AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GMO Myths vs Reality : जनुकीय विकसित जीव विषयी कोणत्या गोष्टी जाणून घ्यायला हव्यात, वास्तव आणि मिथक नेमका फरक काय?

प्राचीन काळापासून कृषी उत्पादकता वाढीसाठी होणाऱ्या प्रयत्नांमध्ये जनुकीय सुधारणा मध्यवर्ती ठरतात. जनुकीय बदलामुळे पिकांच्या आयुर्मानात वाढ होते. शास्त्रज्ञांनी जनुक संकलनाच्या विविध पद्धती विकसित केल्या आहेत.

GMO Myths vs Reality : जनुकीय विकसित जीव विषयी कोणत्या गोष्टी जाणून घ्यायला हव्यात, वास्तव आणि मिथक नेमका फरक काय?
GMO
| Edited By: | Updated on: Feb 25, 2022 | 5:39 PM
Share

नवी दिल्ली :  गेल्या हजारो वर्षांपासून वनस्पतीच्या विकासासाठी किंवा सुधारासाठी नैसर्गिक मिश्र संकर पद्धतीचा वापर केला जातो. आपल्या सर्वांच्या दैनंदिन व्यवहाराचा भाग बनलेलं केळे, गहू (Wheat) आणि मका यांचे स्वरुप आजसारखं नव्हतं. केळी मध्ये बिया मावत नव्हत्या तर गव्हाच्या ओब्यांना बियाच लगडत नव्हत्या. मका हे एकप्रकारे खाद्य अयोग्य गवत होतं.  खऱ्या अर्थांन तत्कालीन माणसाला जगातील आद्य अनुवंशशास्त्रज्ञच म्हणायला हवं. वनस्पती विकासाचे तत्त्कालीन प्रयत्नांना आपण पारंपरिक मिश्र संकर (Crossbreeding ) म्हणून ओळखतो. यशाच्या कमी शक्यतेसह कमी परिणामकारकतेनं बदल केले जात होते.  जनुकीय सुधारणांपेक्षा ही प्रक्रिया वेगळी ठरत नाही. अधिक यशस्वी दरासह वैज्ञानिकदृष्ट्या अचूक ठरते. जनुकीय विकसित जीव  (GMO) म्हणजे प्राणी, वनस्पती किंवा सूक्ष्मजीवांच्या डीएनएत सुधारणा करुन उपयुक्त वैशिष्ट्यांचा अंतर्भाव करणे होय.

जनुकीय विकसित जीव याचं महत्व काय?

प्राचीन काळापासून कृषी उत्पादकता वाढीसाठी होणाऱ्या प्रयत्नांमध्ये जनुकीय सुधारणा मध्यवर्ती ठरतात. जनुकीय बदलामुळे पिकांच्या आयुर्मानात वाढ होते. शास्त्रज्ञांनी जनुक संकलनाच्या विविध पद्धती विकसित केल्या आहेत. उदा, सुरवंटासाठी विषारी ठरणाऱ्या मात्र माणसासाठी घातक नसलेल्या मातीतील जीवाणूमधून डीएनए संकलित करणे आणि कीटक प्रतिरोधक बनविण्यासाठी मक्याच्या बियामध्ये प्रत्यारोपण करणे. यामुळे पिकाची तग धरण्याची क्षमता वाढते आणि सरासरी प्रति हेक्टर उत्पादनात वाढ होते.

वनस्पतींची कलम बनविण्याची सर्वसामान्य पद्धत ही जनुकीय सुधारणेचा भाग ठरते. अशाप्रकारे, जनुकीय सुधारणा पिकाच्या तग धरण्याच्या क्षमतेत हस्तक्षेप करतात. मात्र, मानवी वापरासाठीच्या अन्नाचा आरोग्य क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता नसते.  काही उदाहरणांत अन्नाच्या पोषणतत्वात वाढ होते तसेच पदार्थाची चवही सुधारते. उदाहरणार्थ,  काही जीएमओ सोयाबीन तेल हे पारंपरिक तेलापेक्षा अधिक आरोग्यवर्धक ठरतात.

जनुकीय बदल कसे होतात?

सर्वात महत्वाचं म्हणजे जनुकीय बदल हे निसर्गात यापूर्वीच अस्तित्वात असलेल्या वैशिष्ट्यांचा वापर करून केले जातात. जगातील सर्वाधिक चाचणी केलेल्या पिकांत जीएमओचा समावेश होतो. कृषी आणि मानवाच्या उपभोगासाठी वापर करण्यापूर्वी खाद्य उद्योगाकडून जीएमओ उत्पादनांच्या सुरक्षा चाचण्या आणि मूल्यांकन केले जातात.

जगातील वाढत्या अन्न मागणीचा विचार करता वर्ष 2050  पर्यंत कृषी उत्पादनांत 70% टक्क्यांनी वाढ होण्याची गरज आहे. तथापि, खाद्य आणि कृषी संस्थेनं (FAO) जगातील  40% पिकांचे किटकनाशकांमुळं नुकसान होत असल्याचा अंदाज वर्तविला आहे. जागतिक हवामान बदलामुळं नुकसानीत अधिक भर पडत आहे. अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अधिक कृषी उत्पादन आणि कमी पिक नुकसानीसाठी जनुकीय सुधारणा महत्वाच्या ठरतात.  जीएमओमुळं पिक उत्पादनाचा खर्च घटतो आणि सर्वांना मुबलक प्रमाणात उपलब्ध होते.

अधिक तग धरण्याच्या क्षमतेमुळं पाणी आणि खते कमी प्रमाणात असताना देखील पर्यावरणाला फायदा होतो.  जीएमओ मधील नवसुधारणांत पाण्याच्या दुर्भिक्ष्यात, विभिन्न पीक रोग आणि कीटकनाशकांच्या प्रभाव निष्प्रभ करण्यासाठी परिणामकारक ठरण्याची क्षमता आहे.

अन्नाचा निर्णय घेण्यासाठी भीतीपेक्षा विज्ञानाची कसोटी वापरायला हवी. जनुकीयशास्त्र हे सुरक्षित तंत्रज्ञान आहे आणि आगामी काळात मुबलक-अन्न भविष्यासाठी महत्वाची भूमिका बजावेल हे निश्चितच आहे.

इतर बातम्या:

Russia Ukraine Crisis : युद्धाच्या हाहाकारात यूक्रेनंचं एक पाऊल मागे, रशियासोबत चर्चेसाठी तयार, मात्र ठेवली ‘ही’ अट

अनिल देशमुखांना एक आणि नवाब मलिकांना वेगळा न्याय, लाड करण्याचं कारण काय? राधाकृष्ण विखे पाटील यांचा सवाल

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.