मान्सूनने शेतकऱ्यांची काळजी वाढवली, पुढील आठवड्यात पाऊस कसा असेल? वाचा तुमच्या भागातील हवामान स्थिती

मान्सूनने भारतात प्रवेश करुन बरेच दिवस झालेत मात्र अजूनही म्हणावा असा पाऊस होताना दिसत नाहीये. पावसाने हूल दिल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकटही ओढावलं.

मान्सूनने शेतकऱ्यांची काळजी वाढवली, पुढील आठवड्यात पाऊस कसा असेल? वाचा तुमच्या भागातील हवामान स्थिती


नवी दिल्ली : मान्सूनने भारतात प्रवेश करुन बरेच दिवस झालेत मात्र अजूनही म्हणावा असा पाऊस होताना दिसत नाहीये. पावसाने हूल दिल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकटही ओढावलं. त्यामुळे शेतीच्या मशागतीसह, बियाणं, खतं आणि श्रम असं मोठं नुकसान झालं. मात्र, पुढील काळही शेतकऱ्यांना काळजीत टाकणारा असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. पुढील आठवडाभर भारतात पावसाचं प्रमाण कमी असणार आहे. त्यामुळे खरीपातील पिकांना लागणाऱ्या पाण्याविना शेतीच्या अडचणी काही काळ वाढण्याची शक्यता आहे. असं असलं तरी विदर्भाच्या काही भागात, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप आणि छत्तीसगडमधील काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय (Weather alert rain forecasting by IMD know news for farmer).

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात कमी पाऊस होईल. स्कायमेट या हवामान अभ्यास संस्थेच्या अहवालानुसार, 29 जूननंतर देशातील बहुतांश भागात मान्सूनचा जोर कमी होईल. पुढील 4-5 दिवस वातावरण कोरडं राहिल. असं असलं तरी काही ठिकाणी चांगला पाऊसही होईल. यात प्रामुख्याने पूर्वोत्तर भारत, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागाचा समावेश आहे. याशिवाय देशातील अधिकाधिक भागात पुढील आठवडाभर पावसाचं प्रमाण कमी असेल.

मान्सून एक आठवडा पुढे सरकण्याची शक्यता

भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितलं, “उत्तर भारताच्यावरील वातावरणाचा अंदाज घेतल्यानंतर राजस्‍थान, पश्चिम उत्‍तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, चंडीगड आणि दिल्‍लीत पुढील 6-7 दिवसापर्यंत दक्षिण-पश्चिम मान्सून पुढे सरकण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. 16 जूनपासून मान्सूनच्या उत्तरेकडील स्थितीत कोणताही बदल झालेला नाही. सध्या मान्सून भिलवाडा, धौलपूर, अलीगड, मेरठ, अंबाला आणि अमृतसरमधून जाईल. सध्या दक्षिण पश्चिम मान्सून पुढे सरकण्यास अनुकुल स्थिती आहे.”

पाऊस कोठे पडणार?

राजधानी दिल्लीत 2,3 जुलैला पाऊस होऊ शकतो. पुढील 24 तासात सिक्किम, आसामच्या काही भागात, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मराठवाड्याच्या काही भागात सौम्य आणि मध्यम पावसाची शक्यता आहे.

उत्तराखंडचा काही भाग, बिहारमधील उत्तर भागातील जिल्हे, पश्चिम बंगाल, विदर्भाचा काही भाग, मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप आणि छत्तीसगडचा काही भागात सौम्य ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. झारखंड आणि अंदमान व निकोबार द्वीप समुहात सौम्य आणि काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल.

हेही वाचा :

Weather Alert: राज्यात आज कुठे पाऊस होणार? हवामान विभागानं वर्तवला ‘हा’ अंदाज

Weather Alert: राज्यात पावसाची दडी, आणखी 7 दिवस मान्सूनचे वारे कमकुवत; हवामान खात्याचा अंदाज

पावसाने दडी मारल्याने येवला तालुक्यात दुबार पेरणीचे संकट, शेतकऱ्यांची चिंता वाढली

व्हिडीओ पाहा :

Weather alert rain forecasting by IMD know news for farmer

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI