Sugar Commissioner : शेतकऱ्यांचे पैसे अदा करा अन्यथा आगामी गाळप हंगामात कारखान्याची धुराडी राहणार बंद

राज्यात जवळपास 200 साखर कारखाने आहेत. ऊस गाळपानंतर शेतकऱ्यांना बील अदा करणे बंधनकारक असते. असे असतानाही कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे अदा केलेले नाहीत. आता ऑक्टोंबर मध्ये यंदाचा गाळप हंगाम सुरु होईल त्यापूर्वीच कारखान्यांना हे थकीत पैसे द्यावे लागणार आहेत. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे वेळेत अदा केले नाहीत तर त्यांना नोटीस तर बजावली जाणारच पण गाळप हंगामाची परवानगीही दिली जाणार नाही.

Sugar Commissioner : शेतकऱ्यांचे पैसे अदा करा अन्यथा आगामी गाळप हंगामात कारखान्याची धुराडी राहणार बंद
साखर कारखाना
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 6:24 PM

पुणे :  (Sugar Factory) साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची थकीत रक्कम हे काही नवे राहिलेले नाही. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून (Sugar Commissioner) साखर आयुक्तांनी कडक धोरणे राबवूनही राज्यातील साखर कारखान्यांकडे तब्बल 1 हजार 500 कोटी रुपयांचे देणे आहे. त्याअनुशंगाने आता साखर आयुक्तांनी कडक धोरणांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 7 साखर कारखान्यांना आयुक्त शेखर गायकवाड यांनी नोटिसा बजावल्या आहेत तर आणखी काही साखर कारखानदारांची सुनावणी ही पुढील आठवड्यात होणार आहे. यंदाच्या (Sludge season) गाळप हंगाम सुरु होईपर्यंत कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिले तरच गाळप हंगामाची परवानगी देण्यात येणार आहे. अन्यथा त्या साखर कारखान्यांची धुराडी बंद राहिल असा इशारा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे. त्यामुळे कारखानदार काय भूमिका घेणार यावरच त्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

1 हजार 500 कोटी रुपयांचे देणे

राज्यात जवळपास 200 साखर कारखाने आहेत. ऊस गाळपानंतर शेतकऱ्यांना बील अदा करणे बंधनकारक असते. असे असतानाही कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे अदा केलेले नाहीत. आता ऑक्टोंबर मध्ये यंदाचा गाळप हंगाम सुरु होईल त्यापूर्वीच कारखान्यांना हे थकीत पैसे द्यावे लागणार आहेत. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे वेळेत अदा केले नाहीत तर त्यांना नोटीस तर बजावली जाणारच पण गाळप हंगामाची परवानगीही दिली जाणार नाही. राज्यातील कारखान्यांकडे तब्बल 1 हजार 500 कोटी रुपये हे थकीत आहेत.

20 साखर कारखान्यांवर टांगती तलवार

कारखान्याकडे शेतकऱ्यांचे पैसे थकीत असल्या कारणाने साखर आयुक्त यांनी शुक्रवारी सात साखर कारखान्याच्या प्रशासनाला नोटीस बजावली आहे. यामध्ये धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, बबनराव पाचपुते, कल्याणराव काळे यांच्या साखर कारखान्याचा समावेश आहे. या कारखान्यांकडे 14 लाख 50 हजार 359 रुपयांची आरआरसी रक्कम थकी आहे. त्यामुळे ही नोटीस बजावली आहे. तर पुढील आठवड्यात 20 साखर कारखान्याच्या प्रशासनाला सुनावणीसाठी बोलविण्यात आल्याचे साखर आयुक्त यांनी स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा

यामुळे कडक धोरण

यंदाचा ऊस गाळप हंगाम हा ऑक्टोंबर महिन्यात सुरु होणार आहे. या हंगामाच्या पूर्वीच शेतकऱ्यांना त्यांची हक्काची रक्कम मिळावी हा सरकारचा उद्देश आहे. त्यानुसार आतापासूनच साखर आयुक्त यांनी कारवाईला सुरवात केली आहे. नोटीस बजावूनही शेतकऱ्यांचे पैसे अदा केले नाही तर मात्र, गाळपाचा परवानाच देण्यात येणार नसल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे.

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.