Onion Crop : कांद्याचे दर कोमात, तरीही लागवड जोमात..! नेमके कारण काय?

यंदा सततच्या पावसामुळे शेती कामे रखडलेली आहेत. खरिपातील पेरण्याही लांबणीवर पडल्या असे असताना उशिरा का होईना आता कांदा लागवडीला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी रोप टाकले होते ते त्यांनी आता लागवडीस सुरवात केली आहे. तर पावसामुळे रोपाचे गणितच बिघडल्याने अनेकांनी कांदा पेरणीवरच भर दिला आहे. आतापर्यंत अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असले तरी किमान कांद्याला तरी या पावसाचा फायदा व्हावा अशी अपेक्षा आहे.

Onion Crop : कांद्याचे दर कोमात, तरीही लागवड जोमात..! नेमके कारण काय?
नाशिक जिल्ह्यातील मनमाड तालुक्यातील चांदवड भागात कांदा लागवड जोमात सुरु आहेImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 2:17 PM

मालेगाव :  (Rabi Season) रब्बी हंगामातील कांद्याची काढणी होताच घसरलेले (Onion Rate) दर आणखीही कोमातच आहेत. गेल्या 5 महिन्यापासून कांद्याला 20 रुपये किलो पेक्षा अधिकचा दरच मिळालेला नाही. घटत्या दरामुळे शेतकरी चिंतेत असताना सततच्या पावसामुळेही साठवलेल्या कांद्याचे नुकसान अटळ होत आहे. अशी सर्व प्रतिकूल परस्थिती असतानाही यंदाच्या (Onion cultivation) खरिपातील कांदा लागवडीची लगबग शेत शिवारात पाहवयास मिळत आहे. केवळ नाशिक जिल्ह्यातच नाही तर सबंध राज्यात कांदा लागवड ही लांबणीवर पडलेली आहे. त्यामुळे कोणी कांदा पेरणी करीत आहे तर कोणी रोपाच्या माध्यमातून लागवड करतोय. सध्या दर कोमात असले तरी दराच्या बाबतीत कांदा हे बेभरवश्याचे पीक आहे. एका रात्रीतून कांद्याचे दर वाढू शकतात त्यामुळे समाधानकारक पावसानंतर कांदा लागवडीची लगबग ही सुरु झाली आहे.

समाधानकारक पावसानंतर लागवड जोमात

यंदा सततच्या पावसामुळे शेती कामे रखडलेली आहेत. खरिपातील पेरण्याही लांबणीवर पडल्या असे असताना उशिरा का होईना आता कांदा लागवडीला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी रोप टाकले होते ते त्यांनी आता लागवडीस सुरवात केली आहे. तर पावसामुळे रोपाचे गणितच बिघडल्याने अनेकांनी कांदा पेरणीवरच भर दिला आहे. आतापर्यंत अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असले तरी किमान कांद्याला तरी या पावसाचा फायदा व्हावा अशी अपेक्षा आहे. कांदा पिकातून नुकसान असो वा फायदा शेतकरी लागवडीवर भर देतातच. केवळ नाशिक जिल्हाच नव्हे तर आता राज्यात कांद्याचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे.

नगदी पीक, दराचा बेभरवसा

ऊसापाठोपाठ कांदा हे सर्वात मोठे नगदी पीक आहे. कांद्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे जीवनमानच बदलून गेले आहे तर नुकसान असो या फायदा असे म्हणूनही अनेकजण कांद्याची लागवड करतात. रोपात साधले की उत्पादनात साधणारच याची खात्री शेतकऱ्यांना आता पटली आहे. शिवाय लागवडीनंतर 3 महिन्य़ात आणि पेरणीनंतर 5 महिन्यात पीक पदरात पडते. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. यंदा पावसामुळे खरिपातील कांदा लागवडीला उशिर झाला आहे.

कांद्याच्या क्षेत्रात वाढ, दराचे चित्र काय?

शेतकऱ्यांनी कांद्यासाठी क्षेत्र हे राखून ठेवले होते. त्यानुसार आता रोपांची उगवण आणि पावसाने दिलेली उघडीप याचा फायदा शेतकरी घेऊ लागले आहेत. सबंध हंगामात कांद्याचे दर निच्चांकी राहिलेले आहेत. असे असतानाही कांदा लागवड मात्र जोमात होत आहे. एका रात्रीतून कांद्याचे दर वाढू शकतात याचा अनुभव शेतकऱ्यांना आहे तर गेल्या 5 महिन्यापासून दर वाढले नाहीत. असे असतानाही कांदा क्षेत्रात वाढ झाल्याचे कृषी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे वाढत्या क्षेत्राबरोबर भविष्यात दरही वाढावेत अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.