Sugar Factory : ऊसाचे गाळप रखडले, चिंता कशाला..! काय आहेत शेतकऱ्यांकडे पर्याय?

ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असताना सबंध राज्यात एकच चर्चा आहे ती म्हणजे ऊस अजूनही फडातच आहे. क्षेत्रामध्ये तब्बल दुपटीने वाढ झाल्यामुळे उत्पादन वाढूनही ऊस अजून शेतामध्येच आहे. साखर कारखान्यांकडून नियोजन हुकले असले तरी साखर आयुक्त कार्यालयाकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सुरु आहे. ऊसाचे एक टिपरुही शिल्लक राहणार नसल्याचे खुद्द साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, गाळपाचा कालावधी निघून गेल्याने ऊसाच्या वजनात 10 टक्के घट होणार आहे.

Sugar Factory : ऊसाचे गाळप रखडले, चिंता कशाला..! काय आहेत शेतकऱ्यांकडे पर्याय?
| Edited By: | Updated on: Feb 26, 2022 | 10:22 AM

नंदूरबार : (Sugarcane Sludge) ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असताना सबंध राज्यात एकच चर्चा आहे ती म्हणजे ऊस अजूनही फडातच आहे. क्षेत्रामध्ये तब्बल दुपटीने वाढ झाल्यामुळे उत्पादन वाढूनही ऊस अजून शेतामध्येच आहे. (Sugar Factory) साखर कारखान्यांकडून नियोजन हुकले असले तरी (Sugar Commissioner) साखर आयुक्त कार्यालयाकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सुरु आहे. ऊसाचे एक टिपरुही शिल्लक राहणार नसल्याचे खुद्द साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, गाळपाचा कालावधी निघून गेल्याने ऊसाच्या वजनात 10 टक्के घट होणार आहे. यंदा विक्रमी गाळप होऊनही 15 ते 20 टक्के ऊस हा फडातच आहे. यावर पर्याय म्हणून काही ठिकाणी गुऱ्हाळही सुरु करण्यात आले आहेत. गुऱ्हाळावर दिवासाकाठी 500 टन ऊसाचे गाळप हे बीड जिल्ह्यातील गेवराई येथे झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी इतर पर्यायाचाही शोध घेणे गरजेचे आहे. केवळ साखर कारखान्यांवरच बोट न ठेवता इतर पर्यायांचा शोध घेण्याचे आवाहन हे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी केले आहे.

गुऱ्हाळाचा पर्याय होतोय उभा

साखर कारखान्यांची संख्या वाढत राहिल्याने मध्यंतरी गुऱ्हाळ हे नव्याने उभारले गेलेच नाहीत. पण यंदा राज्याच गुऱ्हाळाची संख्या ही वाढलेली आहे. यामधून प्रक्रिया उद्योग उभारले जात आहेत तर गुळाची निर्मितीही वाढलेली आहे. 12 महिन्यांपुर्वी ऊसाचे गाळप झाले नाही तर वजनात घट होते. शिवाय ऊसाचा दर्जाही कमी होतो. मात्र, असे असले तरी केवळ 10 टक्के ऊसाचे वजन घटत असल्याचे रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे. ज्या शेतकऱ्यांचा कमी क्षेत्रावर ऊस आहे अशा शेतकऱ्यांनी गुऱ्हाळाचा पर्याय शोधणे गरजेचे असल्याचा सल्ला चांडक यांनी दिला आहे.

यंदा गाळपाचा कालावधी वाढणार

ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी संपूर्ण ऊसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाने हे बंद होणार नसल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. एवढेच नाही कारखाना क्षेत्रातील गाळप पूर्ण झाल्याशिवाय कारखाने बंद करु नये असे पत्रही संचालकांना दिले आहे. त्यामुळे एप्रिलपर्यंत गाळप सुरु राहणार असल्याचा अंदाज आहे. आणि कालावधी उलटूनही तोड झाली नाही तर केवळ 10 टक्के वजनात घट येते त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरुन न जाता इकर पर्यायाचा शोध घेणे गरजेचे आहे.

तरच होऊ शकते नुकसान…

ऊसाच्या वजनात घट हे काही पूर्णच नुकसान असे नाही. यामुळे केवळ 10 टक्के वजन घटते. शिवाय यंदा विक्रमी गाळप होऊनही ऊस फडातच आहे. त्यामुळे लागवडी दरम्यानचे नियोजन आता येथून पुढे करावे लागणार आहे. शिवाय गाळप हे सुरुच राहणार आहे. पण पुन्हा निसर्गाच्या लहरीपणाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला तर मात्र, न भरुन निघणारे नुकसान होणार आहे हे नक्की..

संबंधित बातम्या :

रब्बी अंतिम टप्प्यात तरी शेतकऱ्यांना प्रतिक्षा हक्काच्या पाण्याची, पाटबंधारे विभागाने ‘लिफ्ट’च दिली नाही

GMO Myths vs Reality : जनुकीय विकसित जीव विषयी कोणत्या गोष्टी जाणून घ्यायला हव्यात, वास्तव आणि मिथक नेमका फरक काय?

लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनचे भाव वधारले, शेतकऱ्यांमध्ये समाधान