AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औषधी वनस्पतीची शेती, 10 हजार रुपये क्विंटल असलेल्या वनस्पतीची भारतातून जगभरात निर्यात

आता शेतीचे स्वरुप बदलत आहे. ज्यामधून अधिकचे उत्पादन त्याची लागवड असाच प्रयत्न आता शेतकऱ्यांचा राहिलेला आहे. त्यामुळे औषधी वनस्पतीवर भर दिला जात आहे. या वनस्पती उपयोगीही पडत आहेत आणि त्यामधून उत्पन्नही मिळत आहे. सर्पगंधक ही वनस्पती त्यापैकीच एक आहे.

औषधी वनस्पतीची शेती, 10 हजार रुपये क्विंटल असलेल्या वनस्पतीची भारतातून जगभरात निर्यात
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Nov 06, 2021 | 5:26 PM
Share

मुंबई : आता शेतीचे स्वरुप बदलत आहे. ज्यामधून अधिकचे उत्पादन त्याची लागवड असाच प्रयत्न आता शेतकऱ्यांचा राहिलेला आहे. त्यामुळे  ( Herbs) औषधी वनस्पतीवर भर दिला जात आहे. या वनस्पती उपयोगीही पडत आहेत आणि त्यामधून उत्पन्नही मिळत आहे. सर्पगंधक ही वनस्पती त्यापैकीच एक आहे. तर अशा काही औषधी वनस्पती आहेत ज्या ( exports from India,) भारतात सर्वात जास्त उत्पादित केल्या जातात आणि शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जातात आणि जगातील बऱ्याच देशांमध्ये निर्यात केल्या जातात.

यामधून परकीय चलन तर मिळतेच पण जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख निर्माण होते. इसबगोल ही सुद्धा अशीच वनस्पती आहे. एकट्या भारत देशामध्ये एकूण उत्पादनाच्या 80 टक्के उत्पादन होत आहे. औषधी पिकांच्या निर्यातीत इसबगोल प्रथम क्रमांकावर आहे. दरवर्षी इसबगोलची निर्यात ही 120 कोटी रुपयांची होते. या औषधी वनस्पतीचे इराण, इराक, अरब अमिराती, भारत आणि फिलिपाईन्स हे जगातील प्रमुख उत्पादक आहेत. भारतात गुजरात, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर इसाबगोलची लागवड करतात.

प्रति क्विंटल 10,000 रुपये

रबी हंगामात म्हणजेच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये इसबगोलची लागवड केली जाते आणि मार्च महिन्यापर्यंत याला पीक लागते. त्याची झाडे हळूहळू वाढतात आणि हाताने ते काढून घेण्याचा सल्ला दिला जातो. एक वेळेस लागवड केल्यावर कमीत कमी एकरी 4 क्विंटल उत्पादन मिळते. सध्या एक क्विंटलचा दर 10, 000 रुपये आहे. एका हेक्टरमध्ये इसबगोलचे 15 क्विंटल बियाणे मिळते. याशिवाय हिवाळ्यात इसबगोलच्या किंमती वाढतात, ज्यामुळे उत्पन्न आणखी वाढते. इसबगोलच्या बियाण्यावर प्रक्रिया केली तर ती अधिक फायदेशीर ठरते. या प्रक्रियेनंतर इसबगोलच्या बियांपैकी सुमारे 30 टक्के बिया भुसा तयार करतात आणि हा इसबगोलचा सर्वात महागडा भाग मानला जातो. इसबगोलच्या लागवडीतून भुसा सोडल्यानंतर खली आणि गोली सारखी इतर उत्पादने सोडली जातात. जे दीड लाख रुपयांपर्यंत विकले जातात.

हस्कमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत

इसबगोलच्या भुसामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत आणि ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. इसबगोलमध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. त्यात चरबी आणि कोलेस्टेरॉल अजिबात नसते. इसबगोल सर्व वयोगटातील नागरिक खाऊ शकतात.

संबंधित बातम्या :

आणेवारी सुधारली, शेतकऱ्यांची चिंता वाढली, यवतमाळ जिल्ह्याबाबत महसूल विभागाचा अहवाल

दुष्काळात तेरावा ; अवकाळी पावसामुळे लागवडीपूर्वीच कांद्याचा ‘वांदा’

रब्बी हंगामातील कांदा ; लागवडीपासून काढणीपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

Follow Us
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल