Washim Market Committee : बाजार समितीचा निर्णय एक अन् फायदे अनेक, शेतकऱ्यांच्या मागणीला प्रशासनाचे पाठबळ

| Updated on: Jan 25, 2022 | 11:09 AM

शेतीमाल विक्रीसाठी बाजारपेठच नसली तर अधिकचा खर्च आणि दरही कमी मिळतो. नेमकी हीच अडचण वाशिम जिल्ह्यातील हळद उत्पादकांची होती. हळदीच्या उत्पादनात वाशिम जिल्हा हा विदर्भात आघाडीवर आहे. असे असतानाही केवळ रिसोड वगळता हळद विक्रीची सोय नव्हती.

Washim Market Committee : बाजार समितीचा निर्णय एक अन् फायदे अनेक, शेतकऱ्यांच्या मागणीला प्रशासनाचे पाठबळ
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

वाशिम : शेतीमाल उत्पादनापेक्षा अधिकचे महत्व आहे ते बाजारपेठेतील दराला. यंदा खरीप हंगामात उत्पादनात घट झाली पण सोयाबीन, कापूस आणि आता तुरीलाही चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान टळले आहे. त्यामुळे बाजारपेठेतील दरही तेवढेच महत्वाचे आहेत जेवढे शेतीमधील उत्पादन. मात्र, असे असताना जर शेतीमाल विक्रीसाठी बाजारपेठच नसली तर अधिकचा खर्च आणि दरही कमी मिळतो. नेमकी हीच अडचण (Washim District) वाशिम जिल्ह्यातील हळद उत्पादकांची होती. (Turmeric) हळदीच्या उत्पादनात वाशिम जिल्हा हा विदर्भात आघाडीवर आहे. असे असतानाही केवळ रिसोड वगळता हळद विक्रीची सोय नव्हती. त्यामुळे वाहतूकीचा खर्च आणि त्याचा होणारा परिणाम पाहता शेतकऱ्यांनी वाशिम येथील बाजार समितीमध्ये (Auction of turmeric) हळदीचे लिलाव सुरु करण्याची मागणी केली होती. अखेर त्याला परवानगी देण्यात आली असून आता दर शनिवारी हळदीची खरेदी सुरु करण्यात आली आहे.

लिलावही अ्न चांगला दरही

उत्पादन वाढले तरी त्याला चांगला दर मिळनेही तेवढेच महत्वाचे आहे. सध्या हळद काढणीचे काम जोमात आहे. असे असताना 8 हजार 500 रुपये सरासरी दर सुरु आहे. राज्यात सर्वाधिक हळदीचे क्षेत्र असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे 8 हजार 500 दर मिळत आहे. मात्र, वाशिम येथे नव्यानेच लिलाव सुरु करण्यात आले आहेत. त्याचा फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. लिलावाच्या पहिल्याच दिवशी 8 हजार 201 रुपये प्रति क्विंटलला दर मिळालेला आहे. शिवाय हळद विक्रीचा पहिला मान सुपखेला येथील नवनाथ ठाकरे यांना मिळाला होता. याप्रसंगी बाजार समितीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्य प्रशासक सुरेश मापारी, सचिव बबनराव इंगळे, निरीक्षक वामन सोळंके यांची उपस्थिती होती.

असा होणार शेतकऱ्यांना फायदा

हळदीच्या वाढत्या क्षेत्रानुसार तशा सुविधाही मिळणे गरजेचे आहे. मात्र, जिल्ह्यात केवळ रिसोड येथेच हळदीचे लिलाव होत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना वाहतूकीचा मोठा खर्च येत होता. शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन आता हळदीचे लिलाव हे वाशिममध्येच होणार आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी लिलाव सुरु झाल्याने लगतच्या भागातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. स्थानिक पातळीवर बाजार सुरु झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळालेला आहे.

बाजार समितीची उलाढालही वाढणार

हळदीचे लिलाव सुरु झाल्याने केवळ शेतकऱ्यांचीच सोय झाली असे नाही तर बाजार समितीचीही उलाढाल वाढणार आहे. जिल्ह्यात हळदीचे क्षेत्र आणि उत्पादन दोन्हीही वाढत आहे. आता सोय झाल्याने शेतकरी हे अधिक उत्पादन घेणार आहेत. शिवाय हळदीसाठी पोषक वातावरण आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना तर अधिकच्या उत्पादनामुळे वाढणारी उलाढालीचा फायदा हा बाजार समितीचा असल्याचे सचिव बबनराव इंगळे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

महारेशीम अभियानाचा उद्देश साध्य, आता उत्पादनवाढीसाठी विशेष प्रयत्न, शेतकऱ्यांना नेमका फायदा कसा ?

Beed : आस्मानीनंतर आता सुलतानी संकट, पाईपलाईन फुटल्याने पाण्याचा अपव्यय अन् पिकांचे नुकसान

Budget 2022 : अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांना काय मिळणार? खाद्यतेलाच्या आत्मनिर्भरतेचं धोरण राहण्याची शक्यता