांशु कुमार यांनी त्यांच्या वडिलांकडे एक संधी मागिततले. सुधांशु यांच्या वडिलांनी गावकरी काय म्हणतील, मुलाला उच्च शिक्षण दिलं आणि हा शेती करतोय, अशी भूमिका माडंली होती. वडिलांनी एका वेळी सुधांशुला संपत्तीतून बेदखल करण्याची धमकी देखली दिली. सुधांशु यांनी शेती सुरु केली तेव्हा गावकरी आणि आजूबाजूच्या खेड्यातील लोकांनी सुधांशु यांची चेष्ठा केली. सुधांशु काळाबरोबर पारंपारिक शेतीमध्ये बदल करत आधुनिकतेचा मार्ग स्वीकारला.

आपल्या व्यवसायामुळे आनंदित सुधांशु कुमार 31 वर्षांपासून शेतीत गुंतले आहेत. बिहार सरकारबरोबरच केंद्र सरकारने सुधांशु कुमारचा अनेक वेळा सन्मानही केला आहे.

वार्षिक 50 लाखांची कमाई

सुधांशु कुमार यांनी बिहारच्या शेतीची व्याख्या बदलून टाकली आहे. ते शेतीमधून वर्षाकाठी 40 ते 50 लाख मिळवतात. शेतकरी आणि शेतीशी संबंधित अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये त्यांनी आपल्या शेतीच्या पद्धतीबद्दल मार्गदर्शन केलं आहे. बिहार आणि केंद्र सरकारनं त्यांना अनेकदा सन्मानित देखील केलं आहे. सुधांशु कुमार सांगतात की लोकांचा शेतकऱ्यांविषयीचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे, तरच देशाचा योग्य विकास होईल. सध्या ते भारतीय शेतकरी नेटवर्कचे सरचिटणीस आहेत.

लिची शेतीतून सर्वाधिक कमाई

उत्तर बिहार लिचीसाठी सर्वात जास्त चर्चेत आहे. परंतु सुधांशु कुमार यांनी लिची शेती करण्याच्या पद्धतीने सर्वांना चकित केले आहे. लिचीमधून त्यांना सर्वाधिक उत्पन्न मिळते. सुधांशु यांच्याकडे 1100 झाडे आहेत. फळ पिकण्याआधीच देशातील मोठ्या कंपन्या त्याचं बुकिंग करतात. मेट्रो शहरांमध्ये ऑनलाईन बुकिंग करुन ते पाठवलं जातं. सुधांशु कुमार यांनी आंबा लागवडीमध्ये अनेक बदल करत संशोधन केले आहे, यासाठी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी केंद्रीय कृषी विश्वविद्यालयाच्या सहकार्याने अनेक प्रकारची कलमं तयार केली आहेत.

सुधांशु कुमार सांगतात की शेतकऱ्यांनी शेतीची पद्धत बदलल्यास ते दोनपट नाहीतर चारपट कमाई करु शकतात. एका आठवड्याला 7 लाख रुपयांची केळी विक्री केली असल्याचं त्यांनी सांगितलं. ड्रॅगन फ्रूटची देखील लागवड केल्याचं त्यांनी सांगितलं आहे. शेतकऱ्यांनी गहू, मका आणि धान ही पिकं सोडून फळ, भाज्या उत्पादन व्यावसायिक दृष्टिकोन ठेऊन सुरु करावं, असं सुधांशु म्हणातात. सुधांशु कुमार यांनी आतापर्यंत 2 हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं आहे. पारंपारिक शेतीतून बाहेर पडून ठिबक सिंचन, तुषार सिंचनाचा वापर करुन शेती केल्यास दुप्पट कमाई होईल, असं सुधांशु कुमार म्हणतात.

नितीश कुमार यांच्याकडून कौतुक

सुधांशु कुमार सांगतात की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अनेकदा त्यांची भेट घेतली आहे. सुधांशु कुमार यांच्या शेतावर परिसरातील सर्व लोक येऊन पाहणी करुन गेले होते. ते गेल्या वीस वर्षांपासून गावाचे प्रमुख आहेत. ते म्हणताता आम्ही प्रामाणिकपणे सरकारी योजना राबवल्या. आमच्या गावात शौचालये असलेली शंभर टक्के घरे आहेत. त्यांच्या गावातील 45 पेक्षा अधिक वय असणाऱ्या 90 टक्के लोकांचं लसीकरण झालं आहे.

संबंधित बातम्या:

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांना 4000 रुपयांची आर्थिक मदत, त्वरा करा, रजिस्ट्रेशनसाठी आज शेवटची तारीख

अधिवेशनात कृषी कायद्यांना विरोध दर्शवणारा ठराव करावा, राजू शेट्टी यांची शरद पवारांकडे मागणी

Sudhanshu kumar bihar samstipur made history by earning 40 lakhs annually from Farming

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI