AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan Samman Nidhi | शेतकऱ्यांच्या खात्यात कधीही येऊ शकतात पीएम किसान सन्मान निधीचे पैसे

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6000 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. (The money of PM Kisan Sanman Fund can come in the account of the farmers at any time)

PM Kisan Samman Nidhi | शेतकऱ्यांच्या खात्यात कधीही येऊ शकतात पीएम किसान सन्मान निधीचे पैसे
PM Kisan Samman Nidhi
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: May 07, 2021 | 6:17 PM
Share

नवी दिल्ली : निवडणूक आचारसंहिता संपली आहे. आता पुढील एक आठवड्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे (पीएम किसान) पैसे येणे अपेक्षित आहे. शुक्रवारी पंतप्रधान किसान सन्मान निधी आणि कृषी पायाभूत सुविधा निधी योजनांच्या संदर्भात सल्लागार समितीची बैठक झाली. यात केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, राज्यमंत्री कैलास चौधरी आणि व्हर्चुअल माध्यमातून सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते. परंतु, अद्याप कोणत्या तारखेला आठव्या हप्त्याचे पैसे हस्तांतरीत करायचे याचा निर्णय झालेला नाही. (The money of PM Kisan Sanman Fund can come in the account of the farmers at any time)

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6000 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. जे दर चार महिन्यांनी 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये उपलब्ध आहे. यावेळी 1 एप्रिलपासून शेतकऱ्यांचा हप्ता थकीत आहे. कारण आधी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे आठवा हफ्ता लांबणीवर पडला होता आणि आता कोविड -19 मुळे सरकार त्यांच्या नियंत्रणामध्ये व्यस्त आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT)च्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट ऑनलाईन पेमेंट केले जाते. दिनांक 31 मार्च 2021 पर्यंत 10.82 कोटी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सुमारे 1,16,292.9 कोटी रुपये हस्तांतरीत करण्यात आले आहेत.

एआयएफ म्हणजे काय?

बैठकीत कृषिमंत्री तोमर म्हणाले की, कृषी पायाभूत सुविधा निधीचे उद्दीष्ट हंगामानंतरची पायाभूत सुविधा आणि सामुदायिक शेती मालमत्ता तयार करणे आहे, जे त्यांच्या उत्पादनांना शेतकऱ्यांना अधिक चांगले मूल्य प्रदान करेल. त्यांचे उत्पन्न वाढेल. या योजनेंतर्गत प्राथमिक कृषी पत संस्था (पीएसीएस), विपणन सहकारी समित्या, शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ), बचत-गट (एसएचजी), शेतकरी, संयुक्त दायित्व गट (जेएलजी), बहुउद्देशीय सहकारी समित्या, कृषि-उद्योजक, स्टार्टअप्स आणि 1 लाख केंद्र / राज्य संस्था किंवा स्थानिक संस्था पुरस्कृत असलेल्या सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्पांना कर्जाच्या स्वरूपात बँक आणि वित्तीय संस्थांकडून 1 कोटी रुपये प्रदान केले जाणार आहेत.

प्रथमच 3 कोटीहून अधिक शेतकर्‍यांना मिळाली होती ही रक्कम

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना लोकसभा निवडणुका 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली. तथापि, 1 डिसेंबर 2018 पासून प्रभावी मानले गेले. पहिल्यांदा 3 कोटी 16 लाख 05 हजार 539 शेतकर्‍यांना दोन हजार रुपयांचा हप्ता मिळाला होता. या योजने अंतर्गत आतापर्यंत 10 कोटीहून अधिक शेतकर्‍यांची नोंदणी झाली आहे. डिसेंबरमध्ये जाहीर केलेला हप्ता 10 कोटी 70 हजार 978 शेतकऱ्यांना देण्यात आला. आर्थिक वर्ष 2020-21 च्या एप्रिल ते जुलैच्या हप्त्यात जास्तीत जास्त रक्कम शेतकऱ्यांना मिळाली. यावेळी केंद्र सरकारने 10 कोटी 48 लाख 95 हजार 545 शेतकर्‍यांच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठवले होते. (The money of PM Kisan Sanman Fund can come in the account of the farmers at any time)

इतर बातम्या

शरद पवार इज बॅक, कोरोना संकटात शेतकरी, छोट्या व्यापाऱ्यांना मदत देण्याचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना सल्ला

इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत धमाका, मात्र आयपीएल 2021 मध्ये अयशस्वी, शार्दुलच्या नावे लाजिरवाणा विक्रम

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?