PM Kisan Yojana: शेतकऱ्यांना 4000 रुपयांची आर्थिक मदत, त्वरा करा, रजिस्ट्रेशनसाठी आज शेवटची तारीख

PM Kisan Scheme | गेल्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन न केल्यामुळे त्यांना 2000 रुपयांचा हप्ता मिळाला नव्हता. त्यामुळे आता नोंदणी करुन शेतकरी दोन्ही हप्ते मिळवू शकतात.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांना 4000 रुपयांची आर्थिक मदत, त्वरा करा, रजिस्ट्रेशनसाठी आज शेवटची तारीख
पंतप्रधान किसान सन्मान योजना
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 9:57 AM

नवी दिल्ली: पंतप्रधान कृषी सन्मान योजनेत नाव नोंदवण्याचा कालावधी बुधवारी संपुष्टात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ पदरात पाडून घ्यायचा असल्यास आजच्या दिवसात नोंदणी करावी लागेल. यानंतर त्यांचा अर्ज स्वीकारला गेल्यास केंद्र सरकार थेट शेतकऱ्याच्या (Farmers) बँक खात्यामध्ये पैसे जमा करेल. (central govt may transfer 4000 rupees in farmers account under PM Kisan Scheme)

गेल्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन न केल्यामुळे त्यांना 2000 रुपयांचा हप्ता मिळाला नव्हता. त्यामुळे आता नोंदणी करुन शेतकरी दोन्ही हप्ते मिळवू शकतात. त्यासाठी pmkisan.gov.in या संकेतस्थळावर एक अर्ज भरावा लागेल. तुमचे नाव नोंदवले गेल्यानंतर एप्रिल-जूनचा हप्ता जुलै महिन्यात आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यात नवा हप्ता जमा केला जाईल. याचा अर्थ आता नाव नोंदवल्यास शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयाचे दोन्ही हप्ते लागोपाठ मिळतील.

रजिस्ट्रेशन कशाप्रकारे कराल?

1. सर्वप्रथम pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जा. 2. Farmers Corner या ऑप्शनवर क्लिक करा. 3. आता तुम्हाला New Farmer Registration हा पर्याय निवडावा लागेल. 4. नवा टॅब ओपन झाल्यावर त्यामध्ये आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकावा. 5. त्यानंतर आपली माहिती आणि जमिनीचा तपशील नमूद करावा. 6. सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करावा.

आर्थिक मदत कधी मिळणार?

एखाद्या शेतकऱ्याने जून महिन्यात नोंदणी केली तर त्याला योजनेचा आठवा हप्ता जुलै महिन्यात मिळेल. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पुढचा हप्ता मिळेल. याचा अर्थ आता नाव नोंदवल्यास शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयाचे दोन्ही हप्ते लागोपाठ मिळतील.

बनावट शेतकऱ्यांनो सावधान, गावा-गावात चौकशी सुरू

शेतकरी असल्याचं खोटं सांगत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Scheme) फायदा घेणाऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. आता या योजनेतील लाभार्थींची तपासणी सुरू झालीय. गावागावात जाऊन याबाबत चौकशी होणार आहे. विशेष म्हणजे खोटी माहिती देऊन या योजनेंतर्गत शेतीसाठीची वार्षिक 6 हजाराची मदत घेणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. त्यांची मदत बंद तर केली जाईलच, मात्र सोबत याआधी मिळवलेल्या पैशांचीही भरपाई करुन घेण्यात येणार आहे. या योजनेत 5 टक्के लाभार्थ्यांची प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन तपासणी करण्याची तरतूद आहे. त्याचीच आता अंमलबजावणी सुरू आहे.

उत्तर प्रदेशामधील गोरखपूर जिल्ह्यात या तपासणीला सुरुवातही झालीय. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार कृषी विभागातील अधिकारी गावा-गावात जाऊन या लाभार्थी यादीची पाहणी करुन सत्यता तपासत आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील 5 टक्के लाभार्थ्यांची यादी तयार झालीय. यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना ही यादी देऊन लाभार्थींचे नाव, मोबाईल नंबर आणि आधार कार्डची (Aadhaar Card) सत्यता तपासली जाईल. तसेच ते शेतकरी आहेत की नाही हेही पाहिलं जाईल. या तपासणीत ज्यांची माहिती खोटी सापडेल त्यांची मदत तातडीने बंद करण्यात येईल.

संबंधित बातम्या:

पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची परवड सुरुच, राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकाच्या भूमिकेमुळे शेतकरी संतप्त

मान्सूनने शेतकऱ्यांची काळजी वाढवली, पुढील आठवड्यात पाऊस कसा असेल? वाचा तुमच्या भागातील हवामान स्थिती

दूध दरासंदर्भात लवकरच कायदा करणार, दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणार: सुनील केदार

(central govt may transfer 4000 rupees in farmers account under PM Kisan Scheme)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.