कमी खर्चात अधिकचे उत्पादन, ढोबळी मिरची लागवडीची योग्य पध्दत कोणती?

मिरची किंवा ढोबळी मिरची म्हणलं की, शेडनेट आलंच यामुळे केवळ मुख्य पिकांचाच आधार घेतला जातो. पण योग्य व्यवस्थापन केले तर ढोबळी मिरचीचे उत्पादन घेण्यासाठी शेडनेट असावेच असे काही नाही. खुल्या शेत जमिनीवरही मिरचीचे उत्पादन घेता येते. यासाठी व्यवस्थापन आणि योग्य पध्दतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.

कमी खर्चात अधिकचे उत्पादन, ढोबळी मिरची लागवडीची योग्य पध्दत कोणती?
संग्रहीत छायाचित्र

लातूर : उत्पादन वाढीसाठी मुख्य पिकांना आता हंगामी पिकाचीही जोड दिली जात आहे. यामध्ये भाजीपाला देखील महत्वाचा आहे. मात्र, पिक पध्दतीमध्ये बदल करायचा म्हटलं की, अधिकचा खर्च हा आलाच. त्यामुळे अधिकतर शेतकरी याकडे पाठ फिरवतात. मिरची किंवा ढोबळी मिरची म्हणलं की, शेडनेट आलंच यामुळे केवळ मुख्य पिकांचाच आधार घेतला जातो. पण योग्य व्यवस्थापन केले तर ढोबळी मिरचीचे उत्पादन घेण्यासाठी शेडनेट असावेच असे काही नाही. खुल्या शेत जमिनीवरही मिरचीचे उत्पादन घेता येते. यासाठी व्यवस्थापन आणि योग्य पध्दतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.

शेडनेट ही खर्चीक बाजू आहे. शिवाय निसर्गाच्या लहरीपणाचा सामना आता शेतकऱ्यांना सातत्याने करावा लागत आहे. यामध्ये शेडनेटचे नुकसान होण्याचाही धोका असतो. त्यामुळे शेडनेट शिवाय आणि कमी खर्चात ढोबळ्या मिरचाचे उत्पादन शक्य आहे. मात्र, त्या पध्दतीची माहीती होणे गरजेचे आहे. शेडनेट शिवाय ढोबळी मिरचीचे उत्पादन कसे घेतले जाणार हे पाहूयात

मिरचाचे रोप तयार करणे

लागवडीसाठी सर्वात महत्वाचे आहे ते ढोबळी मिरचीचे रोप. रोपे तयार करण्यासाठी निवडलेली जागा चांगली असावी लागणार आहे. ज्या क्षेत्रात रोप घेतले जाणार आहे ते क्षेत्र नांगरून आणि कुळवाच्या पाळ्या देऊन भुसभुशीत करावे लागणार आहे. यामध्ये 3 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 15 सेंटिमीटर उंचीचे गादीवाफे तयार करावेत. गादीवाफ्यावर कुजलेले शेणखत पसरावे व ते मातीत मिसळावे. प्रथम फोरेट कीटकनाशक हे दहा ग्रॅम प्रत्येक वाफ्यावर टाकून नंतर बियांची पेरणी करावी लागणार आहे. प्रति वाफा 10 ग्रॅम बियाणे वापरावे. रोपे लागवडीनंतर सहा ते आठ आठवड्यांची झाल्यावर त्यांची पुनर्लागवड करावी लागणार आहे.

अशी आहे लागवड पध्दत

रोपांची लागवड करताना दोन ओळींतील अंतर 2 फूट आणि दोन रोपांमधील अंतर 45 सेंटिमीटर ठेवल्यास एका एकर मध्ये सर्वसाधारणपणे 14500 झाडे लागतात. रोपांची लागवड शक्य असल्यास संध्याकाळी करणे उत्तम असते. जमीन हलकी असेल तर सरीमध्ये लागवड करावी आणि जमीन जर चांगल्या प्रकारचे असेल तर सरीच्या एका बाजूस लागवड करावी जेणेकरुन पाणी देणे सोपे होणार आहे.

खतांचे व्यवस्थापन

हेक्‍टरी 15 ते 20 बैलगाड्या कुजलेले शेणखत वापरावे. तर माती परीक्षण करून दीडशे किलो नत्र, दीडशे किलो स्फुरद आणि 200 किलो पालाश पिकाला द्यावे. संपूर्ण पालाश, स्फुरद आणि शेणखत तसेच अर्धी नत्राची मात्रा लागवड करताना द्यावी. उर्वरित अर्धे नत्र दोन समान हप्त्यांत द्यावे. लागवडीनंतर एक महिन्याने व पन्नास दिवसांच्या अंतराने विभागून द्यावे.

ढोबळी मिरचीचे पाणी व्यवस्थापन

मिरची लागवडीपासून सुरूवातीच्या वाढीसाठी नियमितपणे पाण्याची गरज असते. दर्जानुसार दर आठ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. ढोबळी मिरची काढणी आणि उत्पादन फळे हिरवेगार व संपूर्ण वाढलेली असल्यास मिरचीची काढणी करावी. सर्वसाधारणपणे दर आठ दिवसांचा फरक ठेऊन मिरचीची काढणी करावी. अशा चार ते पाच काढण्यात सर्व पीक निघते. असा पध्दतीचा अवलंब केल्यास ढोबळी मिरचीचे हेक्‍टरी 17 ते 20 टनांपर्यंत सरासरी उत्पादन मिळते.

संबंधित बातम्या :

थकबाकीदारांना माफी, कर्ज परतफेड करणाऱ्यांचे काय ? शरद पवारांचा राज्य सरकारला मोलाचा सल्ला

नुकसानभरपाई सरकारला नव्हे तर कंत्राटदारालाच द्यावी लागणार, काय झाले नेमके भंडारा जिल्ह्यात ?

सोयबीनचे दर स्थिर, शेतकऱ्यांनो हीच ‘ती’ योग्य वेळ..!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI