Mumbai Rains: मुंबईत येत्या 48 तासांत मुसळधार! किनारपट्टीच्या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसणार

येत्या 48 तासांत मुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ कृष्णकांत होसाळीकर यांनी व्यक्त केलाय.

Mumbai Rains: मुंबईत येत्या 48 तासांत मुसळधार! किनारपट्टीच्या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसणार
मुंबईत येत्या 48 तासांत मुसळधार!
Image Credit source: twitter
रचना भोंडवे

|

Jun 30, 2022 | 6:51 AM

मुंबई: किनारपट्टीच्या भागात म्हणजेच मुंबईसह (Mumbai)  कोकण, गोव्यात पाच दिवस काही ठिकाणी पाऊस बरसणार आहे. त्यामुळे रहिवाशांनी या पाच दिवसांत किनारपट्टीच्या भागांत तूर्तास जाऊ नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. २९ जून ते ३ जुलैपर्यंत (July) सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस (Rain) राहील. त्याचबरोबर येत्या 48 तासांत मुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ कृष्णकांत होसाळीकर यांनी व्यक्त केलाय.

धरणांमधील पाणीसाठा कमी

मुंबईत आजही आकाश ढगाळ राहणार असून मध्यम स्वरूपाच्या सरी बरसतील. मात्र उपनगरात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. मुंबईसह राज्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा कमी होऊ लागला असताना मुंबईसह राज्यात काल पावसाने काही ठिकाणी जोरदार हजेरी लावली. मुंबईसह राज्यात पावसाने ओढ दिली असल्यामुळे ग्रामीण भागात पेरण्यांना उशीर झालाय. या पेरण्या जुलै महिन्यापासून सुरू कराव्यात असे आवाहन आधीच करण्यात आलंय. मुंबईत काल सकाळपासून ढगाळ वातावरण होते. अधूनमधून मध्यम आणि जोरदार सरी कोसळल्या, मात्र दुपारनंतर पाऊस थांबला. अधूनमधून लहान सरी कोसळत होत्या.

  1. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे
  2. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
  3. विदर्भातही काही ठिकाणी मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
  4. मुंबईसह कोकण, गोवा इथे पुढील 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

किनारपट्टीवरील भागात पुढील पाच दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. रहिवाशांनी किनारपट्टीच्या भागात काही दिवस जाऊ नये असं आवाहन स्थानिक प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय.

हे सुद्धा वाचा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें