अजबच : शेतीमाल साठवणूकीसाठी बारदानाच नसल्याने भात खरेदी केंद्र बंद, शेतकऱ्यांचे नुकसान

| Updated on: Nov 20, 2021 | 6:43 PM

भात शेतीचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले आहे पण अद्यापपर्यंत खरेदी केंद्रच सुरु झालेली नाहीत. कारण काय तर खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी विकास महामंडळाकडे बारदाणाच शिल्लक नाही. त्यामुळे कोकणातील पालघर ,ठाणे ,रायगड जिल्ह्यात भाताचे उत्पादन होऊनही शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळालेला नाही.

अजबच : शेतीमाल साठवणूकीसाठी बारदानाच नसल्याने भात खरेदी केंद्र बंद, शेतकऱ्यांचे नुकसान
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

पालघर : शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी एक ना अनेक प्रयत्न केले जात आहेत. पण दुसरीकडे शेतामध्ये उत्पादीत झालेल्या शेतीमालाचे नुकसानही याच सरकारमुळे होत आहे. कारण भात शेतीचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले आहे पण अद्यापपर्यंत खरेदी केंद्रच सुरु झालेली नाहीत. कारण काय तर खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी विकास महामंडळाकडे बारदानाच शिल्लक नाही. त्यामुळे कोकणातील पालघर ,ठाणे ,रायगड जिल्ह्यात भाताचे उत्पादन होऊनही शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळालेला नाही.

चालू वर्षात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ कडून  भात खरेदी केंद्र चालू न झाल्यामुळे याचा फायदा व्यापारी घेत असून कमी भावाने खाजगी व्यापारी  भात खरेदी करीत असल्यामुळे  आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागणार आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर भात खरेदी केंद्र सुरु करावी अशी मागणी कोकणातील शेतकरी करीत आहेत

गतवर्षी झाले होते योग्य नियोजन

गतवर्षी संपूर्ण कोकणातून 6 लाख 65 हजार क्विंटलची साळीची खरेदी करण्यात आली होती. त्यापैकी पालघर जिल्हात 30 भात खरेदी केंद्रातून 3 लाख क्विंटल साळीची खरेदी करण्यात आली होती. तर शेतकऱ्याला 1860 रुपये प्रमाणे दर मिळाला होता. या वर्षी 1940 रुपये भाव देण्यात येणार आहे. मागच्या भावा नुसार 80 रुपये वाढ करण्यात आली आहे. दरवाढ करण्यात आली आहे मात्र, खरेदी केंद्रच सुरु नसल्याने या दरवाढीचा काय उपयोग असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.

गतवर्षीच्या बारदान्याचे पैसही महामंडळाकडेच

गतवर्षीही बारदान्याअभावीच खरेदी रखडलेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वत: जवळील बारदाना देऊ केला होता. मात्र, या बदल्यात शेतकऱ्यांना रक्कम अदा केली जाणार होती. पण अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे यंदा शेतकरी बारदाना देण्याचे टाळत आहेत. उत्पादन झाले आहे मात्र, त्याची विक्री करावी कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. दुसरीकडे उत्पादनात घट झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. तर कोकणात मात्र, उत्पादन झाले आहे पण खरेदी केंद्रच सुरु नसल्याने खासगी व्यापारी हे मनमानी किंमतीमध्ये खरेदी करीत आहेत. त्यामुळे महामंडाळाने त्वरीत प्रश्न मार्गी लावण्याची मागणी शेतकरी करीत आहे.

दोन दिवसांमध्ये खरेदी केंद्र सुरु करणार

राज्यात कोकणात अवकाळी पाऊस झाला अजूनही भात शेतकऱ्यांच्या खळ्यावर बांधावर आहे. येत्या दोन दिवसात पालघर जिल्ह्यात भात खरेदीचा शुभारंभ आम्ही करणार असल्याची माहीती कृषी मंत्री व पालघर जिल्ह्याचे पालक मंत्री दादा भुसे यांनी दिलेली आहे. पालक मंत्री दादा भुसे यांनी सर्व भात खरेदी केंद्रांना मान्यता दिलेली आहे. पण अद्याप सुरु झाले नाहीत ही शोकांतिका आहे.

संबंधित बातम्या :

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सायकल वारी, प्रशासनाच्या दरबारी, तरुण शेतकऱ्याची राज्यभर भ्रमंती

मराठवाड्यातील 42 लाख शेतकऱ्यांना मदतीचे वाटप, कशामुळे होत आहे दिरंगाई?

कमी खर्चात अधिकचे उत्पादन, ढोबळी मिरची लागवडीची योग्य पध्दत कोणती?

https://www.youtube.com/c/TV9MarathiLive/videos