AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chickpea Crop : हरभऱ्याला हमीभावाचा ‘आधार’, उत्पादन वाढूनही दर नियंत्रणात, भविष्यात काय होणार बदल?

रब्बी हंगामात हरभऱ्याचे वाढलेले क्षेत्र आणि पोषक वातावरण यामुळे यंदा उत्पादन वाढणार हे निश्चित होते. केंद्र सरकारने तर यंदा देशात 131 लाख टन उत्पादन होईल असा अंदाजच वर्तवला होता. पण प्रत्यक्षात आता हरभरा काढणी अंतिम टप्प्यात असून 80 ते 90 लाख टनाचे उत्पादन झाले आहे. मध्यंतरी कोरोना काळात नाफेडच्या माध्यमातून हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. त्यामुळे राज्यभर नाफेडने हमीभाव केंद्र उभारली आहेत. केंद्रावरील दर आणि बाजारपेठेतील दर यामध्ये 400 रुपयांचा फरक राहिलेला आहे.

Chickpea Crop : हरभऱ्याला हमीभावाचा 'आधार', उत्पादन वाढूनही दर नियंत्रणात, भविष्यात काय होणार बदल?
हरभरा खरेदी केंद्रImage Credit source: TV9 Marathi
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Apr 09, 2022 | 5:38 AM
Share

लातूर :  (Rabi Season) रब्बी हंगामात हरभऱ्याचे वाढलेले क्षेत्र आणि पोषक वातावरण यामुळे यंदा उत्पादन वाढणार हे निश्चित होते. केंद्र सरकारने तर यंदा देशात 131 लाख टन उत्पादन होईल असा अंदाजच वर्तवला होता. पण प्रत्यक्षात आता (Chickpea Crop) हरभरा काढणी अंतिम टप्प्यात असून 80 ते 90 लाख टनाचे उत्पादन झाले आहे. मध्यंतरी कोरोना काळात नाफेडच्या माध्यमातून हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. त्यामुळे राज्यभर (NAFED) नाफेडने हमीभाव केंद्र उभारली आहेत. केंद्रावरील दर आणि बाजारपेठेतील दर यामध्ये 400 रुपयांचा फरक राहिलेला आहे. हमीभाव केंद्रावर 400 रुपये अधिकचे मिळत आहेत. असे असले तरी हमीभाव केंद्रामुळेच बाजारपेठेत हे दर टिकून आहेत. शिवाय केंद्राने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे उत्पादन झाले नसून भविष्यात मागणी वाढल्यास हरभऱ्याच्या दरातही वाढ होणार आहे.

नाफेडच्या माध्यमातून 3 लाख 71 हजार टन हरभऱ्याची खरेदी

राज्यात 1 फेब्रुवारीपासून हरभरा हमीभाव केंद्र उभारण्यात आली आहेत. हंगामाच्या सुरवातीला केंद्रावरील नोंदणी, विक्रीसाठी होणारा विलंब यामुळे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली होती. पण आता शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. गेल्या दोन महिन्यात नाफेडकडे तब्बल 3 लाख 71 हजार टन हरभऱ्याची खरेदी झाली आहे. सध्या हे प्रमाण कमी आहे. मात्र, बाजारपेठेतील अवस्था पाहता शेतकरी आता खरेदी केंद्राचा आधार घेऊ लागले आहेत. शिवाय दरात तफावत असल्याने शेतकरी नोंदणी करुन विक्रीवर भर देत आहे. दरात असाच फरक राहिला तर शेतकरी आपली भूमिका बदलतील असा विश्वास कृषितज्ञांना आहे.

असे असतानाही शेतकऱ्यांचा विक्रीवर भर

यंदाच्या हंगामात उत्पादकता पाहून शेतकऱ्यांनी शेतीमालाची विक्री करायची की नाही याबाबत निर्णय घेतला आहे. सोयाबीन, कापसाचे उत्पादन घटल्यामुळे दर वाढणार हे निश्चित होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी ‘वेट अॅण्ड वॉच’ ची भूमिका घेतली. त्यामुळेच हंगामाच्या अंतिम टप्प्यात का होईना चित्र बदलले. पण रब्बी हंगामातील हरभऱ्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे दरात मोठ्या प्रमाणात बदल होतील असे वातावरण नाही. त्यामुळे शेतकरी हरभरा विक्रीवर भर देत आहे. पण काही दिवस अशी परस्थिती राहणार असून भविष्यात खरेदी केंद्रापेक्षा बाजारपेठेत हरभऱ्याला अधिकचा दर राहिल असा अंदाज आहे.

खरेदी केंद्र आणि बाजारपेठेतील दर

नाफेडच्या माध्यमातून राज्यात हरभरा खरेदी केंद्रन सुरु करण्यात आली आहेत. खरेदी केंद्रावर 5 हजार 230 असा दर ठरवून देण्यात आला आहे. त्यामुळे केंद्र सुरु होताच नोंदणीला सुरवात झाली होती. तर दुसरीकडे बाजारपेठेत हंगामाच्या सुरवातीला 4 हजार 500 असा दर होता. यामध्ये सुधारणा होत गेली असून बाजारपेठेत 4 हजार 700 पर्यंत दर गेले आहेत. 200 रुपयांपेक्षा अधिक तफावत असल्यास शेतकरी खरेदी केंद्राचा आधार घेतात. त्यामुळे भविष्यात बाजारपेठेतीलही दर वाढतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

संबंधित बातम्या :

Excess sugarcane: साखर आयुक्तांच्या सूचना अन् गावस्तरावर अंमलबजावणी, लागेल का अतिरिक्त उसाचा प्रश्न निकाली!

Onion Market : उन्हाळी कांद्याचे उत्पादनही घटले अन् दरही, शेतकऱ्यांसमोर आता एकच पर्याय..!

Nandurbar Market: युध्द रशिया-युक्रेन युध्दाचा फायदा धुळ्याच्या शेतकऱ्याला, 973 च्या वाणाच्या गव्हाला विक्रमी दर

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?