Kharif Season : विदर्भात मान्सून दाखल, तरीही शेतकऱ्यांची चिंता कायम ? पेरणीला नेमका कशाचा अडसर

| Updated on: Jun 17, 2022 | 1:16 PM

अकोला एमआयडीसी येथील गोडाऊनमध्ये नामांकित कंपनीच्या ब्रॅंडच्या नावाने बनावट खत तयार करणाऱ्या एका कंपनीवर कृषी निविष्ठा जिल्हास्तरीय भरारी पथकाने कारवाई करुन 20 लाख 5 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मध्यंतरीच परावाना नसतानाही बियाणांची विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई केल्यानंतर आता हा प्रकार उघडकीस आला आहे.

Kharif Season : विदर्भात मान्सून दाखल, तरीही शेतकऱ्यांची चिंता कायम ? पेरणीला नेमका कशाचा अडसर
अकोल्यात बनावट खताची निर्मिती केली जात असल्याचे उघड झाले आहे.
Follow us on

अकोला : कोकण, उत्तर महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला (Monsoon) पाऊस आता विदर्भातही दाखल झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून (Vidarbh Division) विभागातील विविध भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने आता कुठे पेरण्याला सुरवात होईल असे चित्र निर्माण झाले आहे. निसर्गाची कृपादृष्टी होत असतानाही पेरणीकामात अडसर ठरत आहे तो (Seed & Fertilizer) बियाणे आणि खत विक्रेत्यांचा. कारण आठवड्याभरात एकट्या अकोला जिल्ह्यात दोन वेळा अनाधिकृतपणे बियाणे विक्री करणाऱ्या सेवा केंद्रावर कारवाया झाल्या आहेत. हे कमी म्हणून की काय आता अमरावतीमधून युरिया खताची तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. पोषक वातावरणानंतर आता खत आणि बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण होते की काय अशी स्थिती आहे. शिवाय कृषिमंत्री दादा भुसे यांनी बियाणे विक्रीमध्ये अनियमितता आढळून आल्यास कडक कारवाईचे आदेश दिल्यानंतरही हे प्रकार वाढत आहेत.

अमरावतीमधून खताची तस्करी, 240 बॅग जप्त

खरिपाच्या तोंडावर युरिया खतांची तस्करी होत समोर आलं आहे. अमरावतीतून मध्यप्रदेशात युरियाची तस्करी होत आहे. कृषी विभाग आणि पोलिसांच्या मदतीने हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. अमरावतीच्या पांढरघाटी येथुन मध्यप्रदेशात युरियाची तस्करी होत असल्याची माहिती प्रशासनाला होती.त्यावरून सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. यात ट्रकसह २४० युरियाच्या बॅग जप्त करण्यात आल्यात. या प्रकरणी ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई पोलीस आणि कृषी विभागाकडून केली जाते आहे.

अकोल्यात बनावट खताची निर्मिती

अकोला एमआयडीसी येथील गोडाऊनमध्ये नामांकित कंपनीच्या ब्रॅंडच्या नावाने बनावट खत तयार करणाऱ्या एका कंपनीवर कृषी निविष्ठा जिल्हास्तरीय भरारी पथकाने कारवाई करुन 20 लाख 5 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मध्यंतरीच परावाना नसतानाही बियाणांची विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई केल्यानंतर आता हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे पावसाने दिलासा दिला असला तरी शेतकऱ्यांची चिंता ही कायम आहे. विभागातील गोंदिया जिल्ह्यातून पाऊस दाखल झाला असून आता संपूर्ण विभागात तो सक्रिय होत आहे.

हे सुद्धा वाचा

कृषी विभाग तत्पर

खरीप हंगाम सुरु झाल्यापासून सर्वाधिक कारवाया ह्या विदर्भात झाल्या आहेत. तालुकानिहाय भरारी पथकाची नेमणूक कऱण्यात आली आहे. शिवाय अकोला जिल्ह्यात खत आणि बियाणे विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याने कृषी विभागाने यंदा विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.