AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांची दिवाळी उडदावरच, दर घसरल्याने सोयाबीनच्या साठवणूकीवर भर

खरीप हंगामात शेतकऱ्यांना केवळ उडीद या पीकाने तारलेले आहे. शेतकऱ्यांची दिवाळी देखील उडदावरच होणार असल्याचे चित्र आहे कारण सोयाबीनची साठवण करुन उडदाच्या विक्रीवर शेतकऱ्यांचा भर आहे. दोन दिवसांपासून सोयाबीनची आवक ही कमी झाली असून उडदाला अधिकचा दर असल्याने साठवणुकीतला उडीद आता बाजारात येत आहे.

शेतकऱ्यांची दिवाळी उडदावरच, दर घसरल्याने सोयाबीनच्या साठवणूकीवर भर
लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Oct 29, 2021 | 4:56 PM
Share

लातूर : खरीप हंगामात शेतकऱ्यांना केवळ उडीद या पीकाने तारलेले आहे. (Arrival in Urad Market) शेतकऱ्यांची दिवाळी देखील उडदावरच होणार असल्याचे चित्र आहे कारण सोयाबीनची साठवण करुन उडदाच्या विक्रीवर शेतकऱ्यांचा भर आहे. (Latur Market) दोन दिवसांपासून सोयाबीनची आवक ही कमी झाली असून उडदाला अधिकचा दर असल्याने साठवणुकीतला उडीद आता बाजारात येत आहे. शिवाय दरही चांगला असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. मात्र, (Soyabean Rate Down) दरवर्षी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक होत असते ती जागा आता उडदाने घेतली आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजारात उडदाला 7200 चा दर मिळाला आहे. तर सोयाबीनचे दर 100 रुपयांनी वधारले आहेत.

खरीप हंगामात झालेले नुकसान आणि बाजारातील दर यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झालेली आहे. शिवाय रब्बीची पेरणी आणि दिवाळी सण तोंडावर अससल्याने समस्यांमध्ये अधिकची भरच पडलेली आहे. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना तारलेले आहे ते उडीद या पिकाने. हंगामाच्या सुरवातीपासून उडदाला कायम दर राहिलेला आहे. अद्यापही 7300 चा मिळत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत आहे. भविष्यात उडदाला जास्तीचा दर मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी साठवणूक केली होती. पण सोयाबीन कवडीमोल दरात विकावे लागत असल्याने शेतकऱ्यांनी उडीद विक्रीचा पर्याय निवडला आहे.

उडदाची आवक वाढली

दोन दिवसाखाली लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक ही जास्त होती. मात्र, सोयाबीनचे दर हे दिवसेंदिवस घसरत असल्याने शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतिच्या सोयाबीनची साठवणूक करण्यावर भर दिलेला आहे. मात्र, ज्याची चलती आहे अशा उडदाची आवक बाजारपेठेत वाढत आहे. कारण उडदाला 7242 चा दर मिळत असून गेल्या अनेक दिवसांपासून दर हे स्थिर आहेत. शुक्रवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 6 हजार पोत्यांची आवक झाली होती. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी उडदाची साठवणूक तर खराब सोयाबीनची विक्री करण्याचा निर्धार केला होता. मात्र, सोयाबीनचे दर अधिकच घटत आहेत. शिवाय पावसामुळे सोयाबीन हे डागाळल्याने 4 हजारापर्यंतच दर मिळत आहे. त्यामुळे आता चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची साठवणूक तर उडदाची विक्री असेच चित्र बाजारातील आहे.

दिवाळी अन् रब्बीच्या तोंडावर बळीराजा अडचणीत

शेत जमिनीतील ओल उडण्यापूर्वी रब्बी हंगामातील पेरणी होणे गरजेचे आहे अन्यथा पुन्हा ओलवून पेरण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावणार आहे. त्यामुळे रब्बीची लगबग सुरु झाली आहे. मात्र, शेतीमालाचे दर घटत असताना दुसरीकडे बियाणे आणि खताचे दर हे वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. तर दुसरीकडे दिवाळीचा सणही आहे. त्यामुळे उडीद विक्री केल्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्यायच उरलेला नाही.

शेतकऱ्यांना प्रतीक्षा नुकसानभरपाईची

खरीपातील पीक नुकसानभरपाईची केवळ प्रक्रिया सुरु आहे. अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर ना शासनाची मदत पडलेली आहे ना विमा कंपन्यांची. दिवाळीपूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांना मिळायला हवी ही भूमिका कृषी आयुक्त तसेच राज्य कृषी मंत्री दादा भुसे यांनी घेतलेली आहे. मात्र, विमा कंपन्यांच्या वेळकाढूपणामुळे दिवाळी चार दिवसांवर येऊन ठेपली असतानाही नुकसानभरपाई मिळालेली नाही.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. शुक्रवारी लाल तूर- 6200 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6050 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6170 रुपये क्विंटल, जानकी चना 4850 रुपये क्विंटल, विजय चणा 5000, चना मिल 4800, सोयाबीन 5360, चमकी मूग 7100, मिल मूग 6300 तर उडीदाचा दर 7242 एवढा राहिला होता. (Urada arrivals increase in Latur’s Agricultural Income Market Committee, farmers focus on storage of soyabean)

संबंधित बातम्या :

16 जिल्ह्यांमध्ये पावसाने नुकसान शासनाची मदत 15 जिल्ह्यांनाच, 6 लाख शेतकरी मदतीविनाच

दुर्देव..! 2020 मध्येही महाराष्ट्रातच सर्वाधिक आत्महत्या, ‘एनसीआरबी’ चा अहवाल

‘या’ तालुक्यात वर्षभरापूर्वीच सुरु झाली होती ‘शेत पाणंद रस्ते’ योजना सुरु

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?