AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळात तेरावा ; अवकाळी पावसामुळे लागवडीपूर्वीच कांद्याचा ‘वांदा’

कांद्याच्या उत्पादनात नाशिक जिल्हा महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रसिध्द आहे. देशातील एकूण उत्पादनापैकी 10 टक्के कांद्याचे उत्पादन हे एकट्या नाशिक जिल्ह्यात होते. असे असताना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना येथील कांदा उत्पादकांनाही करावा लागत आहे. यापुर्वी अधिकच्या पावसामुळे साठवलेल्या कांद्याचे नुकसान झाले तर आता दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याच्या रोपाचे नुकसान झाले आहे.

दुष्काळात तेरावा ; अवकाळी पावसामुळे लागवडीपूर्वीच कांद्याचा 'वांदा'
अवकाळी पावसामुळे कांद्याच्या रोपाचे नुकसान
| Edited By: | Updated on: Nov 06, 2021 | 4:06 PM
Share

नाशिक : (Nashik) कांद्याच्या उत्पादनात नाशिक जिल्हा महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रसिध्द आहे. देशातील एकूण उत्पादनापैकी 10 टक्के कांद्याचे उत्पादन हे एकट्या नाशिक जिल्ह्यात होते. असे असताना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना येथील कांदा उत्पादकांनाही करावा लागत आहे. यापुर्वी अधिकच्या पावसामुळे साठवलेल्या कांद्याचे नुकसान झाले तर आता (untimely rains) दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे (Damage to onion saplings) कांद्याच्या रोपाचे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील कांदा लागवडीची लगबग सुरु असतानाच ऐन दिवाळी जिल्ह्यातील येवला शहरासह तालुक्यातील इतर गावांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे लागवडीपूर्वीच कांद्याच्या रोपाचे नुकसान झाले आहे.

शिवाय दोन दिवसांपासून त्र्यंबकेश्वर तालुक्यातही पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडालेली आहे. रब्बी हंगामातील पेरण्या अद्यापही झालेल्या नाहीत. खरीपात पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते शिवाय रब्बीच्या पेरण्यांनाही आता उशिर होत असून जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे कीड-रोगराईचा तर धोका आहेच पण लागवडीपूर्वीच कांद्याचा वांदा होत आहे.

कांदा रोपाची टंचाई

यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने रब्बी हंगामात कांद्याची लागवड विक्रमी होणार असा अंदाज बांधण्यात आला होता. त्यानुसार शेतकऱ्यांनी वेळेत रोपे तयार होतील या हिशोबाने लागवड केली. मात्र, ढगाळ वातावरणामुळे कीडीचा प्रादुर्भाव आणि वाढती रोगराई यामुळे रोपांची योग्य वाढ झालेली नव्हती. परंतू, शेतकऱ्यांनी विविध औषधांची फवारणी करुन रोप जोमात तयार केले मात्र, ऐन लागवड सुरु होच असतानाच जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे कांदा लागवडीची कामे तर खोळंबली आहेतच शिवाय कांद्याच्या रोपावरही परिणाम झाला आहे.

बियाणांच्या किमतीमध्येही वाढ

कांद्याच्या रोपाला बियाणांचा पर्याय असला तरी कांद्याचे बियाणे हे महाग़डे आहे. शिवाय त्याची उगवण होते की नाही याबाबत शाश्वती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा भर हा रोपांवरच असतो. पण पावसामुळे आणि बदललेल्या वातावरणामुळे रोपांचे नुकसान झाले आहे. कांद्याच्या बियाणांचे दर हे 10 हजार रुपये पायली असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले आहे. एकीकडे बियाणांच्या किमतीमध्ये वाढ होत आहे तर दुसरीकडे कांद्याच्या दरात घट व्हावी याकरिता केंद्र सरकार साठवणूकीतला कांदा विक्रीसाठी काढत आहे. त्यामुळे कांद्याचे दर हे 5 ते 10 रुपयांनी घटत आहेत.

लागवड पध्दती

कांद्यांची रोपे, गादी वाफे तयार करणाऱ्या क्षेत्रााची खोल नांगरट करून कुळवाच्‍या दोन तीन पाळया देऊन जमिन भुसभुशित करावी. गादी वाफा 1 मी रूंद 3 मी लांब 15 सेमी उंच करावा. वाफयातील ढेकळे निवडून बाजूला काढावीत. बी उगवून येईपर्यंत. झारीने पाणी घालावे. बी उगवल्‍यानंतर गरजेप्रमाणे पाटाने पाणी द्यावे. फुलकिडे व करपा यांच्‍या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्‍यात 15 मिली मोनोक्रोटोफॉस व 25 ग्रॅम डायथेनएम 45 तसेच 50 ग्रॅम युरीया व 10 मिली सॅडोवीट यासारखी चिकट द्रव्‍ये मिसळून दर 10 दिवसांच्‍या अंतराने 4 ते 5 फवारण्‍या कराव्‍यात. रोपांना हरबऱ्यासारखी गाठ तयार झाली की रोप लागवडीस योग्‍य समजावे. रब्‍बीची 8 ते 9 आठवडयांनी तयार होतात. रोपे काढण्‍यापूर्वी 24 तास अगोदर गादी वाफयास पुरेसे पाणी द्यावे. कांदयाची लागवड गादी वाफयावर तसेच सरी वरंब्‍यावर करता येते.

संबंधित बातम्या :

बदलता शेती व्यवसाय : औषधी वनस्पतीमधून लाखोंची कमाई, महाराष्ट्रामध्येही होतेय लागवड

रब्बी हंगामातील कांदा ; लागवडीपासून काढणीपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

यंदा ऊसाचा गोडवा अधिक वाढणार, रब्बी पेरणीवरही परिणाम

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.