Weather Update : कोल्हापूरमध्ये पावसानं पोल्ट्री फार्मची भिंत पडून तिघांचा तर चंद्रपूरमध्ये वीज कोसळून दोघांचा मृत्यू

कोल्हापूरमध्ये पावसानं पोल्ट्री फार्मची भिंत पडून तिघांचा तर चंद्रपूरमध्ये वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे.

Weather Update : कोल्हापूरमध्ये पावसानं पोल्ट्री फार्मची भिंत पडून तिघांचा तर चंद्रपूरमध्ये वीज कोसळून दोघांचा मृत्यू
Kolhapur poultry wall collapse

कोल्हापूर: कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात दुपारनंतर तासाभरापेक्षा अधिक वेळ मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे पोल्ट्री फार्मची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गडहिंग्लज तालुक्यातील मुगळी येथील घटना आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगाव येथे वीज पडून दोघांचा मृत्यू झाली आहे. (Weather Update Kolhapur Heavy rainfall Poultry wall collapsed three person died)

मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही

मुसळधार पावसाममुळे कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील मुगळी गावातील पोल्ट्री फार्मची भिंत कोसळली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाकडून तिघांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात दुपारनंतर तासाभरापेक्षा जास्त वेळ मुसळधार पावसानं हजेरी लावली.

कोल्हापूरमध्ये शेतीच्या कामांना वेग

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार एंट्री घेतली. दिवसभराच्या उकड्या नंतर शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. शेतीच्या मशागतीला वेग आला असताना आलेल्या पावसाने बळीराजा ही सुखावला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगाव येथे वीज पडून दोघांचा मृत्यू झाली आहे. सुरेश रामटेके (55) आणि अश्विनी मेश्राम (16) अशी त्यांची नावं असून हे दोघे बकऱ्या चारण्यासाठी गावाजवळ गेले होते, संध्याकाळी 5 च्या दरम्यान विजेच्या कडकडाट आणि पाऊस झाला, याच दरम्यान वीज पडून या दोघांचा मृत्यू झाला.

गोंदियामध्ये मान्सून पूर्व पावसाची हजेरी

गोंदिया जिल्हात अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज मान्सून पूर्व पावसाने जिल्हात हजेरी लावली. आज सकाळी पासूनच ढगाळ वातावरण पाहावयास मिळाले आणि अचानक पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे वातावरण गारवा निर्माण झाला असून शेतकऱ्यांनी खरिप हंगामासाठी तयारी सुरू केली असली तरी मात्र शेतकऱ्यांचे धानाची उचल झाली नसल्याने शेतकरी नाराज असल्याचे दिसून आले.

नंदूरबारमध्येही मान्सून पूर्व पावसाची हजेरी

हवामान खात्याने तीन दिवसात पावसाची शक्यता वर्तवली होती. आज सकाळपासून नंदुरबार शहरासह जिल्हामध्ये ढगाळ वातावरण होतं. मात्र, सायंकाळी जोरदार वादळवाऱ्यात पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शहापूर तालुक्यात पावसाची हजेरी

शहापूर तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी लावली. सुसाट्याच्या वाऱ्या सह पावसाची जोरदार सुरुवात झाली. एक तासापासून अधिक वेळ पावसानं जोरदार बॅटिंग केली.हवे मध्ये गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

संबंधित बातम्या:

कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पोर्टलचे लोकार्पण, कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न

The Family Man 2 | प्रतिक्षा संपली! काही वेळात ‘द फॅमिली मॅन 2’ रिलीज होणार! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहू शकाल?

(Weather Update Kolhapur Heavy rainfall Poultry wall collapsed three person died)