एकरकमी FRP साठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, सांगलीच्या साखर कारखान्यांवर मोटार सायकल रॅली

उसाला एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे. वजनातील काटा मारी बंद झाली पाहिजे. तोडीला मोजाव्या लागणाऱ्या पैशाची पद्धत बंद झाली पाहिजे आणि महापुरात बुडालेला ऊस प्राधान्याने तोडला पाहिजे. या आणि इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे

एकरकमी FRP साठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, सांगलीच्या साखर कारखान्यांवर मोटार सायकल रॅली
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन


सांगली: उसाला एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे. वजनातील काटा मारी बंद झाली पाहिजे. तोडीला मोजाव्या लागणाऱ्या पैशाची पद्धत बंद झाली पाहिजे आणि महापुरात बुडालेला ऊस प्राधान्याने तोडला पाहिजे. या आणि इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानीचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील साखर कारखान्यावर मोटारसायकल रॅली काढण्यात आली. सांगलीच्या वसंतदादा पाटील यांच्या कारखान्यावर ही रॅली आली. आणि घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

सांगलीच्या साखर कारखान्यांना निवेदन

स्वाभिमानीच्या मोटार सायकल रॅलीला उदगीरी कारखान्यांवरून सकली प्रारंभ झाला त्यानंतर तुरची तासगाव, क्रांती कुंडल, हुतात्मा वाळवा ,राजारामबापू साखराळे, सोनहिरा वांगी अशी रॅली काढण्यात आली. यावेळी एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे, वजनात काटा मारी थांबलीच पाहिजे. तोडीसाठी मागण्यात येणारे पैसे बंद झालेच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. यावेळी सर्व साखर कारखान्यांना निवेदन देण्यात आले.

कोल्हापूरचा शाहू कारखान्याकडून एकरकमी एफआरपी जाहीर

ऊस FRP च्या मुद्द्यावरुन केंद्र विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असं चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. अशावेळी भाजप नेते समरजित घाटगे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. निर्णय काहीही होऊ दे, ऊसाची एफआरपी एकरकमी देणार अशी घोषणा कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील राजर्षी शाहू महाराज साखर कारखान्याने केली आहे.महापुरामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं समरजित घाटगे यांनी सांगितलं. राज्यातील इतर साखर कारखान्यांनीही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची वेळ आली आहे. कारखानदारी पूर्णपणे सावरली आहे असं चित्र नाही. मात्र, आर्थिक ताळमेळ पाहता एकरकमी एफआरफी शक्य असल्याचंही घाटगे यांनी म्हटलंय. आम्हाला यात राजकारण आणायचं नाही. मात्र, शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायची हीच वेळ असल्याचंही घाटगे यावेळी म्हणाले.

गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरु

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्याप्रमाणे 15 ऑक्टोंबरपासून राज्यातील साखर कारखाने हे सुरु झाले आहेत. कोल्हापूर येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी ही घोषणा केली आहे तर दुसरीकडे शिरोळ येथील दत्त कारखान्याचे गणपतराव पाटील यांनीही हीच घोषणा केली आहे. राज्यातील 146 साखर कारखान्यांनी एफएआरपीची 100 टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना पूर्णत्वाने दिली ते कारखाने सोडून इतर कारखान्यांना गाळप परवाने न देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

इतर बातम्या:

ऊसाची FRP एकरकमी देणार, राजर्षी शाहू महाराज साखर कारखान्याची मोठी घोषणा

ऊस कारखानेच करीत आहेत एकरकमी ‘एफआरपी’ ची घोषणा, काय आहे पडद्यामागची गोष्ट ?

Swabhimani Shetkari Sanghtana Sangli organized motorcycle rally for sugarcane frp in one installment

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI