Agricultural Department : मातीच्या गुणधर्मावर पिकांचे उत्पादन, शेती व्यवसयासाठी ‘टर्निंग पॉईंट’..!

देशातील 115 जिल्ह्यामध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर 27 जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मातीचे गुणधर्मांचा अभ्यास करुन जमिनीचा दर्जा काय आहे. त्यामध्ये कोणती पिके घेतली जाऊ शकते तर उत्पादनात वाढ कशी करायची याबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे.

Agricultural Department : मातीच्या गुणधर्मावर पिकांचे उत्पादन, शेती व्यवसयासाठी 'टर्निंग पॉईंट'..!
माती परीक्षण
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 4:05 PM

मुंबई :  (Farming Production) शेती उत्पादनात दुपटीने वाढ व्हावी हा प्रयत्न सरकारचा राहिलेला आहे. त्याच अनुशंगाने एक ना अनेक प्रयोग शासनाच्या माध्यमातून राबवले जातात. त्यापैकीच महत्वाचा मानला जाणारा उपक्रम म्हणजे (Soil Test) माती परीक्षण. माती परिक्षणामुळे जमिनीचा दर्जा तर लक्षात येतोच पण कोणते (Crop) पीक घेऊन उत्पादकता वाढवता येते याचा अचूक अंदाजही बांधता येतो. असे असले तरी स्थानिक पातळीवर माती परिक्षणाकडे दुर्लक्ष होतेच. त्यामुळे देशातील 115 जिल्ह्यांमध्ये मातीच्या गुणधर्मानुसार पिके घेतली जाणार आहेत. एवढेच नाहीतर 27 जिल्ह्यामध्ये या कामाला सुरवातही झाली आहे. राष्ट्रीय मृदा सर्वेक्षणच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवला जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे.

योग्य पीक घेतल्यावरच जमिनीचा पोत टिकून

काळाच्या ओघात पीक पध्दतीमध्ये बदल झाला असला तरी शेतकऱ्यांची शेत जमिनीला घेऊन विचारधारा अद्यापही बदललेली नाही. पीक पध्दतीमध्ये मातीची काय भूमिका असा समज आजही कायम आहे. कोणत्याही मातीमध्य़े कोणतेही पीक घेता येते हा शेतकऱ्यांचा मोठा समज आहे. मात्र, यामुळे दुहेरी नुकसान होते. एकतर जमिनीचा पोत टिकून राहत नाही आणि शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही. अशा बाबी निदर्शनास आल्यामुळेच आता मातीच्या गुणधर्मानुसारच पीक हे धोरण निती आयोगाच्या पुढाकारातून ठरवण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील नंदुरबारला पहिला मान

देशातील 115 जिल्ह्यामध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर 27 जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मातीचे गुणधर्मांचा अभ्यास करुन जमिनीचा दर्जा काय आहे. त्यामध्ये कोणती पिके घेतली जाऊ शकते तर उत्पादनात वाढ कशी करायची याबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे.

हे सुद्धा वाचा

नेमका माती परिक्षणाचा काय होतो फायदा?

जमिनीच्या प्रतिनुसार पिकाची निवड व नियोजन करता येते. जमिन सुधारण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करता येते. आवश्यक तेवढेच खत व संतुलीत खतांचा पुरवठा झाल्यामुळे आर्थिक बचत व उत्पादन क्षमता टिकून राहते. प्रत्येक विभागातून 10 ते20 ठिकाणाचे मातीचे नमुने घेऊन ते घमेल्यात किंवा स्वच्छ पोते यावर घ्यावे. त्याचे चार समान भाग करून समोरासमोरचे दोन भाग पूर्ण घ्यावेत. अशाप्रकारे अर्धा किलो माती होईपर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.