AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ तालुक्यात वर्षभरापूर्वीच सुरु झाली होती ‘शेत पाणंद रस्ते’ योजना सुरु

मात्र, दीड वर्षापूर्वी 'शेत तिथं रस्ता' असा उपक्रम एका मतदार संघात सुरु होता. शिवाय यामाध्यमातून शेत रस्त्याचे मातीकाम हे आमदार निधीतून केले जात होते. तर खडीकरण आणि त्याचे मजबूतीकरण हे मनरेगाच्या योजनेतून करण्यात येत होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल अशी योजना कोणत्या मतदारसंघात सुरु आहे ? पण लातूर तालुक्यातील औसा मतदार संघात हा उपक्रम सुरु करण्यात आला होता.

'या' तालुक्यात वर्षभरापूर्वीच सुरु झाली होती 'शेत पाणंद रस्ते' योजना सुरु
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 29, 2021 | 2:09 PM
Share

लातूर : आता राज्यातील गावा-गावात शेत रस्ते, (Farm Roads,) पाणंद रस्ते तयार करण्यात येणार आहेत. याकरिता ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला. त्यामुळे आता ग्रामीण भागातील रस्त्यांचा प्रश्न मिटणार आहे. मात्र, दीड वर्षापूर्वी ‘शेत तिथं रस्ता’ असा उपक्रम एका मतदार संघात सुरु होता. शिवाय यामाध्यमातून शेत रस्त्याचे मातीकाम हे आमदार निधीतून केले जात होते. तर खडीकरण आणि त्याचे मजबूतीकरण हे मनरेगाच्या योजनेतून करण्यात येत होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल अशी योजना कोणत्या मतदारसंघात सुरु आहे ? पण लातूर तालुक्यातील (Ausa) औसा मतदार संघात हा उपक्रम सुरु करण्यात आला होता. शेतकऱ्यांची वाहतूकीची अडचण लक्षात घेता (MlA Abhimanyu Pawar) आ. अभिमन्यू पवार यांनी मतदार संघात मागेल त्याला शेतरस्ता हा उपक्रम सुरु केला होता. आता हाच औसा मतदार संघाचा पॅटर्न राज्यभर राबवला जाणार असून त्याचे स्वागत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आजही ग्रामीण भागातील शेतरस्त्यांची मोठी दुरावस्था आहे. त्यामुळे वाहतूकीचा प्रश्न निर्माण होत आहे. शेती व्यवसयात वाहतूक हा मुद्दा आता महत्वाचा झाला असून बाजारपेठ किंवा साखर कारखाने जवळ करण्यासाठी रस्ते महत्वाचे आहेत. मात्र, याचीच सोय नव्हती. पणा आता ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’च्या माध्यमातून हे शेतरस्ते उभारले जातील असा विश्वास शेतकऱ्यांना आहे.

‘शेत तिथं रस्ता’ असा होता उपक्रम

विधानसभा निवडणूक होताच आ. अभिमन्यू पवार यांनी शेत तिथं रस्ता या उपक्रमाची घोषणा केली होती. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन आमदार निधी व मनरेगाच योजनेच्या एकत्रीकरणातून शेतरस्त्यांचे काम करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला होता. याबाबत प्रशासनामध्येही स्पष्टता नसल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गदर्शक सुचना घेऊन कामाला सुरवात केली होती. पहिल्या टप्प्यातील 700 किमीचे काम पूर्ण झाले असून उर्वरीत काम आगामी 2 वर्षात पूर्ण केले जाणार आहे. 2270 किमी लांबीचे रस्ते औसा मतदार संघाच केले जाणार असल्याचे आ. अभिमन्यू पवार यांनी स्पष्ट केले होते. या उपक्रमात रोहीयोचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या भेटी घेऊन हे काम सुरु होते.

‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’

सद्यस्थितीत राज्यात पालकमंत्री शेत, पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत आहे. ही योजना राबवितांना येणाऱ्या अडचणी दूर करुन या योजनेतील कामांसाठी मनरेगामधून आवश्यक असा निधी उपलब्ध व्हावा यासाठी मनरेगा आणि राज्याची रोहयो यांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. याच एकत्रित योजनेला मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना नाव देण्यात आले आहे.

मजुरांच्या हातालाही मिळणार काम

या यातून मनरेगामध्ये होणाऱ्या विविध कामांमधील अकुशल व कुशलच्या संयोजनातून शेत-पाणंद रस्ते बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मजूरांच्या हातालाही काम मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मनरेगाच्या माध्यमातून ही कामे सुरु होती. आता याचे नामकरण करण्यात आले असले तरी उद्देश मात्र, तोच राहणार आहे. यासंबंधी मंत्रीमंडळात बैठक झाली असून या योजनेला‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत, पाणंद रस्ते योजना’असे नाव देण्यात आले आहे. (Farm road work started a year ago in Ausa constituency)

संबंधित बातम्या :

‘ई-पीक पाहणी’ अन् विमा परताव्यातही नांदेडच अव्वल, काय आहेत कारणं?

कधी नव्हे ते शेतीमाल तारण योजनेला महत्व..! काय आहेत कारणे ?

‘पंतप्रधान पिक विमा योजना’ ही कंपन्यांसाठी नाही तर शेतकऱ्यांसाठी, कृषी आयुक्तांच्या कंपन्यांना नोटीसा

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.