AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Buldhana : अहो खरंच..! पेरणीच्या तोंडावर बियाणांवरही चोरट्यांचा डल्ला, आठवड्यानंतर आरोपी अटकेत

यंदा खताच्या दरात वाढ होणार हे निश्चित होते. कच्च्या मालाचा तुटवडा आणि जागतिक पातळीवरील युध्दजन्य परस्थिती यामुळे खताचे दर वाढले आहेत. यामध्ये सरकारने अनुदान जरी वाढवले असले तरी शेतकऱ्यांना याचा फटका सहन करावा लागतच आहे. हे कमी म्हणून की काय महाबीजने सोयाबीन बियाणांच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे वाढलेल्या दरामुळे आता बियाणे चोरीच्या घटनाही होऊ लागल्या आहेत.

Buldhana : अहो खरंच..! पेरणीच्या तोंडावर बियाणांवरही चोरट्यांचा डल्ला, आठवड्यानंतर आरोपी अटकेत
बुलडाणा जिल्ह्यात बियाणांची चोरी झाली होती. आठ दिवसानंतर आरोपीला अटक कऱण्यात आले आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jun 14, 2022 | 10:51 AM
Share

बुलडाणा : आतापर्यंत शेतीमालाच्या चोरीच्या घटना घडल्या होत्या पण यंदा (Seeds) बी-बियाणांचे दरही असे काय वाढले आहेत की (Theft of seeds) बियाणांची चोरी करुन ते जमिनीत गाढण्याची नामुष्की ओढावली आहे. आता तुम्हाला विश्वास बसणार नाही पण बुलडाणा जिल्ह्यातील मातोळा येथे चक्क कृषी सेवा केंद्र फोडून लाखोंचा माल लंपास करण्यात आला होता. त्यामुळे वाढीव बियाणे दराचा काय परिणाम होऊ शकतो याचा प्रत्यय आला आहे. (Kharif Season) बी-बियाणांसोबत दुकानातील लाखों रुपयांचे दागिणेही चोरट्यांनी लंपास केले होते. अखेर आठ दिवसानंतर दुकान फोडणाऱ्या आरोपींना बोराखडी येथील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बियाणांच्या दरात वाढ, असा हा दुहेरी फटका

यंदा खताच्या दरात वाढ होणार हे निश्चित होते. कच्च्या मालाचा तुटवडा आणि जागतिक पातळीवरील युध्दजन्य परस्थिती यामुळे खताचे दर वाढले आहेत. यामध्ये सरकारने अनुदान जरी वाढवले असले तरी शेतकऱ्यांना याचा फटका सहन करावा लागतच आहे. हे कमी म्हणून की काय महाबीजने सोयाबीन बियाणांच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे वाढलेल्या दरामुळे आता बियाणे चोरीच्या घटनाही होऊ लागल्या आहेत. पेरणीच्या तोंडावर बियाणांची मागणी होणार म्हणून मातोळा येथील सुरेश सदानी यांनी लाखोंचा माल भरुन ठेवला होता. चोरट्यांना बियाणांसह इतर साहित्य लंपास केले होते.

कापूस बियाणांवर चोरट्यांचा डोळा

यंदाच्या खरिपात सोयाबीन आणि कापसावरच शेतकऱ्यांचा भर आहे. शिवाय हंगामाच्या सुरवातीला कापूस लागवडीवर भर दिला जातो. त्यामुळे सदानी यांनी कापसासह मका, ज्वारी बियाणे विक्रीसाठी ठेवले होते. बियाणे खतांचा भरणा करताच अशाप्रकारे चोरी झाल्याने शेतकऱ्यांची तर अडचण झालीच पण आता कृषी विभागाकडून विचारणा झाल्यावर काय उत्तर द्यावे असा प्रश्न उपस्थित झाला होता.

असा लागला चोरीचा छडा

बियाणांसह इतर साहित्य लंपास झाल्याने बोराखडी ठाण्याचे पोलिस गेल्या आठवड्यापासून चोरट्यांच्या मागावर होते. विशेष पथकाची नेमणूक आणि सीसीटीव्ही व गोपनिय माहितीच्या आधारे पोलिसांनी या घटनेतील मुख्य आरोपी शेख साबीर शेख अहमद (मलकापुर) याला अटक केली आहे. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहनही जप्त करण्यात आले आहे. गुन्ह्यातील इतर चार आरोपींचा अद्यापही पोलीस शोध घेत असून ते फरार आहेत.

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.