Mango Export : फळांचा राजा लासलगाव मार्गे अमेरिकेत, नेमकी काय होते प्रक्रिया?

उमेश पारीक

उमेश पारीक | Edited By: राजेंद्र खराडे

Updated on: Jun 17, 2022 | 12:31 PM

लासलगाव येथील भाभा अणु संशोधन केंद्रातून अल्फान्सो, केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत,हापूस या जातीच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन 360 मॅट्रिक टन आंबे अमेरिकेला रवाना झाली. सन 2019 च्या तुलनेत आंबा निर्यातीत 325 मे टन ने घट झाल्याचे दिसत आहे. या प्रक्रियेमुळे आंब्याचा दर्जा टिकून राहतो तर बदलत्या वातारणाचा फळावर परिणाम होत नसल्याचे सांगण्यात आले आहे.

Mango Export : फळांचा राजा लासलगाव मार्गे अमेरिकेत, नेमकी काय होते प्रक्रिया?
लासलगाव येथील अणु भाभा संशोधन केंद्रातून आंब्याची निर्यात केली जाते
Image Credit source: TV9 Marathi

लासलगाव : निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा (Mango Production) आंबा उत्पादनात घट झाली असली तरी चढ्या मार्केटचा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. सध्या हापूस आंब्याचा हंगाम संपुष्टात आला असून गवरान आंबे बाजारात आहेत. मात्र, प्रतिकूल परस्थितीमध्ये रसाळ आणि गोड चवीमुळे हापूसचे महत्व टिकून राहिले होते. त्यामुळे उत्पादनात घट झाली असली तरी (Export) निर्यातीमुळे मिळालेला दर शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा ठरला आहे.यामुळे अधिकचा फायदा झाला नसला तरी शेतकऱ्यांचे नुकसान टळले आहे. यंदाच्या हंगामात 360 मेट्रिक टन आंब्यावर प्रक्रिया करुन हा (Hapus Mango) फळांचा राजा हापूस न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजेलिस, शिकागो याठिकाणी दाखल झाला होता. लासलगाव येथील भाभा अणु संशोधन केंद्रात प्रक्रिया करुन ही निर्यात केली जात आहे.

नेमकी काय होते प्रक्रिया ?

लासलगाव येथील भाभा अणु संशोधन केंद्रातून अल्फान्सो, केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत,हापूस या जातीच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन 360 मॅट्रिक टन आंबे अमेरिकेला रवाना झाली. सन 2019 च्या तुलनेत आंबा निर्यातीत 325 मे टन ने घट झाल्याचे दिसत आहे. या प्रक्रियेमुळे आंब्याचा दर्जा टिकून राहतो तर बदलत्या वातारणाचा फळावर परिणाम होत नसल्याचे सांगण्यात आले आहे.निर्यात झाला आंबा हा लासलगावहूनच निर्यात होतो. त्यामुळे भाभा अणु संशोधन केंद्राला वेगळे असे महत्व आहे.

2019 च्या तुलनेत घटली निर्यात

यंदा निर्यातीमुळे आंबा उत्पादकांना दिलासा मिळाला असला तरी 2019 च्या तुलनेत निर्यातीचे प्रमाण हे कमी राहिले आहे. तर गतवर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आंबा निर्यातच झाली नव्हती. 2019 च्या तुलनेत 325 मेट्रिक टनाने निर्यात ही घटली आहे. देशांतर्गत बाजारपेठतही आंब्याचा उठाव झाला नव्हता पण अमेरिकेसह न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजेलिस, शिकागो या देशांमध्ये निर्यात झाल्याने उत्पन्नाच्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी फायद्याचे राहिले आहे.

हे सुद्धा वाचा

ऑस्ट्रेलियातील निर्यात बंदीचाही परिणाम

दरवर्षी ऑस्ट्रेलियामध्येही मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची निर्यात केली जाते. पण गेल्या वर्षीपासून या देशातील निर्यात बंद आहे. देशात कोरोनाचा वाढच्या प्रादुर्भावामुळे या देशातील कृषी विभागाने भारतीय आंब्याच्या आयातीस परवानगी दिली नाही. परिणामी आंबा निर्यातीवर त्याचा परिणाम झाला होता. यापेक्षा अधिकचे नुकसान झाले ते अवकाळी पावसामुळे हंगामाच्या सुरवातीपासूनच पाऊस लागून राहिल्याने आंब्याचा दर्जा ढासळला होता.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI