Sugarcane Sludge : ऊसाचे गाळप कासवगतीने, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा पाथरी येथे रास्तारोको

| Updated on: Dec 30, 2021 | 3:56 PM

ऊस गाळप हंगाम सुरु होऊन अडीच महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. असे असतनाही पाथरी येथील रेणूका शुगर्स साखर कारखाना क्षेत्रातील अधिकतर ऊस हा शेताताच उभा आहे. त्यामुळे ऊसाचे गाळप होते की नाही या धास्ती शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे साखर कारखान्याने ऊसाचे गाळप वाढवावे तसेच 100 टक्के ऊसाचे गाळप करण्याच्या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाथरी येथील सेलू कॅार्नवर रास्तारोको केला होता.

Sugarcane Sludge : ऊसाचे गाळप कासवगतीने, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा पाथरी येथे रास्तारोको
रेणूका साखर कारखान्याकडून वेळेत ऊसाचे गाळप होण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रास्तारोको केला
Follow us on

परभणी : ऊस गाळप हंगाम सुरु होऊन अडीच महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. असे असतनाही पाथरी येथील रेणूका शुगर्स साखर कारखाना क्षेत्रातील अधिकतर ऊस हा शेताताच उभा आहे. त्यामुळे (Sugarcane Sludge) ऊसाचे गाळप होते की नाही या धास्ती (Farmer) शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे साखर कारखान्याने ऊसाचे गाळप वाढवावे तसेच 100 टक्के ऊसाचे गाळप करण्याच्या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाथरी येथील सेलू कॅार्नवर रास्तारोको केला होता. कारखान्याच्या क्षेत्रातील ऊस वावरातच आणि गेटकेन इतर भागातील ऊसाचे गाळप होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे कारखाना प्रशासन आता काय निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे.

कारखान्याकडे एफआरपी रक्कमही थकीत

यंदाच्या हंगामात थकीत एफआरपी चा मुद्दा सातत्याने समोर आला आहे. शिवाय वेळेत ही रक्कम शेतकऱ्यांना अदा न केल्यास कारवाई करण्याचा इशाराही साखर आयुक्त यांनी दिला होता. त्यामुळे मध्यंतरी कोट्यावधींची वसुली करुन कारखाने हे सुरु झाले होते. मात्र, काही कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून हमीपत्र घेऊन गाळपास सुरवात केली होती. एफआरपी रकमेबाबत शेतकऱ्यांना काही अडचण नसल्या्स कारखाना सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसारच रेणूका शुगर साखर कारखान्याकडे एफआरपी थकीच राहिलेली आहे. आता एफआरपी रक्कम आणि एफआरपी दरामध्ये वाढ करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पीकविम्याची रक्कम न मिळाल्यामुळे शेतकरी आक्रमक

आतापर्यंत राज्यात 2 हजार 400 कोटी रुपये हे विम्यापोटी अदा करण्यात आले आहेत. असे असले तरी राज्यातील 84 हजार शेतकरी हे या रकमेपासून वंचित राहिलेले आहेत. त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचाही समावेश आहे. जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी विमा परतावा मिळावा म्हणून कृषी कार्यालयात तक्रारी अर्जही दाखल केले आहेत. मात्र, अद्यापही परतावा मिळालेला नाही. त्यामुळे या रास्तारोकोच्या दरम्यान, पीकविमा रक्कमही खात्यावर जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. रास्तारोको आंदोलनात पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा समावेश होता. शिवाय दोन तास शेतकऱ्यांनी हा मुख्य रस्ता रोखून धरल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

उभ्या ऊसाच्या वजनात घट

साधारणत: ऊस हा 10 ते 11 महिन्यात कारखान्यावर जाणे गरजेचे आहे. यापेक्षा जास्त काळ ऊस वावरात राहिल्यास वजनामध्ये तर घट होते पण त्याला तुरे लागल्याने उत्पादनही कमी होते. वाढत्या ऊंचीमुळे ऊसाची पडझड आणि त्यामधून शेतकऱ्यांचे नुकसान हे ठरलेलेच आहे. अनेक ठिकाणी ऊसतोड येत नसल्याने 13 ते 15 महिन्यांचाही ऊस अजून वावरातच उभा आहे. त्यामुळे कारखान्याचे गाळप वाढवावे तसेच कार्यक्षेत्रातीलच ऊसाचे सुरवातीला गाळप करावे अशी मागणी होत आहे.

संबंधित बातम्या :

तूर खरेदी केंद्र सुरु होत असतानाच व्यापाऱ्यांचा असा ‘हा’ निर्णय, शेतकरीही गेले चक्रावून

ठरलं तर मग : शेतकऱ्यांना मिळाला फरदड कापसाला योग्य पर्याय, आता आंतरपिकातून उत्पादनही वाढणार

Agricultural pump : वीजप्रश्न पेटला, अख्खं गाव बैल-बारदाणा घेऊन महावितरणच्या दारी