AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत धमाका, मात्र आयपीएल 2021 मध्ये अयशस्वी, शार्दुलच्या नावे लाजिरवाणा विक्रम

चेन्नई सुपर किंग्सचा (chennai super kings) वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (ipl 2021) 7 सामन्यात 5 विकेट्स घेतल्या.

इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत धमाका, मात्र आयपीएल 2021 मध्ये अयशस्वी, शार्दुलच्या नावे लाजिरवाणा विक्रम
शार्दुल ठाकूर
| Updated on: May 07, 2021 | 5:51 PM
Share

मुंबई : प्रत्येक क्रिकेटपटूच्या आयुष्यात चढ उतार येत असतात. तो खेळाडू कधी चांगली कामगिरी करुन आपल्या टीमला विजय मिळवून देतो. तर कधी तो अपयशीही ठरतो. क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत राहणं हे आव्हानात्मक असतं. आयपीएल 2021 आधी टीम इंडियाने (Team India) भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड टीमचा कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 अशा तिन्ही मालिकेत धुव्वा उडवला. प्रत्येक मालिकेत टीम इंडियाच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. टीम इंडियाला टी 20 मालिकेत विजय मिळवून देण्यात मराठमोळ्या ‘पालघर एक्सप्रेस’ शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) विजयी भूमिका बजावली. मात्र हीच कामगिरी आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमात करण्यात शार्दुल अयशस्वी ठरला. सोबतच त्याच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंदही झाली. (Chennai Super Kings fast bowler Shardul Thakur throw 16 wide balls in ipl 2021)

काय आहे विक्रम?

शार्दुल आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व करतो. कोरोनामुळे 14 वा मोसम 29 सामन्यानंतर स्थगित करण्यात आला. तोवर चेन्नईने 7 सामने खेळले होते. शार्दुलला या 7 सामन्यात विशेष काही करता आले नाही. शार्दुलने या 7 सामन्यात फक्त 5 विकेट्स घेतल्या. या 7 सामन्यात शार्दुलने 1 नाही 2 नाही तब्बल 16 वाईट चेंडू टाकले.

शार्दुलने दिल्ली कॅपिट्ल्सला पछाडलं

शार्दुलने वाईड चेंडू टाकण्याबाबत किर्तीमान केला. या मोसमात दिल्ली कॅपिट्ल्सच्या गोलंदाजांपेक्षा अधिक वाईड्स चेंडू एकट्या शार्दुलने टाकले. दिल्लीच्या सर्व गोलंदाजांनी 13 वाईड टाकले होते. तर शार्दुलने 16 वाईड चेंडू टाकले.

कर्णधार धोनीकडून वारंवार संधी

शार्दुल ठाकूर सातत्याने निराशाजनक कामगिरी करत होता. त्याला विकेट्स घेण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. शार्दुलने 2 सामन्यात 50 पेक्षा अधिक धावा दिल्या. मात्र यानंतरही कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्याला प्लेइंग इलेव्हनमधून न वगळता वारंवार संधी दिली. शार्दुलने या मोसमातील 7 सामन्यांमध्ये 10.33 च्या इकॉनॉमी रेटने केवळ 5 विकेट्स घेतल्या. म्हणजेत शार्दुलने टाकलेल्या प्रत्येक ओव्हरमध्ये 10 पेक्षा अधिक धावा लुटल्या.

संबंधित बातम्या :

PHOTO | IPL 2021 स्थगितीमुळे फ्लॉप शो करणाऱ्या ‘या’ खेळाडूंच्या जीवात जीव, कोण आहेत ते क्रिकेटपटू?

PHOTO | आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी ‘या’ नवख्या खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता

(Chennai Super Kings fast bowler Shardul Thakur throw 16 wide balls in ipl 2021)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.