नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा , कांद्यासह भातशेतीचे वांदे, दोन दिवस धोक्याचेच

| Updated on: Nov 08, 2021 | 11:31 AM

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात बरसल्यानंतर पावसाने आपला मुक्काम नाशिक जिल्ह्यात वाढवला आहे. यामुळे शेतीपिकाचे तर नुकसान होतच आहे पण नव्याने लागण झालेल्या कांद्याचे पिक धोक्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा , कांद्यासह भातशेतीचे वांदे, दोन दिवस धोक्याचेच
अवकाळी पावसामुळे कांद्याच्या रोपाचे नुकसान
Follow us on

नाशिक : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात बरसल्यानंतर (untimely rains damage) अवकाळी पावसाने आपला मुक्काम ( Nashik) नाशिक जिल्ह्यात वाढवला आहे. यामुळे शेतीपिकाचे तर नुकसान होतच आहे पण (onion cultivation stalled) नव्याने लागण झालेल्या कांद्याचे पिक धोक्यात आले आहे. कांद्याची नुकतीच लागवड झाली असून लागवडीनंतर पावसाचे प्रमाण हे वाढले आहे. त्यामुळे कांद्याच्या वाढीवर तर त्याचा परिणाम होणारच आहे पण बारिक रोप हे उध्वस्तच होत आहे.

खरीप हंगामातही अधिकच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते तर आता अवकाळीमुळे कांद्यासह भात शेतीचे नुकसान होत आहे.ट
जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मध्यंतरी खरिपातही पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते. तर आता रब्बीतील कांदा लागवडीची जिल्ह्यात लगबग सुरु आहे. पण इगतपूरी, येवला या भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कांदा उत्पादनावर याचा परिणाम होणार आहे.

मुसळधार पावसामुळे अधिकचे नुकसान

जिल्ह्यात अनेक भागात कांद्याची लागवड पूर्ण झाली आहे. उत्पादन वाढीच्या दृष्टीने यंदा कांदा लागवडीवर शेतकऱ्यांनी भर दिलेला आहे. शिवाय मध्यंतरी कांद्याचे दर वाढल्याने उत्पादनाबाबत शेतकरी हे आशादायी झाले आहेत. त्यामुळे दरवर्षीपेक्षा यंदा अधिकच्या क्षेत्रावर कांदा लागवड होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, लागवड होताच संकटाची मालिका सुरु झाली आहे. अवकाळी पावसाचा जोर नाशिक जिल्ह्यात जास्त आहे. त्यामुळे लागवड झालेल्या कांद्याचे नुकसान होत आहे तर लागवडीच्या प्रतिक्षेत असलेल्या रोपाचेही नुकसानच सुरु आहे. जिल्ह्यातील इगतपुरी येथे कांद्याबरोबर भात शेतीही पाण्यातच आहे. ऐन काढणीच्या प्रसंगीच परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शिवाय अजूनही तीन दिवस पावसाचेच असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

शेतातले पीक आता बांधावर

शेती व्यवसाय पूर्ण: निसर्गावरच अवलंबून आहे. मध्यंतरी खरिपातील नुकसानीतून शेतकरी आता कुठे सावरत आहे. मात्र, उत्पादन वाढीच्या अनुशंगाने कांदा व भातशेतीवर भर दिला जातो. पण अवकाळी पावसामुळे सर्वकाही पाण्यात मातीमोल होत आहे. इगतपूरी तालुक्याती सिन्नर येथील शेतकरी अरुण राव यांच्या 4 एकरातील पीकाचे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे पिकाचे नुकसान झाले असून ऐन काढणीच्या प्रसंगीच पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. त्यामुळे या पिकातून उत्पादनाची काही आशा नसून हे पीक बांधावर फेकून देण्याशिवाय पर्यायच नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. या अवकाळी पावसामुळे तीन लाखाचे नुकसान झाल्याचे अरुण राव यांचे म्हणने आहे.

पावसाचा धोका कायम

हवामान विभागाने ऐन दिवाळीमध्ये पावसाचा अंदाज वर्तवलेला होता. त्यानुसार मराठवाडा, विदर्भ येथे पावसाने हजेरी लावली मात्र, नाशिक जिल्ह्यात पावसाने आपला मुक्काम वाढवलेला आहे. गेल्या चार दिवसांपासून पाऊस सुरु असल्याने शेतीकामे तर खोळंबलेली आहेतच पण लागवड केलेल्या कांद्याची आणि काढणीला आलेल्या पिकांचे मात्र, आतोनात नुकसान झालेले आहे. शिवाय अजूनही दोन दिवस पावसाचेच राहणार आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अवकाळी पाऊस होत असल्याचे हवामान विभगाने सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांनो हीच ‘ती’ योग्य वेळ, रब्बी हंगामाबाबत महत्वपूर्ण सल्ला

औषधी वनस्पतीची शेती, 10 हजार रुपये क्विंटल असलेल्या वनस्पतीची भारतातून जगभरात निर्यात

आणेवारी सुधारली, शेतकऱ्यांची चिंता वाढली, यवतमाळ जिल्ह्याबाबत महसूल विभागाचा अहवालट