Positive News : मराठवाड्यातही पावसाच्या सरी, पेरणीबाबत मात्र कृषी विभगाचा सावध पवित्रा

| Updated on: Jun 21, 2022 | 10:38 AM

मराठवाड्यात पावसाअभावी सर्वकाही ठप्प झाले होते. त्याचा शेती व्यवसयावर अधिक परिणाम दिसून येत होता. शिवाय यंदा पेरण्या होतात की नाही अशी अवस्था निर्माण झाली होती. मात्र, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार या विभागात सोमवारपासून मध्यम ते हलक्या पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे शेती मशागतीची कामे पूर्ण तर होणार आहेतच पण पावसामध्ये सातत्य राहिले तर जून अखेरपर्यंत पेरण्याही होतील असा अंदाज आहे.

Positive News : मराठवाड्यातही पावसाच्या सरी, पेरणीबाबत मात्र कृषी विभगाचा सावध पवित्रा
आता मराठवाड्यातही पाऊस सक्रीय होत आहे.
Follow us on

औरंगाबाद : हंगामाच्या सुरवातीपासूनच (Marathwada) मराठवाड्यावर पावसाची अवकृपा राहिलेली आहे. त्यामुळे (Kharif Season) पेरणी सोडा पण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते की काय अशी अवस्था झाली होती. हुलकावणी दिलेला पाऊस आता कृपादृष्टी दाखवू लागला आहे. कारण सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे ही दिलासादाय बाब मानली जात आहे. असे असताना आता कुठे पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे (Re-Sowing) पेरणीपूर्व मशागतीच्या कामावर भर द्या पण पेरणीची गडबड करु नका असा सल्ला कृषी विभागाकडून दिला जात आहे.

रखडलेल्या कामांना मिळणार गती

मराठवाड्यात पावसाअभावी सर्वकाही ठप्प झाले होते. त्याचा शेती व्यवसयावर अधिक परिणाम दिसून येत होता. शिवाय यंदा पेरण्या होतात की नाही अशी अवस्था निर्माण झाली होती. मात्र, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार या विभागात सोमवारपासून मध्यम ते हलक्या पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे शेती मशागतीची कामे पूर्ण तर होणार आहेतच पण पावसामध्ये सातत्य राहिले तर जून अखेरपर्यंत पेरण्याही होतील असा अंदाज आहे. पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा पाऊस सर्वदूर बरसला नसला तरी उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. आता पुढील देन दिवसांमध्ये चित्र बदलणार असल्याचा अंदाज हवामान विभागानेच वर्तवल्याने सर्वकाही सुऱळीत होईल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे.

धूळपेरणी पिकांना मिळणार का जीवदान

मराठवाडा विभागातील नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये धूळपेरणी झाली आहे. असे असतानाही पावसाने हुलकावणी दिल्याने ही पिकेही धोक्यात आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु असल्याचे चित्र या भागात होते. पण सोमवारी रात्री नांदेडमध्ये पाऊस झाला आहे. त्यामुळे धूळपेरणी केलेल्या पिकांना जीवदान मिळणार का असा सवाल आहे. पावसाच्या आगमनामुळे मात्र चैतन्य निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे हवामान विभागाचा अंदाज ?

हवामान विभागाने राज्यात यलो आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे. यामध्ये कोकणातील पालघर, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर आणि विदर्भातील यवतमाळ चंद्रपूरात यलो अलर्ट देण्यात आला आहे तर विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागातही विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याचा इशारा आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे.